मंगळवार, १० ऑक्टोबर, २०२३

नवरात्र उत्सव

   💥💥💥  नवरात्र उत्सव 💥💥💥 



सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके  

शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ।।

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:

 

      गणपती आणि पितृपंधरवडा संपला म्हणजे नवरात्र उत्सव चालू होतो. नवरात्र हा हिंदू धर्मातील जनतेद्वारा साजरा केला जाणारा सण आहे. हा सण म्हणजे खोट्या वाईट गोष्टीवरील सत्याचा विजय दर्शवतो. नवरात्र म्हणजे आदिमाया आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस नवरात्रीच्या पहिल्या दिवशी,अश्विन शुद्ध प्रतिपदेला घट्स्थापना होते. या काळात भक्तीभावाने देवीची पूजा केली जाते. घरात घट बसवला जातो. या नवरात्रीचे महत्त्व कथा,नवरात्र पूजा केली जाते. या सगळ्याची माहिती आज आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत,

     आपल्या जगाचा पोशिंदा म्हणजेच आपले शेतकरी घटस्थापनेचा संबंध येतो?ते म्हणजेच आपल्या शेतात जी पिके येतात. ज्यातून आपले पोट भरते त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच नवरात्र. आपल्या घरी नवीन धान्य आलेले असते. घटस्थापनेच्या वेळी शेतातील माती आणून त्यामध्ये हे नवीन धान्य आपण पेरतो.



        नवरात्रीच्या दरम्यान शेतातली पिके तयार झालेली असतात. त्या मातीमध्ये आपण हे नवीन धान्य आपण पेरतो आणि नऊ दिवसात हे धान्य आपल्या घटात उगवते म्हणजेच नवरात्रीपर्यंत या नऊ दिवसात आदिमाया आदिशक्ती ची उपासना करतात. आपल्या शेतातील धान्याचीही  पूजा केली जाते. हिंदू धर्मानुसार नवरात्र वर्षातून दोनदा साजरे केली जाते. पहिली नवरात्र चैत्र महिन्यात साजरी केली जाते आणि दुसरी नवरात्र अश्विन महिन्यात साजरी केली जाते. म्हणजेच पहिली नवरात्र मार्च आणि एप्रिल महिन्यात साजरी केली जाते आणि ऑक्टोबरमध्ये दुसरी. नवरात्र नऊ दिवस सतत चालू असते. ज्यात देवीच्या विविध रूपांची लोक भक्तीने पूजा करतात. भारतातील नवरात्र वेगवेगळ्या पद्धतींनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरी केली जाते. जागोजागी देवीच्या पूजेसाठी, स्थापनेसाठी मंडप उभारले जातात.

💥नवरात्र अर्थ=

नवरात्र हा एक संस्कृत शब्द आहे. ज्यामध्येनवम्हणजे नऊ दिवस आणिरात्रम्हणजे रात्र.म्हणूनच या सणाला नवरात्र असे म्हटले जाते. नवरात्री व्यतिरिक्त, नवरात्रोत्सवाला नवराते, नवरात्र, शारदीय नवरात्र यासारख्या नावांनी देखील ओळखले जाते. हा सण हिंदी महिन्यानुसार प्रतिपदा ते नवमी तिथी पर्यंत साजरा केला जातो. नवरात्रीचा नववा दिवस महा नवमी म्हणूनही ओळखला जातो.

💥नवरात्री माहिती=



        देवी शैलपुत्री,ब्रह्मचारिणी,चंद्रघंटा,कूष्मांडी ,स्कंदमाता , कात्यायनी, कालरात्री, महागौरी,सिध्दिदात्री अशी देवीची रूपे आहेत. आपल्या देशात नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी, सर्व राज्यांत रामलीलाचे आयोजन केले जाते आणि दहाव्या दिवशी राम आणि रावणाचे युद्ध रंगवून रावणाचा वध केलेला दाखवला जातो. आणि रावणाला वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून मारल्याच्या आनंदात फटाके वगैरे फोडून मोठ्या धूमधडाक्याने हा सण साजरा केला जातो. नवरात्रीच्या सणात, काही लोक उपवास ठेवतात आणि ते फक्त पाणी पिऊन दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी कडक पूजा करतात. आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी देखील नवरात्रीसाठी संपूर्ण नऊ दिवस फक्त पाणी पिऊन उपवास करतात.नवरात्रीच्या नऊ दिवसात एक आगळा वेगळा उत्साह असतो. अखंड नऊ दिवस देवीची मनोभावे सेवा, पूजा, आरती केली जाते. वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात. घटस्थापना करताना देवीसमोर घट स्थापना केला जातो. एका भांड्यामध्ये काळी माती ठेऊन या मातीमध्ये नऊ धान्य पेरतात. त्यावर पाण्याने भरलेला एक घट ठेवला जातो. या घटात आंब्याची किंवा विड्याची पाने गोलाकार ठेवतात. त्यावर नारळ ठेवला जातो. देवीपुढे अखंड दिवा तेवत ठेवला जातो. समोर देवीचे ताट ठेवतात. त्याच्यापुढे फळे ठेवली जाते. या घटाला झेंडूच्या फुलांची माळ घातली जाते.

नवरात्रीच्या नऊ दिवशी देवी आईला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवतात. मनोभावे देवीआईची उपासना आरती केली जाते. काही लोक नऊ दिवस अनवाणी राहतात. काही लोक निराहार उपवास करतात. दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला देवीपुढे होम हवन केले जाते. काही घरात ललिता पंचमी तर काही घरात षष्ठीचा फुलोरा करतात. या मध्ये देवीच्या वर कडकण्या बांधतात.

💥नवरात्रीमागील इतिहास

     शबरीला भेटल्यानंतर तिला भक्तीच फळ म्हणून रामांनी प्रकारची भक्ती दिली. त्यात हरिकथा, संतमिलन, ध्यास, आचरण, हे सगळे भक्तीचे प्रकार आहेत. त्यात नवदा भक्ती म्हणून एक भक्ती आहे, तिलाच नवरात्री असे म्हणतात.

रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारद मुनींनी श्रीरामांना नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामांनी लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाचा वध केला.महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे दिवस युद्ध करून देवीने नवमीच्या रात्री त्याला ठार मारले. त्यानंतर तिलामहिषासुरमर्दिनीम्हणू लागले. म्हणून आपण नवरात्री साजरी करतो.

     नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा सहस्र पटींनी कार्यरत असते. या वाढलेल्या देवीतत्त्वाचा लाभ घेण्यासाठी नवरात्री साजरी करण्याला महत्व प्राप्त होते. नवरात्रीच्या काळात देवीची मनोभावे पूजा अर्चा, ध्यानधारणा करावी आणिश्री दुर्गादेव्यै नमः हा नामजप अधिकाधिक करावा. कारण सगळ्या देवी ह्या दुर्गादेवीच्या अवतार आहेत. या काळात दिवसभरात श्री दुर्गादेवीला प्रार्थना करावी, ‘हे श्री दुर्गादेवी, नवरात्रोत्सवाच्या काळात नेहमीपेक्षा सहस्रपटींनी कार्यरत असलेल्या तुझ्या देवीतत्त्वाचा तुझ्या कृपेने अधिकाधिक लाभ होऊ दे.’

💥नवरात्रीतल्या रंगांचे महत्त्व =

दिवस पहिला, आणि रंग पांढरा=

महत्त्व :- कोणत्याही नवीन किंवा शुभ कार्याची किंवा नव्या गोष्टीची सुरुवात हि निरागसता, निर्मळ आणि स्वच्छतेने केली जाते. तसेच पांढरा रंग हा निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते. तसेच पांढरा रंग हा शांतता, निखळपणा, साधेपणा याचे प्रतिनिधीत्व करतो. आणि सत्य स्पष्टवक्तेपणा हि दर्शिवला जातो. तसेच नवरात्रीमधील पहिली देवीशैलपुत्रीह्या देवीला देखील पांढरा रंग खुप प्रिय आहे. म्हणून नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी ह्या रंगाचे कपडे परिधान केले जातात.

दिवस दुसरा, आणि रंग लाल =

महत्त्व :- हिंदू धर्मात लाल रंग हा सौभाग्याचे प्रतीक समजले जाते, तसेच लाल रंग हा ऊर्जा, लक्ष आकर्षित करणारा आहे. तसेच हा रंग सर्वात आकर्षक मानला जातो. शौर्य, धैर्य, संघर्ष,उत्साह वाढवतो. त्याच बरोबर लाल रंग मुळे मेंदूस उत्तेजना मिळते. आणि दुसऱ्या अवताराचीदेवी ब्रम्हचारिणीदेवीचा आवडता रंग हा लाल आहे. हा रंग शक्ती प्रदान करतो. म्हणून नवरात्री मध्ये दुसऱ्या दिवशी ह्या लाल रंगाचे कपडे परिधान करण्यास खूप महत्व दिले जाते .

दिवस तिसरा, आणि रंग निळा =

महत्त्व :- ह्या रंगात सत्यता, शांतीचा, श्रद्धाळू आणि उदार, विश्वासूपणाचे वैशिष्ट्य ह्या निळ्या रंगात आहे. तसेच हा रंग समुद्र आणि आकाशाची अमर्यादा खोली यांची सांगता करतो. देवीचा तिसरा अवतार म्हणजेचदेवी चंद्रघंटाह्या देवीचा हा निळा रंग खूप आवडता रंग आहे. म्हणून नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे परिधान केले जाते.

दिवस चौथा, आणि रंग पिवळा =

महत्त्व :- पिवळा रंग आत्मविश्‍वास वाढवणारा आहे. मनाला आनंदी आणि उत्साही ठेवणारा आहे. रंग हा सूर्यप्रकाशाचा रंग, असून तो ऊर्जेशी संबंधित आहे. तसेच मानसशास्त्राच्या नजरेतून बघितले तर आपली मानसिक शक्ती तसेच डाव्या मेंदूस सक्रिय करतो. हा रंग ज्यांना आवडतो त्यांची बुद्धी कुशाग्र असून त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते. ते वैयक्तिकरित्या कष्टाळू आणि प्रामाणिक असतात. देवीचा चौथा अवतार म्हणजेच कूष्मांडी देवीचा आवडता रंग हा पिवळा आहे. म्हणून नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात.

दिवस पाचवा, आणि रंग हिरवा

महत्त्व :- हिरवा रंगाचे महत्व हे आर्थिक उन्नती, मानसिक स्वास्थ्य, शांतता, समृद्धी हा रंग देतो. तसेच आपल्या तिरंग्यामधील हिरवा रंग, प्रगती, भरभराट, सहनशक्ती आर्थिक घडामोडी, त्याच बरोबर हा रंग प्रकृती, म्हणजेच निसर्गाचा विकास यांचे प्रतिनिधीत्व करतो. देवीचा पाचवा अवतार म्हणजेचआई स्कंदमातादेवीचा आवडता रंग हा हिरवा आहे. म्हणून नवरात्रीच्या पाचव्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले जातात .

दिवस सहावा, आणि रंग करडा

महत्त्व :- हा रंग आत्मविश्वास दर्शवितो, तसेच हा रंग काळा आणि पांढरा या दोन्ही रंगापासून बनविला जातो. रंगाचे गुणधर्म हे विरोधी असून ते दोन्ही गुणधर्म ह्या करड्या रंगाद्वारे एकत्रित येतात. देवीचा सहावा अवतार म्हणजेचकात्यायनीह्या देवीचा आवडता रंग हा करडा आहे. म्हणून नवरात्रीच्या सहाव्या दिवशी करड्या रंगाचे कपडे परिधान केले जातात.

दिवस सातवा, आणि रंग नारंगी

महत्त्व :- हा रंग वैराग्याचा रंग आहे. ज्याप्रमाणे भक्तीमध्ये ऋषीमुनी मोहभंग होतात आणि भ्रम आणि मोहापासून दूर जातात आणि भक्तीचा मार्ग स्वीकारतात. त्याच प्रमाणे नवरात्री मध्ये आपल्यासारख्या साधारण मानवाने सुद्धा भक्तीचा मार्ग स्वीकारावा आणि मनोभावे देवीची आराधना करत असतांना मनात कुठलाही लोभ, मोह येऊ नये यासाठी ह्या नारंगी रंगाचे खूप महत्व आहे .देवीचा सातवा अवतार म्हणजेचकालरात्रीह्या देवीचा आवडता रंग हा नारंगी आहे. म्हणून नवरात्रीच्या सातव्या दिवशी नारंगी रंगाचे कपडे परिधान केले जातात.

दिवस आठवा, आणि रंग मोरपंखी

महत्त्व :- डोळ्यांना प्रसन्न वाटणाऱ्या मोरपंखी रंगात निळ्या रंगातली सत्यता , शांती, विश्वास, एकनिष्ठता, आत्मविश्वास, श्रद्धाळूपणा आणि सचोटी दर्शविते आणि हिरव्या रंगातली सृजनता, आरोग्यसंपन्नता निसर्गाचा रंग, प्रगती, भरभराट, सहनशक्ती आणि नावीन्य आढळत असल्याने सौंदर्या शास्त्रानुसार तो एक परिपूर्ण रंग आहे. देवीचा आठवा अवतार म्हणजेचमहागौरीह्या देवीचा आवडता रंग हा मोरपंखी आहे. म्हणून नवरात्रीच्या आठव्या दिवशी मोरपंखी रंगाचे कपडे परिधान केले जातात.

दिवस नऊ, आणि रंग गुलाबी

महत्त्व :- गुलाबी रंग हा आनंदाचं प्रतीक आहे. गुलाबी रंग बघितल्यानंतर काही लोकांना शांत, आनंदी आणि समस्या नसलेलं आयुष्य आहे अस जाणवते , तसेच महत्वाकांक्षा, दृढ़ विश्वास आणि प्रेमाचे प्रतीक म्हणजे गुलाबी रंग. देवीचा नौवा अवतार म्हणजेचसिध्दिदात्रीह्या देवीचा आवडता रंग हा गुलाबी आहे. म्हणून नवरात्रीच्या नऊ व्या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे परिधान केले जातात.

                प्राचीन काळापासूनच नवरात्री साजरी केली जाते. देवी हि परमात्म्याचेच स्वरूप आहे. पूर्वीच्या काळी नवरात्री साजरी करतांना त्यात मूर्ती नसायची. नाच गाणी सुद्धा नव्हती. परंतु हल्ली देवीच्या मोठ्या मोठ्या मूर्ती बसवल्या जातात. तसेच गरबा, भोंडला यासारखे नाच गाण्याचे कार्यक्रम देखील सगळीकडे पाहायला मिळतात. दिवस जे नवरात्रीचे उत्सव आपण साजरे करतो त्यातून आपल्याला सुख, समाधान, शांती, परमानंद मिळतो. यामुळे घरामधील कलह नष्ट होतात. सामाजिक एकोपा निर्माण होतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा