चरित्रात्मक निबंध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चरित्रात्मक निबंध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२५

माझा आवडता समाजसुधारक/समाजसेवक मराठी निबंध | Maza avadta samaj sudharak

 

माझा आवडता समाजसुधारक/समाजसेवक मराठी निबंध | Maza avadta samaj sudharak

     आज आपण माझा आवडता समाजसुधारक या विषयावर मराठी निबंध प्राप्त करणार आहोत हा निबंध महात्मा ज्योतिबा फुले निबंध मराठी आहे. ह्या निबंधला तुम्ही शाळा कॉलेज मध्ये वापरू शकतात. तर चला सुरू करूया..

आपला देश भारत हे एक विशाल राष्ट्र आहे. या देशात सर्व जाती धर्माचे लोक एकजुटीने राहतात. परंतु बऱ्याचदा काही दृष्ट लोक जाती धर्मांमध्ये भांडणे लावून देशात दंगे घडवून आणतात. आपल्या देशात एकीकडे देशाला तोडण्यासाठी कार्य करणारे दृष्ट लोक आहेत तर दुसरी कडे असेही काही समाजसुधारक होऊन गेले ज्यांनी आपल्या देशाची एकता, अंखंडता टिकवण्यासाठी मोलाचे कार्य केले. या महान समाजसेवकांनी देशातील कुप्रथांना थांबवण्याचे आणि गरिबांची मनोभावे सेवा करण्याचे कार्य केले. 



तसे पाहता आपल्या देशातील सर्वच समाज सुधारकांचे कार्य मोलाचे आहे परंतु माझे आवडते समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले हे आहेत. ज्योतिबा फुले हे आपल्या देशाचे एक मराठी लेखक, विचारवंत आणि थोर समाज सुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि अस्पृश्य समाजाच्या समस्या सर्वांसमोर ठेवल्या. याशिवाय महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्याबद्दल मुंबई च्या जनतेने त्यांना "महात्मा" ही पदवी बहाल केली. 


महात्मा फुले यांचा जन्म ११  एप्रिल १९२७  ला सातारा जिल्ह्यातील एका लहानशा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. ज्योतिबा जेव्हा नऊ महिन्याचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. जोतिबांचा विवाह तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. इ.स. १८४२  मध्ये त्यांनी शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशनरी शाळेत प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख असल्याने त्यांनी पाच-सहा वर्षातच आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. ज्या काळात ज्योतिबा यांनी आपले शिक्षण केले त्या काळात देशात दलित वर्गाला शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रियांनाही चूल व मूल सांभाळण्यास सांगून त्यांनाही शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते. 

ज्योतिबा फुले यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या सोबत मिळून स्त्री व अस्पृश्य शिक्षणाचे कार्य सुरू केले. समाजातील स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी 1848 साली पुण्यातील भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. सुरुवातीचा काळात या शाळेत फक्त 3 मुलींनी प्रवेश घेतला. या शिवाय समाजाच्या भयाने शाळेत शिकवण्यासाठी देखील शिक्षक तयार नव्हते. तेव्हा ज्योतिबा यांनी आपली पत्नी सावित्रीबाई ला शिक्षित करून त्यांना शाळेत शिकवण्यासाठी तयार केले. मुलींच्या या शाळेच्या प्रथम मुख्याध्या पिका सावित्रीबाई फुले होत्या.

 विद्याध्यायनासाठी ज्यांचा सतत असे प्रयास,

त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर प्रवास.

परि स्त्री शिक्षण; हा एकची असे ध्यास, हा एकची असे ध्यास,

या उक्तीप्रमाणे महात्मा जोतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्‍नांनी घडविले होते. महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते. आशा या महान समाज सुधारकांनी २७  नोव्हेंबर १८९०  रोजी पक्षघात च्या झटक्याने आपला देह त्यागला. 



मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४

बाबा आमटे मराठी माहितीBaba Amte information in Marathi

 

बाबा आमटे मराठी माहितीBaba Amte information in Marathi

बाबा आमटे मराठी माहितीBaba Amte information in Marathi


बाबा आमटे हे एक थोर समाजसेवक आहेत. त्यांचे मूळ नाव मुरलीधर देविदास आमटे आहे. बाबा आमटे यांचे समाजकार्य संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. तर चला मग पाहूया त्यांच्या विषयी माहिती.

जन्म

बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर, 1914 रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंघणघाट येथे झाला. बाबांचे कुटुंब त्या भागातील जमीनदार कुटुंब होते. त्यांची ही श्रीमंती परंपरागतरित्या चालत आलेली होती. बाबांचे लहानपणही अतिशय श्रीमंतीत गेले. बाबांकडे वयाच्या चौदाव्या वर्षी स्वतःची बंदूक होती आणि ते हरणांच्या शिकारीला जंगलात जायचे, बाबांच्या कुटुंबाची स्थिती खूप आरामदायक होती.

बालपण

बाबा आमटे यांचे बालपण खूप आरामदायक गेले. कारण त्यांची जन्मता श्रीमंती होती. तसेच लहानपणापासून त्यांना समाजसेवा हा गुण जडलेला होता. बाबांना लहानपणी चित्रपट फार आवडायचे. इंग्रजी चित्रपट त्यांच्या विशेष आवडीचे होते. अनेक नियतकालिकांसाठी ते त्या काळी चित्रपटांचे परीक्षण लिहित असत. ग्रेटा गार्बो आणि नोर्मा शेअरर यासारख्या कलावंतांशी त्यांचा पत्रव्यवहार होता.

पुढे बाबांनी कुष्ठरोग्यांसाठी काम सुरू केले, तेव्हा त्यांच्या कामात पहिली मदत नोर्मा शेअरर हिचीच मिळाली होती. बाबांना लहानपणी कार चालवणे शिकले तेव्हा एक स्वतंत्र स्पोर्ट्स कार देण्यात आली. पण बाबा लहानपणापासून स्वतंत्र विचारांचे होते. बालपण ऐश्वर्यात गेले असले तरी त्या वयातही त्यांना एक सामाजिक जाण मनात होती. त्यांचे मित्र खालच्या जातीचे असल्यामुळे त्यांना त्यांच्या सोबत खेळण्यास मनाई होती किंवा बंधने घालण्यात येत होते. परंतु या बंधनांचा बाबांवर कोणताही खूप परिणाम होत नसे व ते आपल्या मित्रांसोबत मिळून मिसळून खेळत असत.

 जीवन

बाबांनी आपल्या कॉलेजच्या दिवसात संपूर्ण भारत फिरले. रवींद्रनाथ टागोरांच्या संगीत आणि कवितांनी प्रभावित झालेल्या बाबांनी त्यांच्या शांतीनिकेतनलाही भेट दिली. टागोरांचा बाबांवर बराच प्रभाव होता. तितकाच प्रभाव वर्ध्याजवळच सेवाग्राम येथे आश्रम असलेल्या महात्मा गांधींचाही होता. मार्क्स व माओ यांच्या विचारांनीही बाबांना आकर्षिले होते. पण त्यांच्या विचारांच्या अंमलबजावणीसाठी रशिया व चीन या दोन्ही देशातील क्रांती मात्र त्यांना आवडली नाही. साने गुरूजींचाही बाबांवर बराच प्रभाव पडला होता.

अशा वातवरणातूनच मोठे झालेल्या बाबांनी वरोरा येथे वकिली सुरू केली. ती दणकून चालायलाही लागली. त्याचवेळी आठवड्या अखेरीस ते आपली शेती बघायचे. त्यांच्याकडे साडेचारशे एकर शेती होती. वरोराजवळ गोराजा येथे ही शेती होती. त्यांनी मग शेती करता करता शेतकर्‍यांना संघटीत करायला सुरवात केली.

कार्य

बाबांनी सहकाराचा मूलमंत्र शेतकर्‍यांत रूजवायला सुरवात केली. याची परिणती अशी झाली की बाबांनी वरोराचे उपनगराध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. एकीकडे असे सार्वजनिक आयुष्य सुरू असताना बाबांचे क्लबमध्ये जाणे, शिकारीला जाणे, टेनिस आणि ब्रिज खेळणे हेही सुरू होते. पैसा प्रचंड मिळत होता. पण एवढे सगळे असूनही बाबा आतमधून तितके सुखी नव्हते. आयुष्याला काही तरी हेतू असावा असे त्यांना वाटत असे.

व्यवसाय

बाबा आमटे हे वकिलीचा व्यवसाय करीत होते. परंतु जेव्हा त्यांना समजले कायद्याची प्रॅक्टिस म्हणजे खोटेपणा असेही एक समीकरण होते. खोटेपणा करून पैसे मिळविणे बाबांना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी हरिजनांसाठी काम करायला सुरवात केली. हरीजनांना बर्‍याच लांबून पाणी आणावे लागत असे. बाबांनी उच्चवर्णीयांच्या विरोधाला न जुमानता त्यांच्यासाठी सार्वजनिक विहीर खुली केली. त्यानंतर 1942 चे भारत छोडो आंदोलन सुरू झाले आणि बाबा त्यात उतरले. त्यांनी वकिलांना संघटीत करून अटक केलेल्या नेत्यांना सोडविण्यासाठी आंदोलन सुरू केले. त्यासाठी तुरूंगातही गेले.

पुढे वकिलीतील उत्साह संपला आणि त्यांना उदास वाटू लागले. याच काळात त्यांनी केस वाढविले. एखाद्या विरक्त साधूसारखे दिसू लागले.

वैयक्तिक जीवन

एकदा एका लग्नाला नागपूरला गेले असताना, त्यांनी साधना यांना पाहिले आणि त्यांचे मनोमन प्रेम बसले. पण त्यांच्या साधूसारख्या अवताराकडे बघून साधनाताईंच्या घरच्यांनी त्यांची निर्भत्सना केली. पण साधनाताईंनाही बाबा आवडले. मग त्यांना घरच्या विरोधाला पत्करून लग्न करण्याचे ठरविले.  लग्नानंतरही बाबांना आयुष्याचे ध्येय सापडत नव्हते. एके दिवशी त्यांनी एक कुष्ठरोगी माणूस पाहिला. हातपाय झडलेले, भर पावसात भिजत असलेला तो माणून पाहिला आणि ते भयंकर घाबरले. पण तोच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. पुन्हा परतून त्यांनी त्या माणसाची सेवा केली. पण तो जगला नाही. पुढचे सहा महिने उलघालीत गेलेल्या बाबांनी अखेर कुष्ठरोग्यांसाठी काम करण्याचे ठरविले आणि पत्नी साधनानेही त्यांना या निर्णयात साथ दिली. त्यानंतर मग त्यांनी आनंदवन उभारले.

तेथे त्यांनी कुष्ठरोग्यांच्या रहाण्याची सोय केली. त्यांची सेवा करण्याचे व्रत आरंभले. त्यासाठी ते कुष्ठरोग्यांवरील उपचारही शिकून आले. आनंदवनात कोणतीही सोय नव्हती. त्यांनी या उजाड परिसराचे नंदवन केले. आनंदवन स्वयंपूर्ण व्हावे यासाठी तेथे शेती सुरू केली. आनंदवन हे जगभरातील लोकांसाठी कुष्ठरोग्यांसाठी एक उदाहरण ठरले.

सेवाग्राम

गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. 1943 मध्ये वंदेमातरम्‌ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना 21 दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता.

राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी 1985 मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्‍न केला. नर्मदा बचाव आंदोलनात एक तप १२ वर्षे नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.

अभय साधक

एकदा बाबा रेल्वेने वरोड्याला चालले होते. त्यावेळी रेल्वेत काही इंग्रज तरुण शिपाई एका नवविवाहितेची छेड काढत होते. तिचा नवरा घाबरून स्वच्छतागृहात लपून बसला होता. त्यावेळी बाबा पुढे झाले आणि त्यानी इंग्रज शिपायांना थांबविण्याचा प्रयत्‍न केला. असे करत असताना बाबांनी पहिल्यांदा काही ठोसे लगावले, पण नंतर इंग्रजही बाबांना मारू लागले. गाडी जेव्हा वर्धा स्टेशनात थांबली तेव्हा बाबांनी ती तेथेच अडवून ठेवली. खूप लोक जमा झाले. त्या सैनिकांच्या तुकडीचा कमांडिंग ऑफिसर तेथे आला आणि त्याने चौकशी करण्याचे वचन दिले. ही गोष्ट जेव्हा गांधीजींना समजली तेव्हा त्यांनी बाबांना अभय साधक अर्थात न्यायासाठी लढणारा निर्भय योद्धा असे नाव दिले.

जोडो यात्रा

पुढे बाबांनी एवढं उभारल्यानंतरही ते शांत बसले नाही. ऐंशीच्या दशकात संपूर्ण भारत अतिरेक्यांच्या कारवाया, फूटीच्या धमक्या अशा बाबींनी ग्रस्त असताना बाबांनी भारत जोडण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर व गुजरातपासून अरूणाचल प्रदेशापर्यंत भारत जोडो नावाची यात्रा काढली. शांतता निर्माण करणे व पर्यावरणाबद्दल जागृती हे या यात्रेचे मुख्य हेतू होते. 1990 मध्ये बाबांनी आनंदवन सोडले आणि ते नर्मदेच्या किनारी येऊन रहायला लागले. नर्मदा आंदोलनाला बळ देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला.

संस्था

बाबा आमटेंनी 1949 सालामध्ये महारोगी सेवा समितीची स्थापना केली. तसेच कुष्ठरोग्यांसाठी खालील संस्था स्थापन केल्या.

1) आनंदवन – वरोरा (चंद्रपूर)

2) सोमनाथ प्रकल्प – मूल (चंद्रपूर)

3) अशोकवन – नागपूर

4) लोकबिरादरी प्रकल्प – हेमलकसा

बाबांनी आनंदवनाच्या मूळच्या खडकाळ जमिनीत शेतीविषयक विविध प्रयोग केले. ते राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते होते. 1985 साली शंभर दिवसांच्या ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला.  मेधा पाटकर यांच्या सोबत ते नर्मदा बचाव आंदोलनातही सक्रिय होते. सामाजिक व पर्यावरण क्षेत्रांत त्यांनी मोलाचे कार्य केले आहे.

साहित्य

बाबा आमटे यांनी खालील पुस्तके लिहिली आहेत.

‘ज्वाला आणि फुले’ हा कवितासंग्रह आहे.

‘उज्ज्वल उद्यासाठी’, ‘माती जागवील त्याला मत’

पुरस्कार

बाबा आमटे यांना त्यांच्या केलेल्या सामाजिक कार्याबद्दल अनेक मानसन्मान मिळाले आहे. पद्मश्री, पद्मविभूषण, गांधी शांतता पारितोषिक, रॅमन मगसेसे पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले.

“बाबा आमटे ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

 

 

 

 

 

 

संत सावता माळी Sant Savatamali information in Marathi

  संत सावता माळी Sant Savatamali information in Marathi

संत सावता माळी Sant Savatamali information in Marathi


   महाराष्ट्राच्या मातीत अनेक संतांनी जन्म घेतला. त्यामध्ये संत तुकाराम महाराज संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत सखुबाई, संत गोरा कुंभार, संत सेना, संत जनाबाई यातीलच एक संत तो म्हणजे संत सावता माळी आहे.

संत सावता माळी हे एक संत कवी आहेत. ते संत नामदेव, ज्ञानदेव यांचे समकालीन असून पंढरपूर जवळील अरणभेंडी या गावचे ते रहिवाशी होते. त्यांचे वारकरी संप्रदायातील संत जनांमुळेच अभंगरचना करायचे. आपल्या दिवसभराच्या कामात देव असतो व आपल्या भाजीपाल्यामध्ये देव शोधणारा संत सावता माळी हा आहे. त्याच्या विषयी आपण माहिती पाहूया.

जन्म

संत सावतामाळी हे पंढरपूर जवळील अरणभेंडी या गावचे रहिवासी असून त्यांच्या वडिलांचे नाव परसूबा आणि आईचे नाव नांगीताबाई होते. त्यांच्या जीवनाविषयी माहिती सांगायचे झाले, तर ते अरणभेंडी गावातील रूपमाळी भानवसे यांची मुलगी जनाईशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन अपत्ये होती. मुलगा विठ्ठल व कन्या नागाबाई ते गृहस्थाश्रमी असूनही विरक्त वृत्तीचे होते. ते पंढरपूरचे विठ्ठल यांचे अभंगाद्वारे व भक्ती द्वारे महिमा गायत असत. त्यांचा वारकरी संप्रदायातील संत जनार्दनमध्येही मोठा लौकिक होता. विठ्ठल भक्तीने भरलेल्या त्यांच्या अभंग रचनांनी काव्यामध्ये भक्तिभावानेचा मळा ते फुलवीत असतात. त्यांचे अभंग काही प्रमाणात उपलब्ध आहे.

व्यवसाय

आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी संत सावता हे आपल्या शेतात दिवसभर कष्ट करीत असत. तसेच त्याचबरोबर ते ईश्वरभक्ती सुद्धा करत असत आणि ईश्वरभक्तीचा हा अधिकार सर्वांना आहे.

“न लगे सायास न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची”

असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला होता. काशीबा गुरव नावाचे व्यक्ती त्यांचे अभंग लिहून ठेवत असत आपल्या मळ्यातील भाजीपाल्यामध्ये ही त्यांना विठ्ठलाचे रूप दिसते.

आमची माळीयाची जात | शेत लावू बागाईत |

कांदा मुळा भाजी | अवघी विठाबाई माझी ||

लसूण मिरची कोथिंबिरी | अवघा झाला माझा हरी ||

या अभंगांमध्ये संत सावतामाळी म्हणतात की, आमची जात माळी आहे आणि आम्ही आमच्या शेतामध्ये कांदा, मुळा, भाजी, लसूण कोथिंबीर आणि मिरची अशी बागायत शेतीमध्ये पीक घेत असतो आणि त्या मध्येच आम्हाला देव दिसतो. देवाला पाहण्यासाठी मंदिरांमध्ये जाण्याची गरज नाही, आपल्या कामांमध्ये देव असतो हेही त्यांना सांगायचं आहे. अध्यात्म भक्ती आणि आत्मबोध आणि लोकसंग्रह कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड त्यांनी घातली.

धर्म चरणातील अंधश्रद्धा कर्मठपणा दांभिकता यावर त्यांनी कोणाचीच ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले अंतर शुद्धी तत्त्वचिंतन सदाचार निर्भयता नीतिमत्ता संशोधन इत्यादी गुणांनी त्यांनी ईश्वराला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर योग्य तीर्थव्रत, कौशल्य या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्वराचे अंतःकरणपूर्वक चिंतन करणे किंवा नामस्मरण करणे यातच देव प्रसन्न होतो असे त्यांचे मत होते.

संत सावता माळी यांच्या विषयी एक आख्यायिका आहे की, संत सावतामाळी हे आपल्या शेतामध्ये खुरप्याने शेतातील काम करत होते. एकदा संत ज्ञानेश्वर, नामदेव आणि पांडुरंग असे तिघे कूर्मदास नावाच्या एका संताच्या भेटीला चालले होते. वाटेत सावतामाळी यांचे गाव अरणभेंडी लागली. तेव्हा पांडुरंगाने तुम्ही येथे थांबा, मी स्वतः भेटून येतो असे सांगितले. पांडुरंगाला गंमत करण्याची लहर आली, तो धावत धावत सावता माळ्याकडे गेला आणि म्हणाला माझ्या मागे दोन चोर लागले आहेत. मला कुठेतरी लपवून ठेव.

संत सावता यांनी बाल रुपी पांडुरंगाला खुरप्याने आपली छाती फाडून हृदयामध्ये लपून ठेवले आणि वरून उपकरणे किंवा कांबळे बांधले. ज्ञानेश्‍वर आणि नामदेव पांडुरंगाची वाट पाहून थकले आणि पांडुरंगाला शोधत सावता माळ्याच्या मळ्यापर्यंत आले. त्यांनी पांडुरंग कुठे आहे याची चौकशी केली. ज्ञानदेव आणि नामदेव दोघेही ज्ञानी होते. त्यांना सावत्याच्या पोटापाशी पांडुरंग आहे. हे समजले आणि मग सावता माळी यांना बरोबर घेऊनच हे तिघेही कुर्मदासला भेटायला गेले. या कथेत एक असा अंतरंगात भाग आहे की सावता माळी यांनी आपले पोट चिरुन आत पांडुरंगाला ठेवले.

ही कथा सत्य सत्याच्या कसोटीवर तपासून पाहणे शक्‍य नसले, तरी पोट चिरुन आत पांडुरंगाला ठेवण्याइतपत ताकदची काही गरज आहे असे वाटत नाही. संत सावता माळी आणि पांडुरंग यांचे अगदी जवळचे संबंध होते. एवढे जाणता आले तरी पुष्कळ आहे. संत सावतामाळी हे आपल्या दैनंदिन कामकाजात विठ्ठलाचे रूप पाहत असत. त्यांच्या सासरवाडीचे लोक एकदा त्यांच्याकडे आले. सावतामाळी भजनात रंगून गेले होते. त्यांनी सासरवाडीच्या लोकांकडे लक्ष दिले नाही. पत्नी संतापली त्यावेळी त्यांनी आपल्या पतीला जो उपदेश केला तो असा की,

प्रपंच असुनी परमार्थ साधावा | वाचे आठवावा पांडुरंग |

उंच नीच काही न पाहे सर्वथा | पुराणीच्या कथा पुराणीच ||

घटका आणि परत साधी उतावीळ | वाउगा तो काळ जाऊ नेदी ||

सावता म्हणे कांती जपे नामावळी | हृदय कमळी पांडुरंग ||

आपल्या कामातच देव पाहणारे काम हाच देव परमेश्वर अशी दृढ श्रद्धा बाळगणारे आणि स्वतःच्या पत्नीसह हे अधिकार वाणीने परमार्थाचा उपदेश करणारे, सावतामाळी त्यांच्या काळात महाराष्ट्राच्या भक्तीच्या मळ्याची मनोभावे जपणूक करीत होते.

सामधी

त्यांच्या अभंगात त्यांनी म्हटले आहे. सावता म्हणे ऐसा मार्ग धरा |

जेणे मुक्तीद्वार ओळंगती ||

संत सावता माळी यांनी ईश्वराचा नामजप करण्यावर जास्त भर दिला. ईश्वरप्राप्तीसाठी संन्यास घेण्याची गरज नाही. संसारात राहूनही त्यांना ईश्वर प्राप्ती होऊ शकते. असे म्हणणाऱ्या सावता महाराजांना त्यांच्या मळ्यातच पांडुरंग पाहिला. त्यांना 45 वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्ती प्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून विचारले त्यांचे 37 अभंग उपलब्ध आहेत. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी शके 1217 दिनांक 12 जुलै 1295 यांनी आपला देह ठेवला.

पंढरपूर जवळील अरण येथे संत श्रेष्ठ सावता महाराज यांची समाधी आहे. आषाढ वद्य चतुर्दशी हा संत सावता महाराजांचा पुण्यतिथी उत्सव असतो. सावता महाराज आपले शेत सोडून कधी पंढरपूरला आले नव्हते असे मानले जाते. पांडुरंगच त्यांना भेटण्यासाठी अरण येथे गेले. आजही संत सावता महाराजांची पालखी आषाढी वारीला पंढरपूरला येत नाही. आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगाची पालखी संत सावता महाराजांना भेटण्यासाठी अरण येथे जाते. सावता महाराज समाधी मंदिर यांच्या शेताजवळ असून मंदीराजवळ विहीर आहे.

संत सावता महाराज यांचे राहते घर

संत सावता महाराज यांचे जुने अवशेष शिल्लक नसून त्या ठिकाणी नवीन पद्धतीने बांधले आहे. अरण येथील संत सावता महाराजांनी आपल्या मळ्यातच पांडुरंग पाहिला सावता महाराज पंढरपूरला कधीही गेलेली नाही असे म्हणतात. सावता महाराजांना भेटण्यासाठी देव पांडुरंग स्वतः येथे आले. आजही ही परंपरा पाळली जाते. आषाढ वद्य चतुर्दशी हा संत सावता महाराजांचा समाधी दिन तर अमावस्या हा काल्याचा दिवस असतो कालची दिवशी पंढरपूर वरून निघालेली देवाची पालखी अरण येथे आल्यावर दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता होते.

शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०२४

Sardar Vallabhbhai Patel essay in Marathi |सरदार वल्लभभाई पटेल

Sardar Vallabhbhai Patel essay in Marathi |सरदार वल्लभभाई पटेल

Sardar Vallabhbhai Patel essay in Marathi |सरदार वल्लभभाई पटेल



      नमस्कार मित्रांनो आज आम्ही सरदार वल्लभभाई पटेल ह्या विषयावर मराठी निबंध घेऊन आले आहोत. सरदार वल्लभाई पटेल या मराठी निबंध मध्ये आम्ही वल्लभभाई पटेल यांच्या जीवन कार्याचे वर्णन केले आहे, आणि कसे त्यांना सरदार ही उपाधी मिळाली ह्याचे वर्णन केले आहे. चला मित्रांनो निबंधाला सुरुवात करूया.

सरदार वल्लभाई पटेल.

सरदार वल्लभभाई पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक वरिष्ठ नेता होते आणि भारतीय गणराज्य स्थापन करणाऱ्या मधून एक होते. वल्लभभाई झावेरभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोंबर १८७५ मदे नाडियाद, गुजरात मध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव झावेरभाई आणि आईचे नाव लाढबाई होते.

   वल्लभभाई पटेल यांचे वडील झावेरभाई हे एक शेतकरी होते त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धामध्ये झाशी च्या राणी च्या सेनेमध्ये कार्य केले होते. सरदार पटेल ने आपले सुरुवातीचे शिक्षण आपल्या स्थानिक शाळेमधून आपल्या वडिलांबरोबर शेतीचे काम करत पूर्ण केले होते. सरदार पटेल लहानपणापासूनच एक बुद्धिमान, सहाशी आणि दृढ संकल्प ठेवणारे माणूस होते. ते नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असे. ह्याच गुणांमुळे त्यांना वकील बनायचे होते.

       पैशांची कमी असूनही सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या मित्रांकडून पुस्तके मागून वकिलीचा अभ्यास केला आणि जिल्हा वकिलीची परीक्षा ते पास झाले. त्यांनी गोधरा, गुजरात मध्ये आपली वकिली करायला सुरुवात केली. १९०२ मध्ये ते वलसाड येथे आले आणि जिल्हा मुख्यालय मध्ये यशस्वीपणे आठ वर्ष गुन्हेगारीवर वकिली केली जेणेकरून त्यांनी आपल्या परिवाराला आर्थिक रुपाने स्थिर केले.

               पैशांची कमी दूर केल्यानंतर त्यांनी झवेरबा यांच्याशी लग्न केले, त्यांना दोन मुले होती. सन १९१० मध्ये उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी ते लंडनला गेले आणि तिथे परीक्षांमध्ये प्रथम आले. मग ते भारतात परतल्यावर अहमदाबाद येथे वकिली करू लागले.

 

जेव्हा सरदार वल्लभभाई पटेल १९१७ मध्ये महात्मा गांधीजींना भेटले तेव्हा त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून गेले जेव्हा त्यांनी गांधीजींचे स्वतंत्र भारताचे स्वप्न आणि अहिंसा चे तत्त्वज्ञान बघितले. सन १९१८ मध्ये गुजरातच्या खेडा येथे भयंकर दुष्काळ पडला होता. म्हणून शेतकऱ्यांनी इंग्रज सरकारला कर माफी करण्याचे निवेदन केले पण इंग्रज सरकारने ते नकारले. तेव्हा सरदार पटेल यांनी शेतकऱ्यांचे नेतृत्व केले आणि शेतकऱ्यांना कर नाही देण्यास सांगितले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासमोर इंग्रज सरकारला माघार घ्यायला लागली आणि कर माफ करावा लागला, हे सरदार पटेल चे पहिले मोठे यश होते.

          बार्डोली सत्याग्रह च्या निमित्ताने सन १९२८ मध्ये गुजरात मध्ये एक प्रमुख किसान आंदोलन झाले होते, ज्याचे नेतृत्व स्वतः सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते. या आंदोलनापुढे इंग्रज सरकारला माघार घ्यायला पडला होता आणि सरदार पटेल मुळे शेतकऱ्यांचा विजय झाला होता. या सत्याग्रहाच्या यशानंतर लोकांनी वल्लभाई पटेल यांना "सरदार" ही उपाधी दिली होती, ज्याचा अर्थ आपला मुख्य किंवा आपला राजा असा होतो. तेव्हापासून त्यांना सरदार वल्लभाई पटेल या नावाने ओळखले जाऊ लागले.

                     सरदार वल्लभभाई पटेल ने खूप सारे इंग्रज सरकारच्या विरोधात आंदोलने केली. १९४२ मध्ये महात्मा गांधीजींच्या भारत छोडो आंदोलन मध्ये सरदार पटेल ने आपले पूर्ण सहकार्य केले होते. त्यांना याच कारणामुळे तुरुंगामध्ये सुद्धा झाला लागले होते.

           स्वातंत्र्याच्या आधी भारता ५८४ राज्यांमध्ये वाटला गेला होता. सरदार पटेल ने या राज्यांना एकत्रित आणल्यावर ती जोर दिला होता आणि सर्व राज्यांना इंग्रज सरकार विरुद्ध होण्यास सांगितले होते. ते पूर्ण देशाला एक करण्याच्या प्रयत्नांमध्ये होते. त्यांना Iron Man of India "पोलादी पुरुष" ही उपाधी दिली होती कारण भारतात चे राज्य आपण आज बघतो ते आज सरदार पटेल मुळेच आहेत.

            १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचे ते पहिले उपप्रधानमंत्री आणि गृहमंत्री बनले. त्यांनी IAS आणि IPS ची स्थापना करण्यामध्ये सहाय्य केले होते म्हणून त्यांना भारतीय सेवेचा संरक्षक संत असेही सांगितले जाते. १५ डिसेंबर १९५० मध्ये हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंतिम संस्कारासाठी दहा लाखापेक्षा जास्त लोक आले होते. त्यांना त्यांच्या कार्यामुळे "भारतरत्न" हा पुरस्कार देण्यात आला होता. भारतात खूप सारे महाविद्यालय आणि संस्था त्यांच्या नावाने उघडण्यात आल्या आहेत. गुजरात मध्ये सरदार सरोवर बांध आहे, जो नर्मदा नदीवर स्थित आहे तिथे सरदार पटेल यांचा विश्वा मध्ये सर्वात उंच पुतळा बांधण्यात आला आहे, "स्टॅच्यू ऑफ युनिटी" या नावाने तो प्रसिद्ध आहे. सरदार वल्लभाई पटेल यांचा जन्मदिवस "राष्ट्रीय एकता दिवस" ह्या रूपाने साजरा केला जातो.

 समाप्त।

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०२४

मदर तेरेसा जीवन परिचय मराठी माहिती । Mother Teresa Information in Marathi

 मदर तेरेसा जीवन परिचय मराठी माहिती । Mother Teresa Information in Marathi

मदर तेरेसा जीवन परिचय मराठी माहिती । Mother Teresa Information in Marathi


    या लेखात मदर टेरेसा यांच्यावर लिहिलेला मराठी निबंध देण्यात आला आहे. हा Mother teresa marathi essay/nibandh शाळा कॉलेज व सर्वच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. दुसऱ्याच्या सेवेसाठी आपले संपूर्ण जीवन वाहणाऱ्या महान समाज सेवी मदर तेरेसा. Mother Teresa यांनी आपले संपूर्ण जीवन परोपकार आणि लोकांच्या सेवेसाठी अर्पित केले. आधीपासूनच त्यांच्या हृदयात दीन, दुखित, बिमार, असाह्य आणि गरिबांसाठी प्रेम होते. या मुळेच त्यांनी 18 वर्षाच्या असताना कॅथलिक चर्चमधील नन बनून गरिबांसाठी आपले जीवन अर्पण केले. परंतु त्या जेव्हा पहिल्यांदा भारतात आल्या तेव्हा भारतातील लोक त्यांना खूप आवडले व त्यांनी आपले संपूर्ण जीवनभारतीयाच्या सेवेसाठी खर्ची करण्याचा निर्णय घेतला. आज आपण मदर तेरेसा यांच्या बद्दल माहिती मिळवणार आहोत.

प्रारंभिक जीवन

मदर तेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 ला युरोपमधील मॅसिडोनिया या देशात झाला. त्यांचे खरे नाव 'अंजेझी गोंक्षे बोजँक्सिय्यू' होते. त्यांचे वडील निकोला बोयाजू एक साधारण व्यवसायिक होते. आठ वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यामुळे मदर तेरेसा, त्यांची मोठी बहीण आणि भावाच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्या आईवर आली. वडिलांच्या मृत्यूनंतर Mother Teresa व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक समस्यांमधून दिवस काढावे लागले.  मदर तेरेसा या लहानपणापासून अतिशय सुंदर, अभ्यासू व परिश्रमी होत्या. अभ्यासासोबत त्यांना गाणे गाण्याच्या देखील छंद होता. त्यांच्या आईने लहानपणापासून त्यांना चांगली शिकवण दिली होती. त्यांच्या आईचे म्हणणे होते कि जे काही मिळेल ते सर्वांना वाटून खावे, स्वतःसाठी तर सर्वच जगतात पण दुसऱ्यांच्या सेवेसाठी जे आपले आयुष्य लावतात ते खरे महान असतात.

मदर तेरेसा आपल्या आई व बहिणीसोबत चर्च मध्ये येशू ख्रिस्तांची गाणी गात असत. चर्च मध्येच त्यांच्या मनात सेवा व धर्माविषयी भावना वाढली, त्यांनी नन बनण्याचा निर्णय घेतला. कॅथलिक परंपरेत नन या अश्या स्त्रिया असतात ज्यांनी आपले जीवन धर्मासाठी समर्पित केलेले असते. नन या आजीवन लग्न न करता लोकांच्या सेवेसाठी कार्य करतात.

भारतात आगमन

मे 1931 मध्ये 21 वर्षाच्या वयात त्यांनी नन बनण्याची प्रतिज्ञा घेतली. 1929 मध्ये Mother Teresa भारतातील कोलकत्ता शहरात आल्या व लोरेटा कन्वेट स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना शिकवू लागल्या. त्या शिस्तप्रिय शिक्षिका होत्या, विद्यार्थ्यांना पण मदर तेरेसा खूप आवडत असत. 1944 मध्ये त्यांना स्कूल च्या अध्यापिका बनवण्यात आले. त्यांचे मन शिक्षणात पुर्ण पणे रमून गेले होते.

समाज कार्य

10 सप्टेंबर 1946 ला घडलेल्या प्रसंगांमुळे मदर तेरेसा याचे जीवनच बदलून गेले. दार्जिलिंग मध्ये काही कामासाठी गेलेल्या असताना त्यांना येशू ख्रिस्ताचे दर्शन झाले. येशूनी त्यांना स्कूल सोडून आपले जीवन गरीब व दीन दुखिताच्या सेवेसाठी लावण्याचे ठरवले. याच दरम्यान कोलकत्यात हिंदू मुस्लिम दंगे भडकले, शहराची स्थिती भयावह झाली. या घटनेने मदर तेरेसांना दुःखी केले.

1946 मध्ये त्यांनी गरीब, बिमार आणि असहायांची सेवा सुरू केली. 7 ऑक्टोंबर 1950 मध्ये त्यांना चैरीटी साठी मिशनरी बनवण्याची परवानगी मिळाली. सुरुवातीला या संस्थेत 12 कर्मचारी नन होते. पण आताच्या काळात 4000 पेक्षा जास्त नन या संस्थेत आहेत. या संस्थेद्वारे अनाथाश्रम, नर्सिंग होम, वृद्धाश्रम या सारख्या सेवा संस्था सुरू करण्यात आल्या. त्या काळात कोलकत्यात प्लेग व कुष्ठरोगाची साथ आली. या रोग्याची सेवा करण्याची जवाबदारी Mother Teresa यांनी घेतली. गरिबांसाठी तर मदर तेरेसा देवदूत होत्या.

नंतरच्या काळात त्यांनी आपली संस्था भारताबाहेर पोहचवण्यासाठी भारत सरकार कळून परवानगी मिळवली. आज च्या काळात 100 पेक्षा जास्त देशात त्याच्या मिशनरी सुरू आहेत. त्याच्या निस्वार्थ भावामुळे लोकांना देखील त्या खूप प्रिय होत्या.

मदर तेरेसा मृत्यू

वाढत्या वयामुळे त्यांचे स्वस्थ बिघडायला लागले. त्यांना किडनी ची समस्या निर्माण झाली. 73 वर्षाच्या वयात त्यांना पहिल्यांदा हृदय विकाराच्या झटका आला. या नंतर 5 सप्टेंबर 1997 मध्ये त्याचा मृत्यू झाला. मृत्यू च्या 6 महिण्याआधीच त्यांनी मिशनरी चे अध्यक्षपद सोडून दिले.

    आज मदर तेरेसा यांची 'मिशनरी ऑफ चारिटी' मध्ये 4000 पेक्षा जास्त सिस्टर आणि 300 अन्य सहयोगी आहेत. जगातील 123 पेक्षा जास्तीच्या देशांमध्ये त्यांचे सेवा कार्य सुरू आहे. एकटेपणा सर्वात मोठी गरिबी आहे.

प्रेम हे प्रत्येक ऋतूत येणारे फळ आहे, आणि प्रत्येक व्यक्ती याला प्राप्त करू शकतो.शांतता ही चेहऱ्यावरील एका हास्याने सुरू होते.

लहान सहान गोष्टी मध्ये इमानदार रहा, कारण याच्याने तुमची शक्ती वाढते.

शिस्त ही ध्येय आणि उपलब्धते मधील पूल आहे.

जर आपल्या मनाला शांती नाही तर याचा अर्थ आहे की आपण विसरलो आहोत की आपण एक दुसऱ्यासाठी बनलेले आहोत.

प्रेम कधीही मोजून दिले जात नाही ते फक्त दिले जाते.

साधे पणाने जागा.

जिथे जाणार तिथे प्रेम पसरवा. जो पण तुम्हाला भेटेल तो खुश होऊन जायला हवा. जर तुम्ही 100 लोकांना जेवू घालू शकत नसाल तर एकालाच खाऊ घाला.

जे जीवन दुसऱ्यासाठी जगले नाही ते जीवन नाही.

आपण सर्व परमेश्वराच्या हातातील एका पेनाप्रमाणे आहोत.

तुम्ही किती दिले हे महत्त्वाचे नाही, पण देताना तुम्ही किती प्रेम दिले हे महत्त्वाचे आहे.सुंदर लोक नेहमी चांगले नसतात. पण चांगले लोक नेहमी सुंदर असतात.

दया आणि प्रेम हे शब्द लहान असू शकतात पण वास्तव मध्ये त्यांची प्रतिध्वनी अनंत आहे. तुम्ही जगात प्रेम पसरवण्यासाठी काय करू शकतात, घरी जा व सर्वांना प्रेम करा.

मदर टेरेसा यांच्या या व्यापक, प्रशंसक कार्या नंतरही त्याचे जीवन व कार्या विरुद्ध विवाद सुरू झाले. मदर तेरेसा यांच्या निस्वार्थ प्रेम कार्याला देखील लोक चुकीचे समजू लागले. त्यांच्यावर आरोप होऊ लागले की त्या सेवेच्या आड धर्म परिवर्तनाचे कार्य करीत आहेत. परंतु या आरोपांवर जास्त लक्ष न देता त्या आपल्या सेवाकार्यात लागून राहिल्या. Mother Teresa यांनी संपूर्ण जगाला प्रेमाची शिकवण दिली. त्यांनी लोकांना प्रेम करायला शिकवले, दीन दुःखितांची सेवा करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. गरिबांसाठी मदर तेरेसा या खरोखर देवदूतच होत्या. त्यांच्या जीवनापासून आपण खूप काही शिकू शकतो. मदर तेरेसा या अनेकांच्या आदर्श देखील आहेत.