मंगळवार, ३० जानेवारी, २०२४

मी पुस्तक बोलतोय ..... Mi pustak boltoy.....


                      मी पुस्तक बोलतोय ..... Mi pustak boltoy.....

मी पुस्तक बोलतोय ..... Mi pustak boltoy.....


   मी पुस्तक बोलतोय .. होय  होय  मीच बोलतोय मला बोलायचे आहे तुमच्याशी ..... खूप काही बोलायचे आहे तुमच्याशी ,खूप काही सांगायचे आहे तुम्हा सर्वाना

मन मोकळे करायचे आहे मला.... अहो  ऐकुन घ्या कोणीतरी ऐका माझी व्यथा .....

   कुणी वाचक देता का हो वाचक ?

   एका पुस्तकाला कोणी वाचक देता का वाचक ?

  एक पुस्तक वाचकावाचून,

  लेखकावाचून ,

  वाचकाच्या स्पर्शावाचून ,

  ग्रंथालयातुन रद्दीवाल्यापर्यंत हिंडत आहे.

  जिथून कुणी वाचेल अशी जागा धुंडत आहे.

  कुणी ,वाचक देता का रे? वाचक?

  काय रे बाळा खरंच सांगतो बाबांनो,

  मी आता थकून गेलोय बाबांनो,

 तुम्ही काय आजकालची पिढी काय बर्थडे सेलेब्रेशन करता ना ... मग मला सांगा माझा बर्थडे कधी असतो.?......

नाही ना माहित? खरं  तर बर्थडे असं नाही पण जागतिक पुस्तक दिवस असतो ना  २३ एप्रिल ला तोच आम्ही बर्थडे सेलेब्रेशन समजतो. माहित होते का रे हे तुम्हाला.

 शेक्सपिअर होता .... त्याचा जन्म आणि मृत्यू  एकाच दिवशी २३ झाला त्या थोर व्यक्तिमत्वासाठी त्यादिवशी पुस्तक दिवस साजरा करण्यात येतो.  

    माझा जन्म कधी झाला हे मला माहित नाही पण, टिळकांच्या मताप्रमाणे आपल्याकडील वेद  कोणत्या काळात लिहले गेले याचा वस्तुनिष्ठ पुरावा नसला तरी ,ते .सन १२०० वर्षपूर्वी काळात किंवा त्या सुमारास लिहले असावेत असा मॅक्समूलर यांचा अंदाज आहे.

   खूप छान होते माझे बालपण सगळे आवर्जून जवळ घ्यायाचे ,मला सांभाळायचे मला छान कपडे कव्हर करायचे. आता तर माझा कडे कोणी लक्ष देत नाही,सगळ्यांना मोबाईल प्रिय आहे.

      मी वाचकांशिवाय पोरका आहे,मला कोणी वाचतच नाही. प्रत्येक जण त्या मोबाईल वर खेळ खेळत बसतात. सोशल नेटवर्क वर बिझी असतात. तुमची तरी काय चूक आहे. पालक कुठेतरी चुकतात त्यांना त्यांची चूक समजली पाहिजे.

     मुले हि अनुकरण प्रिय असतात,पालकांना ते सतत फोन हाताळताना पाहतात आणि  स्वतः फोन हाताळतात .

     तुम्ही जे करता तेच पाल्य करते. पालकांनीच मला जवळ केले नाही तर मी का पालकांना जवळ करू. कधी कधी आई बाबा बाळ शांत राहावे म्हणून मोबाईल हातात देतात. मोबाईल चा पण खूप चांगल्या पद्धतीने वापर करता येतो.त्यात मलाहि वाचता येते. मला माहित आहे मी पुस्तक आहे म्हंटल्यावर  मला वाचायला कंटाळा येतो. पण, अरे एकदा वाचून तरी बघा ... माझ्याशिवाय चांगला मित्र होणे शक्य नाही . आता मी पण बोलतोय खर .

पण किती जण मनापासून वाचताय .... ऐकताय ना माझं ?

मी लहान होतो ना तेव्हा आई वडील ,शिक्षक सांगायचे वाचत जा. वाचशील तर मोठा होशील. मला वाचायचे महत्व सांगताना मार्गारेट फुलर म्हणतात कि,

 Today Reader ,Tomorrow leader !

          माझ्यात ज्ञानाने भरलेला सागर आहे. या ज्ञानात एक डुबकी मारून बघ ,तू दररोज मला वाच, या पुस्तक रुपी अथांग सागराचा तू उपयोग करून घे.

           माझे घर सुद्धा आहे.कोणीही तुला दाखवेल. माझ्या घराचे नाव आहे `` ग्रंथालय  ". माझ्या  ग्रंथालयात कोणीही येऊ शकते. माझे खूप सारे वाचक आहेत. मला वाचण्यासाठी लोक येतात. या वरून माझ्या मित्रांचे माझे खूप चांगले संबंध दिसतात. माझ्या सोबत तू मैत्री केल्याने तुला खूप फायदा होणार आहे. तुला यशाच्या शिखरावर पोहचवायला मला खूप आनंद होईल. तुझी प्रगती झालेली पाहून मला खूप आनंद होईल. मग करशील ना माझाशी मैत्री ?

   तर मित्रानो माझा हा निबंध तुम्हा सर्वाना कसा वाटलं हे कंमेंट करून मला नक्की कळवा ... आणि तुम्हाला  कोणत्या विषयावर निबंध हवे असती तर मला कंमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद !!

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा