माझा आवडता सण -ईद
ईद हा भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांपैकी प्रमुख सण आहे. ईद मुस्लिमांद्वारे साजरी केली जाते. द हा सण आपल्या देशात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणामध्ये एक प्रमुख सण आहे. ईद मुस्लिमांद्वारे पूर्ण भारतात भव्यपणे साजरी केली जाते. ईद फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेर जेथे जेथे मुस्लिमधर्मीय लोक राहतात तेथे भव्यपणे साजरी केली जाते.आपल्या देशात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. पण ईद हा मुस्लिम धर्माचा प्रमुख सण आहे. प्रत्येक वर्षात दोन ईद येतात एक ईद उल फितर आणि दुसरी ईद उल जुहा. यात ईद उल फितर ज्याला रमजान ईद पण म्हटले जाते, हा मुस्लिमांचा प्रमुख सण आहे. मला सुद्धा रमजान ईद खूप आवडते.
रमजान चा महिना खूपच पवित्र असतो. या संपूर्ण महिन्यात मुस्लिम लोक रोजा म्हणजेच उपवास ठेवतात आणि महिन्याच्या शेवटी उपवास सोडून रमजान ईद साजरी केली जाते. रमाजन चा महिना मुस्लिम कॅलेंडर चा नववा महिना असतो. रमजान ईद ला नमाज पाठ करून प्रार्थना केली जाते या नंतर भोजन करून रोजे सोडले जातात व सर्व मुस्लिम बांधव एकमेकाशी भेटून आनंद साजरा करतात.
नमाज पूर्ण झाल्यावर सर्व मुस्लीम कुराण मध्ये सांगितल्याप्रमाणे गरिबांना अन्न दान करतात. या दिवशी मुस्लिम मशिदी मध्ये लायटिंग लाऊन सजवतात. हा दिवस खूपच आनंदाचा दिवस असतो. ईद सर्वांना मिळून राहण्याचा संदेश देते. ईद ची ही शिकवण सर्वांनी आत्मसात करायला हवी. मी कुराण मध्ये सांगितल्याप्रमाणे जास्तीजास्त चांगली कामे करील. मला ईद खूप आवडते आणि माझा आवडता सण ईद आहे.


.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा