शनिवार, ७ ऑक्टोबर, २०२३

डॉ. राजेंद्र प्रसाद

                                 💥  💥💥       डॉ. राजेंद्र प्रसाद 💥💥💥


       राजेंद्रप्रसाद हे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून सर्वानाच परिचित आहेत. ते नेहमी म्हणत
,

                    हरियायी न हिंमत विरियाई ना हरिको  नाम

                    जही विधी रखियाई राम  वही  विधे राहिये

हिंमत सोडू नका व ईश्वराला विसरू नका,राम जसे ठेवील तसे राहावे. असा संदेश देणारे डॉ.राजेंद्रप्रसाद याचा विषयी आपण आज माहिती पाहणार आहोत.

 💫💫 परीचय : स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ . राजेंद्रप्रसाद यांचे नाव सर्व भारतीयांमध्ये  परिचित आहे. बिहारमध्ये सारन नावाच्या जिल्हयातील जिरादेई  या गावी त्यांच्या ३डिसेंबर १८८४ रोजी जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बाबू चोधरीलाल श्रीवास्तव तर आईचे नाव कामेश्वरी. त्या दोघांना अपत्ये झाली. त्यापैकी राजेंद्रप्रसाद हे सर्वात धाकटे. राजेंद्रप्रसादबांबूचे  प्राथमिक शिक्षण हे एका मौलवींकडे झाले. अगदी थोड्याच अवधीत ते उर्दू व फारशी या भाषा शिकले. १८९३ साली छपरा येथील हायस्कूल मध्ये त्यांना प्रवेश मिळाला. शिक्षण चालू असताना वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्यांचा बालविवाह झाला. १९०८ साली ते मायट्रीक पास झाले. या परीक्षेत ते पहिले आले. त्यांना अनेक बक्षिसे व शिष्यवृत्या मिळाल्या. त्यानंतर कलकत्ता प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये त्यांनी प्रवेश घेतला तेथून बी.ए. पुढे त्यांनी एम.ए. व नंतर एल .एल .बी  ह्या पदव्या त्यांनी घेतल्या. कॉलेजमध्ये त्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून गौरवले गेले. वाचन, वक्तृत्व,व लेखन हे तिन्ही छंद त्यांनी उत्तम प्रकारे जोपासले होते. बालपणापासून त्यांना समाजसेवेची आवड होती.

💫💫 राजकीय क्षेत्रात कार्य: आपल्या जीवनातील सर्वोच्च ध्येय हे देशसेवा आहे. असे राजेंद्रबाबूनी मानले. काँग्रेसच्या १९०६ सालच्या कलकत्याच्या अधिवेशनात राजेंद्रबाबूनी  स्वयंसेवकाचे १९९१ सालच्या अधिवेशनात प्रतिनिधी म्हणून काम पहिले. १९१३ सालच्या अधिवेशनात प्रतिनिधी म्हणून काम अधिवेशनात काँग्रेस कमिटीचे ते सभासद झाले. १९३४ साली ते काँग्रेस चे अद्यक्ष झाले. त्यांना लोक देशकार्यासाठी हवे होते. राजेंद्रबाबूंवर त्यांचा फार मोठा प्रभाव पडला. बंगाल व बिहारमध्ये पूर आल्यानंतर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी फार मोठे कार्य केले. चंपारण्यात निळीच्या लागवडीच्यावेळी गोरे लोक शेतकऱ्यांना त्रास देत. त्यानंतर १९२४ साली ते पाटणा म्युनिसिपाल्टीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.द्विखंड भारत हा ग्रंथ लिहला व तो १९४६ ला प्रसिद्ध झाला. १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. २६ जानेवारी १९५२ रोजी प्रजासत्ताक भारताचे ते पहिले राष्ट्रपती झाले.राष्ट्रपतीपद त्यांनी जवळपास १२ वर्ष सांभाळले. २८ फेब्रुवारी १९६३ रोजी त्यांच्या जीवनाचा अध्याय संपला.

                राजेंद्रबाबू अत्यंत साधे होते. राष्ट्रपती झाल्यावरही त्यांनाही साधे कपडेच परिधान केले. परोपकार हा त्यांचा जीवनाचा स्थायीभाव होता. त्यांनी लोकांची सेवा अगदी मनापासून केली. मी जे निबंध लिहिते ते तुम्हाला कसे वाटतात  हे मला नक्की कळवा मी तुमच्या प्रतिकियांची वाट पाहते.

1 टिप्पणी: