शनिवार, ६ जानेवारी, २०२४
मोबाईल शाप की वरदान? (Essay on mobile in marathi )
मोबाईल शाप की वरदान? (Essay on mobile in marathi )
मोबाईल शाप की वरदान मराठी
निबंध किंवा मोबाईलचे फायदे आणि तोटे मराठी निबंध (essay on mobile in marathi) :-
नमस्कार मंडळी ! आजच्या धावपळीच्या जीवनात मोबाईल (भ्रमणध्वनी) माणसासाठी खूपच
उपयुक्त ठरत आहे. मोबाईलमुळे माणसाचे अनेक कामे अगदी चुटकी सरशी होत आहेत. आज
जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे आणि तो त्याच्या वापरत व्यस्त आहे.
पण मोबाईलमुळे जेवढे माणसाचे काम सोयीस्कर झाले
आहे तेवढेच मोबाईलमुळे माणसाच्या जीवनात अडचणी देखील निर्माण केल्या आहेत. मोबाईल
शाप की वरदान? हाच प्रश्न आज प्रत्येक व्यक्तीला सतावत आहे !
आजच्या या पोस्टमध्ये आपण मोबाईल शाप की वरदान
मराठी निबंध किंवा मोबाईलचे फायदे आणि तोटे मराठी निबंध (essay on mobile in
marathi) पाहणार आहोत. कारण मोबाईलचे जेवढे फायदे आहेत तेवढेच त्याचे तोटे देखील
आहेत.
मित्रांनो आजच्या युगात मुले – मुली, महिला,
ज्येष्ठ पुरुष जवळपास सर्वांकडे मोबाईल आहेत. मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक
बनला आहे, यात काही शंका नाही! आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत
दिवसभरात आनेक कामे या मोबाईलच्या माध्यमातून करत असतो.
या मोबाईलच्या माध्यमातून आपले जीवन खूपच सुलभ
आणि सोयीस्कर झाले आहे. पूर्वी जी कामे करण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागायचा आज
तिचं कामे या मोबाईलच्या माध्यमातून काही क्षणातच होत आहेत.
जसे पूर्वी जर दुसऱ्या शहरात राहणाऱ्या आपल्या
मित्र किंवा नातेवाईक ला जर आपल्याला एखादी वार्ता कळवायाची असेल किंवा त्याला
एखादा संदेश लिहायचा असेल तर आपल्याला पत्र लेखन करावे लागायचे. त्यामुळे ती
वार्ता त्या व्यक्तीपर्यंत पोहचायला 4-5 दिवस जायचे. व्यक्ती जर आपल्यापासून खूप
दूर अंतरावर राहत असेल तर त्याच्यापर्यंत पत्र पोहचायला आणखीनच जास्त वेळ लागत
असे.
पण आज मोबाईलच्या मदतीने कितीही दूर अंतरावर
असणाऱ्या व्यक्तीला आपण काही क्षणातच वार्ता कळवू शकतो. तसेच मोबाईल मध्ये कॉल
सिस्टीम देखील असते. त्यामुळे दूर किंवा बाहेर देशात राहणाऱ्या व्यक्तीशी
प्रत्यक्ष संवाद साधणे देखील मोबाईलच्या मदतीने खूपच सुलभ झाले आहे.
दिवसेंदिवस मोबाईलमध्ये विकास होत आहे, मोबाईल
आणखीनच प्रगत होत आहेत. आज तर व्हिडिओ कॉलिंग च्या मदतीने व्यक्तीशी प्रत्यक्ष
समोरासमोर संवाद साधने देखील खूप सोपे झाले आहे.
शिक्षणाच्या क्षेत्रात देखील मोबाईल
विद्यार्थांसाठी वरदानच ठरला आहे असे म्हटले तरी वावघे ठरणार नाही. कारण आज शिक्षण
घेणे आणि माहिती मिळवणे खूपच सोपे झाले आहे. आपल्याला जी माहिती हवी आहे ती
इंटरनेटच्या मदतीने आज सहज मिळवणे शक्य आहे.
आजकाल शिक्षण येवढे सोपे झाले आहे की संपूर्ण
शाळाच मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. आजकाल प्रत्येक शाळा, क्लासेस ऑनलाईन क्लास घेण्यास
भर देत आहेत. त्यामुळे विद्यार्थांना घर बसल्या शाळा , क्लासेस या मोबाईलच्या
मदतीने करणे शक्य झाले आहे. शिवाय प्रत्येक विषयाचे pdf books इंटरनेटवर उपलब्ध
आहेत. आपण हवं तेंव्हा ते पुस्तकं डाऊनलोड करून वाचू शकतो.
मोबाईलमुळे जग अगदी जवळ आल आहे. आज घरबसल्या तुम्हाला कोणत्याही भागाचे
हवामान बघणे, रोजचा चांदी – सोन्याचा भाव तपासणे, शेअर बाजारात होणारा चढ उतार
अभ्यासणे, यासारख्या अनेक गोष्टी आज मोबाईलमुळे घरि बसल्या करणे शक्य झाले आहे.
मनोरंजनाच्या क्षेत्रात देखील मोबाईल मागे
नाही. आज संपूर्ण टेलिव्हिजन आपल्या मोबाईल मध्ये उपलब्ध आहे. आपल्याला वाटेल
तेंव्हा आपण बातम्या पाहू शकता, मूव्ही पाहू शकता, गाणे एकु शकता, गेम खेळू शकता.
तसेच मोबाईलमध्ये कॅमेरा सुद्धा आहे त्यातून कार्यक्रम, सभा समारंभाचे फोटो काडू
शकतो, व्हिडिओ देखील शूट करू शकतो.
मोबाईलचे येवढे सारे उपयोग पाहून मोबाईल हा
मानवासाठी वरदानच आहे ! असे वाटते. पण मोबाईल चे जेवढे फायदे आहेत तेवढेच त्याचे
तोटे देखील आहेत.
मोबाईलचे तोटे (disadvantages of mobile in
marathi) :
मोबाईलचा सर्वात मोठा तोटा म्हणजे यामुळे
आरोग्यावर परिणाम होत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक शारीरिक समस्या जाणवत
आहेत. जसे की डोळ्यांचे, कानांचे आजार, मानसिक आजार, इत्यादी.
अंधारात मोबाईल वापरल्यामुळे डोळ्याची दृष्टी
कमी होण्याचे आजार लहान मुलामध्ये जाणवत आहेत. तसेच मोठ्या आवाजात संगीत एकल्याने
देखील श्रवण क्षमता कमी होऊ शकते. मोबाईल वापरणे जेवढे फायद्याचे आहे तेवढेच ते
आरोग्यासाठी हानिकारक आहे. डॉक्टरांकडून देखील मोबाईलचा कमी वापर करण्यासाठी
वारंवार सल्ले दिले जातात.
मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे लहान मुलांमध्ये
मानसिक त्रास देखील जाणवत आहेत जसे चिडचिड पणा येणे, एकटे राहणे, कुणाशी जास्त
संवाद न साधने, सतत मोबाईलमध्ये व्यस्त राहणे, इत्यादी.
मोबाईलमुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढतच आहे.
कित्येक लोक गाडी चालवताना मोबाईल वापरतात, मोबाईलवर बोलत रस्ता ओलांडतात, या
निष्काळजीपणामुळे कित्येक वेळा अपघात होतात.
शिवाय मनुष्य मनसोक्त जगणे विसरला आहे. पूर्वी
ज्याप्रमाणे घरात सर्वांचे एकत्र जेवण व्हायचे, सर्व एकत्र बसून गप्पा गोष्टी
करायचे, एकत्र खेळ खेळायचे. आज तसे काहीच दिसत नाही. कुणाकडेच वेळ नाही.
प्रत्येकजण मोबाईलमध्ये व्यस्त आहे.
त्यामुळे मोबाईलचे हे सारे तोटे देखील आहेत.
नक्कीच मोबाईल हे खूपच उपयुक्त तंत्रज्ञान आहे.
त्यामुळे मानवाचे जीवन खूपच सुलभ आणि सोयीस्कर झाले आहे. शिवाय कोणत्याही
तंत्रज्ञानाची निर्मिती करण्याचा मुख्य उद्देश्य हा संपूर्ण मनुष्य प्रजातीचा
विकास करणे हाच असतो. त्यामुळे मला तरी वाटते मोबाईल हा नक्कीच मनुष्यासाठी वरदान
आहे.
पण मोबाईलचा वापर जर गरजेपेक्षा जास्त झाला,
त्याचा दुरुपयोग करण्यात आला तर त्याचे दुष्परिणाम येवढे भयंकर आहेत की तो
मनुष्यासाठी नक्कीच शाप ठरल्याशिवय राहणार नाही.
त्यामुळे मोबाईल शाप की वरदान? हे ठरवणे
आपल्याच हातात आहे.
मला अशा आहे की तुम्हाला मोबाईल शाप की वरदान?
हा निबंध नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर इतर कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर
आम्हाला कमेंट करून कळवा, आम्ही पुढच्या पोस्टमध्ये त्यावर नक्कीच निबंध लिहू
धन्यवाद…!!!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा