शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२५

माझा आवडता समाजसुधारक/समाजसेवक मराठी निबंध | Maza avadta samaj sudharak

 

माझा आवडता समाजसुधारक/समाजसेवक मराठी निबंध | Maza avadta samaj sudharak

     आज आपण माझा आवडता समाजसुधारक या विषयावर मराठी निबंध प्राप्त करणार आहोत हा निबंध महात्मा ज्योतिबा फुले निबंध मराठी आहे. ह्या निबंधला तुम्ही शाळा कॉलेज मध्ये वापरू शकतात. तर चला सुरू करूया..

आपला देश भारत हे एक विशाल राष्ट्र आहे. या देशात सर्व जाती धर्माचे लोक एकजुटीने राहतात. परंतु बऱ्याचदा काही दृष्ट लोक जाती धर्मांमध्ये भांडणे लावून देशात दंगे घडवून आणतात. आपल्या देशात एकीकडे देशाला तोडण्यासाठी कार्य करणारे दृष्ट लोक आहेत तर दुसरी कडे असेही काही समाजसुधारक होऊन गेले ज्यांनी आपल्या देशाची एकता, अंखंडता टिकवण्यासाठी मोलाचे कार्य केले. या महान समाजसेवकांनी देशातील कुप्रथांना थांबवण्याचे आणि गरिबांची मनोभावे सेवा करण्याचे कार्य केले. 



तसे पाहता आपल्या देशातील सर्वच समाज सुधारकांचे कार्य मोलाचे आहे परंतु माझे आवडते समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले हे आहेत. ज्योतिबा फुले हे आपल्या देशाचे एक मराठी लेखक, विचारवंत आणि थोर समाज सुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि अस्पृश्य समाजाच्या समस्या सर्वांसमोर ठेवल्या. याशिवाय महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्याबद्दल मुंबई च्या जनतेने त्यांना "महात्मा" ही पदवी बहाल केली. 


महात्मा फुले यांचा जन्म ११  एप्रिल १९२७  ला सातारा जिल्ह्यातील एका लहानशा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. ज्योतिबा जेव्हा नऊ महिन्याचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. जोतिबांचा विवाह तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. इ.स. १८४२  मध्ये त्यांनी शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशनरी शाळेत प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख असल्याने त्यांनी पाच-सहा वर्षातच आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. ज्या काळात ज्योतिबा यांनी आपले शिक्षण केले त्या काळात देशात दलित वर्गाला शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रियांनाही चूल व मूल सांभाळण्यास सांगून त्यांनाही शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते. 

ज्योतिबा फुले यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या सोबत मिळून स्त्री व अस्पृश्य शिक्षणाचे कार्य सुरू केले. समाजातील स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी 1848 साली पुण्यातील भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. सुरुवातीचा काळात या शाळेत फक्त 3 मुलींनी प्रवेश घेतला. या शिवाय समाजाच्या भयाने शाळेत शिकवण्यासाठी देखील शिक्षक तयार नव्हते. तेव्हा ज्योतिबा यांनी आपली पत्नी सावित्रीबाई ला शिक्षित करून त्यांना शाळेत शिकवण्यासाठी तयार केले. मुलींच्या या शाळेच्या प्रथम मुख्याध्या पिका सावित्रीबाई फुले होत्या.

 विद्याध्यायनासाठी ज्यांचा सतत असे प्रयास,

त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर प्रवास.

परि स्त्री शिक्षण; हा एकची असे ध्यास, हा एकची असे ध्यास,

या उक्तीप्रमाणे महात्मा जोतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्‍नांनी घडविले होते. महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते. आशा या महान समाज सुधारकांनी २७  नोव्हेंबर १८९०  रोजी पक्षघात च्या झटक्याने आपला देह त्यागला. 



बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

नाम

                                      मराठी व्याकरण =    नाम

नामाची व्याख्या : एखाद्या प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या किंवा काल्पनिक, सजीव किंवा निर्जीव गोष्टींना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेलं नाव म्हणजे नाम. 

नामाचे प्रकार

नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत. 

  • सामान्य नाम 
  • विशेष नाम 
  • भाववाचक नाम 

१. सामान्य नाम

व्याख्या -एकाच जातीच्या पदार्थातील सामान गुणधर्मांमुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. या नामातून संपूर्ण जातीचा बोध होतो.  

·       उदा. नदी, पुस्तक, मुलगा, माणूस, शहर, रस्ता, प्राणी, पक्षी मुलगा, मुलगी, घर, शाळा, पुस्तक, नदी, शहर, साखर, पाणी, दूध, सोने, कापड, सैन्य, वर्ग इ

उदाहरणार्थ:

     १. नदी डोंगरामध्ये उगम पावते आणि समुद्राला जाऊन मिळते. 

     २. पुस्तक हा ज्ञानाचा कधीही न आटणारा झरा आहे.

 

अ) समुदायवाचक सामान्य नाम

व्याख्या - वाक्यातील ज्या शब्दातून संपूर्ण समूहाचा बोध होतो त्याला समुदायवाचक नाम असे म्हणतात. 

उदा. कळप, घोळका, जुडगा, थवा, संघ, तुकडी, गट इत्यादी. 

उदाहरणार्थ:

       १. पक्ष्यांचा थवा उंच आकाशात उडत होता. 

       २. सैनिकांची एक तुकडी सीमेवर तैनात आहे. 

ब) पदार्थवाचक सामान्य नाम

व्याख्या - जे पदार्थ संख्यांमध्ये न मोजता इतर परिमाणांनी मोजले जातात त्यांना पदार्थवाचक सामान्य नाम असे म्हणतात. 

उदा. सोने, तेल, दूध, तांदूळ इत्यादी. 

उदाहरणार्थ:

          १. मी दोन तोळे सोने खरेदी केले. 

          २. घरात पाच लिटर तेलाचा डबा ठेवलेला आहे. 

२ .विशेष नाम 

व्याख्या -एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे किंवा ठिकाणाचे विशिष्ट नाव दर्शवणाऱ्या शब्दाला विशेष नाम असे म्हणतात. 

  • उदा. भारत, पृथ्वी, सचिन, प्रियांका, हिमालय, गोदावरी, लाल, राम, आशा, हिमालय, गंगा, भारत, धुळे, मुंबई, दिल्ली, सचिन, अमेरिका,गोदावरी इ.

उदाहरणार्थ:

          १. गंगा ही भारतातील एक पवित्र नदी आहे. 

          २. सचिन तेंडुलकर हा एक महान खेळाडू आहे. 

३. भाववाचक नाम 

ज्या नामामुळे व्यक्ती, वस्तू किंवा पदार्थ यांच्या गुण, भावना अथवा धर्माचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. 

उदा. प्रामाणिक, राग, सुंदर, उदास, हुशार, आळशी, प्रेम, मेहनती धैर्य, किर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इ.

उदाहरणार्थ:

         १. सतीश खूप मेहनती मुलगा आहे. 

         २. राधिका हुशार मुलगी आहे. 

 

 सर्वनाम-                      

वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्‍या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.

सर्वनामाचे मुख्य प्रकार सहा आहेत.

  • पुरुषवाचक सर्वनाम
  • दर्शक सर्वनाम
  • संबंधी सर्वनाम
  • प्रश्नार्थक सर्वनाम
  • सामान्य / अनिश्चित सर्वनाम
  • आत्मवाचक सर्वनाम

1. पुरुषवाचक सर्वनाम :

याचे तीन उपप्रकार पडतात.

1. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम :

बोलणारा स्वत:विषयी. बोलतांना किंवा लिहितांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास प्रथम पुरुषी सर्वनाम असे म्हणतात.

उदा – मी, आम्ही, आपण, स्वत: इ

  •  मी गावाला जाणार
  • आपण खेळायला जावू.

2 .व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम :

जेव्हा बोलणारा ज्यांच्याशी बोलावयाचे आहे. त्याचा उल्लेख करतांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्या सर्वनामास व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात.

उदा – तो, तुम्ही, आपण, स्वतः इ

  • आपण कोठून आलात?
  • तुम्ही घरी कधी येणार?

3. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम :

जेव्हा बोलणारा दुसर्‍या व्यक्तीशी बोलतांना व तिसर्‍या व्यक्तींचा उल्लेख करतांना ज्या, ज्या सर्वनामाचा वाक्यात उपयोग करतो त्या सर्वनामांस तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात.

उदा –  तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः इ.

  • त्याने मला कामाला लावले पण स्वतःमात्र आला नाही.
  • त्या सर्वजण इथेच येत होत्या.

2. दर्शक सर्वनाम :

जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरीता जे सर्वनाम वापरले जाते. त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात.

उदा – हा, ही, हे, तो, ती, ते.

  •  ही माझी वही आहे
  • हा माझा भाऊ आहे.
  • ते माझे घर आहे.
  • तो आमचा बंगला आहे.

3. संबंधी सर्वनाम :

वाक्यात पुढे येणार्‍या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणार्‍या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात.

उदा – जो, जी, जे, ज्या

  • – ही सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात.

ही सर्वनामे गौणवाक्याच्या सुरवातीलाच येतात.

असे गौण वाक्य हे गौण वाक्याचे विशेषण हे प्रकार असते.

  • जे चकाकते ते सारेच सोने नसते.
  • जो तळे राखील तो पाणी चाखील.

4. प्रश्नार्थक सर्वनाम :

ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्या सर्वनामास प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.

  उदा – कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला

  • तुमच्यापैकी कोण धडा वाचणार?
  • तुझ्याकडे किती रुपये आहेत?
  • तू कोठे जातोस?

5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम :

कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला, ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे ते निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम म्हणतात.

दा.

  • त्या पेटीत काय आहे ते सांग.
  • कोणी कोणास हसू नये.
  • कोण ही गर्दी !

6. आत्मवाचक सर्वनाम :

एकाच वाक्यात आधी आलेल्या नामाचा किंवा सर्वनामाचा पुन्हा उल्लेख करतांना ज्या सर्वनामाचा उपयोग होतो. त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात.

  उदा.

  • 1. मी स्वतःत्याला पहीले.
  • 2. तू स्वतः मोटर चालवशील का?
  • 3. तो आपण होवून माझ्याकडे आला.
  • 4. तुम्ही स्वतःला काय समजतात.

मराठीत मूळ 9 सर्वनाम 

मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतःया मूळ सर्वनामापैकी – 

  •  लिंगानुसार बदलणारी तीन सर्वनाम आहेत – तो, हा, जो.
  • तोतो, ती, ते
  • हाहा, ही, हे
  • जो-जो, जी, जे

मूल सर्वनामापैकी वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे आहेत. – मी, तू, तो, हा, जो इ

  • मीआम्ही
  • तूतुम्ही
  • तोतो, ती, ते (एकवचनी) ते, त्या, ती (अनेकवचनी)
  • हाहा, ही, हे (एकवचनी) हे, ह्या, ही (अनेकवचनी)
  • जोजो, जी, जे (एकवचनी) जे, ज्या, जी (अनेकवचनी)

विशेषण

 व्याख्या –नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात.

विशेषणांचे प्रकार –

  • विशेषणांचे मुख्य प्रकार तीन आहेत.
  • गुणविशेषण
  • संख्याविशेषण
  • सार्वनामिक विशेषण

गुणविशेषण

व्याख्या – संख्याविशेषण-

ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्याविशेषण असे म्हणतात.

संख्याविशेषणाचे पुढील पोटप्रकार आहेत –

·       गणनावाचक संख्याविशेषण

·       क्रमवाचक संख्याविशेषण

·       आवृत्तीवाचक संख्याविशेषण

·       पृथकत्ववाचक संख्याविशेषण

·       अनिश्चित संख्याविशेषण.

गणनावाचक संख्याविशेषण

पुढील शब्द          

 दहा मुलीचौदा भाषासाठ रुपयेसहस किरणेअर्धा तासदोघे मुलगे इत्यादी.

वरील शब्दांतील दहा, चौदा, साठ, सहस, अर्धा, दोघे या विशेषणांचा उपयोग केवळ गणती किंवा गणना करण्यासाठी होतो. त्यांस गणनावाचक संख्याविशेषणे म्हणतात.
क्रमवाचक संख्याविशेषण

पुढील शब्द पाहा.

पहिला वर्गचौथा बंगलाआठवी इयत्तासाठावे वर्ष.वरील शब्दांतील पहिला, चौथा, आठवी, साठावे’ ही विशेषणे वस्तूंचा क्रम दाखवितात.

अशा विशेषणांना ‘क्रमवाचक संख्या विशेषणेअसे म्हणतात. प्रथमा, द्वितीया… सप्तमी ही संस्कृतातील क्रमवाचक संख्याविशेषणे मराठीतही वापरतात.

आवृत्तिवाचक संख्याविशेषणे

पुढील शब्द पाहा.

चौपट मुलेदसपट रुपयेदुहेरी रंगद्विगुणित आनंद,वरील शब्दांतील ‘चौपट, दसपट, दुहेरी, द्विगुणित’ ही विशेषणे संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवितात. त्यांना ‘आवृत्तिवाचक संख्याविशेषणे’ असे म्हणतात.

पृथकत्ववाचक संख्याविशेषण

पुढील शब्द पाहा.

एकेक मुलगादहा-दहांचा गट. यातील ‘एकेक, दहा-दहा’ ही विशेषणे वेगवेगळा (किंवा पृथक) असा बोध करून देतात.

अशा विशेषणांना पृथकत्ववाचक संख्याविशेषणे असे म्हणतात.

अनिश्चित संख्याविशेषण

सर्व रस्तेथोडी मुलेकाही पक्षीइतर लोकइत्यादी देश.वरील शब्दांतील ‘सर्व, थोडी, काही, इतर, इत्यादी’ ही संख्याविशेषणे निश्चित अशी संख्या दाखवीत नाहीत, म्हणून त्यांना ‘अनिश्चित संख्याविशेषणे’ असे म्हणतात. जसे- अन्य, अल्प, एकंदर.

सार्वनामिक विशेषण –

पुढील शब्दसमूह पाहा.

हा मनुष्य,तो पक्षी,तिच्या साड्या,असल्या झोपड्या,कोणता गाव.

वरील शब्दांतील ‘हा, तो, मी, ती, असा, कोण’ ही मूळची सर्वनामे आहेत.

सर्वनाम हे नामाऐवजी येत असते. पण वरील शब्दांत सर्वनामांच्यापुढे नामे आली आहेत. ती आता सर्वनामे राहिली नसून ती त्यांच्यापुढे आलेल्या नामांबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणजे ती विशेषणांचे कार्य करतात.

सर्वनामांपासून बनलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषणे किंवा सर्वनामसाधित विशेषणे असे म्हणतात

उदा. नामसदृश विशेषणे
(
१) श्रीमंत माणसांना गर्व असतो. (विशेषण)
(
२) श्रीमंतांना गर्व असतो. (नाम)
• 
दर्शक विशेषणे : ही मुलगी चलाख आहे.
• 
संबंधी विशेषणे: जो मुलगा व्यायाम करतो, तो सशक्त होतो.
प्रश्रार्थक विशेषणे: कोण मनुष्य येऊन गेला?
त्याने काय पदार्थ आणले ?
• 
सार्वनामिक विशेषणे: आम्हां मुलांना कोण विचारतो?

क्रियापद म्हणजे काय?

वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द जो वाक्याच्या शेवटी येतो त्याला असे म्हणतात. क्रिया दर्शविणे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणे, काळ दर्शविणे, हे क्रियापदाचे कार्य असते.

उदाहरणार्थ, 1) सचिन क्रिकेट खेळतो. 2) शेतकरी शेतात राबतात.

वरील उदाहरणांमध्ये खेळतो आणि राबवतो हि क्रियापदे आहे.

क्रियापदाचे प्रकार

क्रियापदाचे मुख्यत: दोन प्रकार पडतात. सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद.

अ) सकर्मक क्रियापद

सकर्मक क्रियापदामध्ये क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते.

ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याकरिता जेव्हा कर्माची / क्रियेची गरज असते, त्या क्रियापदाला त्या वाक्यातील सकर्मक क्रियापद असे म्हणतात.

सकर्मक क्रियापद उदाहरणे –

1.   गणेशने पतंग उडवला. (पतंग उडवण्याची क्रिया)

2.   श्वेताने फणस खाल्ले. (फणस खाण्याची क्रिया)

3.   दादाने सायकल आणली. (सायकल आणण्याची क्रिया)

4.   सविताने पेटी वाजवली. (पेटी वाजवण्याची क्रिया)

वरील उदाहरणांमध्ये उडवला, खाल्ले, आणली, आणि वाजवली हि सकर्मक क्रियापदे आहेत.

ब) अकर्मक क्रियापद

ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते, त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ –

·       मी रस्त्यात पडलो.

·       दादा घरात आला.

·       सुनीता उद्या येईल.

सकर्मक आणि अकर्मक क्रियापद कसे ओळखावे?

सकर्मक अकर्मक म्हणजे काय – मित्रांनो जर तुम्हाला मराठी व्याकरणातील काही विषय अगदी नीटपणे समजून घ्यायचे असतील विशेषत: प्रयोग तर तुम्हाला वाक्यातील सकर्मक आणि अकर्मक क्रियापद ओळखता येणे गरजेचे आहे.

त्यामुळे या विषयावर आम्ही अधिक भर दिला आहे जेणेकरून तुम्ही ते सहजपणे ओळखू शकता.

आता आपण शिकलो की वाक्यात कर्म असेल तर ते सकर्मक क्रियापद आणि जर कर्म नसेल तर ते अकर्मक क्रियापद होय.

पण, वाक्यात कर्म आहे की नाही ते कस ओळखायचं?

त्यासाठी आम्ही खाली काही ट्रिक्स दिल्या आहेत ज्या वापरुन तुम्ही अगदी सहजपणे वाक्य नेमकं कोणत आहे ते ओळखू शकता.

वाक्यातील कर्ता शोधणे – वाक्यातील क्रियापद शोधून त्याला ‘णारी, णारा, णारे’ हे प्रत्यय लावून प्रश्न विचारा.

वाक्यातील कर्म शोधणे – कर्त्याला ‘काय, कोणाला, कोणाचं’ हे प्रश्न विचारा.

चला तर मग काही उदाहरणे पाहुयात आणि दिलेल्या ट्रिक्स वापरुन वाक्याचे प्रकार शोधूयात.

·       उदाहरण 1. आई भाजी आणते.

वरील वाक्यात ‘आणते’ या क्रियापदाला ‘आणणारी कोण?’ हा प्रश्न विचारल्यास आपल्याला ‘आई’ हे उत्तर मिळते. म्हणजेच या वाक्यात ‘आई’ हा शब्द कर्ता आहे.

आता कर्त्याला ‘काय आणते?’ हा प्रश्न विचारल्यास आपल्याला उत्तर ‘भाजीअसे मिळते म्हणजेच हे वाक्यातील कर्म झाले.

आत, या वाक्यात कर्म आहे म्हणजेच हे वाक्य सकर्मक आहे.

·       उदाहरण 2. रमेश छान लिहतो.

आता या वाक्यात ‘लिहणारा कोण?’ तर रमेश (कर्ता). रमेश काय/कोणाला/कोणास लिहतो असा प्रश्न विचारल्यास ‘छान’ हे उत्तर बरोबर येत नाही त्यामुळे या वाक्यात कर्म नाही.

आणि म्हणूनच हे वाक्य अकर्मक आहे.

·       उदाहरण 3. विदूषक प्रेक्षकांना हसवतो.

या वाक्यात ‘हसवणारा कोण?’ विदूषक (कर्ता). ‘कोणाला हसवतो?’ प्रेक्षकांना (कर्म).

आणि वाक्यात कर्म आहे म्हणजे ते वाक्य सकर्मक वाक्य आहे.

लक्षात घ्या: या ट्रिक्स ना काही अपवाद सुद्धा आहेत. वाक्यामध्ये काही क्रियापदे अशी असतात जी मूळची अकर्मक असतात आणि ती वाक्यामध्ये आल्यास ते वाक्य सकर्मक भासते.

·       उदाहरण 4. मला दूध आवडते.

आता वरील वाक्यामध्ये ‘आवडणारे कोण?’ दूध (कर्ता), पण जरी ‘काय/कोणाला/कोणास’ हे ‘मला’ या शब्दासाठी बरोबर वाटत असले तरी ते कर्म नाही कारण दुधाची क्रिया ही माझ्यावर म्हणजेच ‘मला’ या शब्दावर होत नाही.

आणि म्हणूनच हे अकर्मक क्रियापद आहे.

जर वाक्याच्या शेवटी 'आवडते, आवडतो, आवडतात, आहे, असतो, पाहिजे, वाटते' ही क्रियापदे वाक्यात मुख्य क्रियापदासारखे काम करत असतील तर ते वाक्य अकर्मक असते.

त्यामुळे कृतीपत्रिकेत दिलेले वाक्य सकर्मक आहे की अकर्मक हे ओळखण्यासाठी तुम्हाला नियमित सरावाची गरज आहे.

क्रियापदाचे अन्य प्रकार

क्रियापदाचे काही अन्य प्रकार सुद्धा आहेत. चला तर मग त्यांचाही अभ्यास करून घेऊ.

1. द्विकर्मक क्रियापद

द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय? – ज्या क्रियापदास दोन कर्म लागतात त्यास द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात.

उदा. 1) आजीने नातीला गोष्ट सांगितली. 2) गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात.

2. उभयविध क्रियापद

जेव्हा एकच क्रियापद हे दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही प्रकारे वापरता येते, त्यास उभयविध क्रियापद असे म्हणतात.

उदा. त्याने गाडीचे दार उघडले. त्याच्या गाडीचे दार उघडले.

3. सहाय्यक क्रियापद

जेव्हा धातुसाधित व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा धतुसाधिताला सहाय्य करणार्‍या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद म्हणतात.

उदा. 1) राम सकाळी खेळत असतो. 2) पक्षी गाणे गाऊ लागले.

4. संयुक्त क्रियापद

धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांनी मिळून बनलेल्या क्रियापदास संयुक्त क्रियापद असे म्हणतात.

संयुक्त क्रियापद उदाहरण – घरासमोर मुले खेळू लागली.

या वाक्यामध्ये ‘खेळू’ हे धातुसाधित तर ‘खेळू’ हे सहाय्यक क्रियापद आहे.

5. प्रयोजक क्रियापद

जेव्हा कर्ता ती क्रिया स्वत: करीत नसून दुसर्‍या कोणालातरी करावयास लावीत आहे असा अर्थ व्यक्त होतो, त्या क्रियापदास प्रयोजक क्रियापद असे म्हणतात.

उदा. त्याने त्याच्या मित्राला बंद खोलीतून सोडविले.

·       मातोश्री जिजाबाईंनी छत्रपती शिवरायांना घडविले.

6. शक्य क्रियापद

वाक्यामधील ज्या क्रियापदाद्वारे कर्त्याच्या ठिकाणी क्रिया करण्याची शक्यता व्यक्त होते, त्या क्रियापदाला शक्य क्रियापद असे म्हणतात.

उदा. 1) त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते. 2) आता राणी अक्षर गिरवते.

7. साधित क्रियापद

विविध जातींच्या शब्दांपासून तयार होणार्‍या धातूंना साधित धातू असे म्हणतात व अशा साधित धातूंना प्रत्यय लागून तयार होणार्‍या क्रियापदास साधित क्रियापद असे म्हणतात.

उदा.,

·       माझ्या घरातील वस्तू तो नेहमी हाताळतो.

·       रस्त्यात भीक मागणार्‍या लहान मुलाला पाहून माझे डोळे पाणावले.

8. सिद्ध क्रियापद

या, जे, कर, उठ, बस असे जे मूळचे धातू आहेत त्यांना सिद्ध धातू असे म्हणतात. व या धातूना प्रत्यय लागून तयार होणार्‍या क्रियापदाला सिद्ध क्रियापद असे म्हणतात.

उदा. 1) आम्ही सकाळी लवकर उठतो. 2) बाळ शांत निजला.

9. अनियमित क्रियापद

मराठीत काही धातू असे आहेत ज्यांना काळाचे व अर्थाचे सर्व प्रत्यय न लागता ते थोड्या वेगळ्याच अर्थाने चालतात, त्यांना अनियमित क्रियापद असे म्हणतात.

उदा. 1) स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे. 2) असे वागणे बरे न्हवे.

10. भावकर्तुक क्रियापद

जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा मूळ अर्थ किंवा भाव हाच त्यांचा कर्ता मानावा लागतो अशा क्रियापदांना भावकर्तुक क्रियापद असे म्हणतात.

उदा.

·       मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले.

·       मुंबईला जाताना पोहोचण्यापूर्वीच उजाडले.

11. होकारार्थी क्रियापद / करणरूप क्रियापद

वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान होकारार्थी असेल तर त्याला होकारार्थी क्रियापद म्हणतात.

उदा. 1) मी सकाळी नियमित व्यायाम करते. 2) सर्वांनी वृक्षारोपण करावे.

12. नकारार्थी क्रियापद / अकरणरूप क्रियापद

वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान नकारार्थी असेल तर त्याला नकारार्थी क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ –

·       परवानगी शिवाय आत येऊ नये.

·       घराजवळ कचरा करु नये.

·       सकर्मक क्रियापदामध्ये क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते.

·       ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याकरिता जेव्हा कर्माची / क्रियेची गरज असते, त्या क्रियापदाला त्या वाक्यातील सकर्मक क्रियापद असे म्हणतात.

·       सकर्मक क्रियापद उदाहरणे –

·       गणेशने पतंग उडवला. (पतंग उडवण्याची क्रिया)

·       श्वेताने फणस खाल्ले. (फणस खाण्याची क्रिया)

·       दादाने सायकल आणली. (सायकल आणण्याची क्रिया)

·       सविताने पेटी वाजवली. (पेटी वाजवण्याची क्रिया)

·       वरील उदाहरणांमध्ये उडवला, खाल्ले, आणली, आणि वाजवली हि सकर्मक क्रियापदे आहेत.

·       ब) अकर्मक क्रियापद

·       ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते, त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात.

·       उदाहरणार्थ –

·       मी रस्त्यात पडलो.

·       दादा घरात आला.

·       सुनीता उद्या येईल.

·       सकर्मक आणि अकर्मक क्रियापद कसे ओळखावे?

·       सकर्मक अकर्मक म्हणजे काय – मित्रांनो जर तुम्हाला मराठी व्याकरणातील काही विषय अगदी नीटपणे समजून घ्यायचे असतील विशेषत: प्रयोग तर तुम्हाला वाक्यातील सकर्मक आणि अकर्मक क्रियापद ओळखता येणे गरजेचे आहे.

·       त्यामुळे या विषयावर आम्ही अधिक भर दिला आहे जेणेकरून तुम्ही ते सहजपणे ओळखू शकता.

·       आता आपण शिकलो की वाक्यात कर्म असेल तर ते सकर्मक क्रियापद आणि जर कर्म नसेल तर ते अकर्मक क्रियापद होय.

·       पण, वाक्यात कर्म आहे की नाही ते कस ओळखायचं?

·       त्यासाठी आम्ही खाली काही ट्रिक्स दिल्या आहेत ज्या वापरुन तुम्ही अगदी सहजपणे वाक्य नेमकं कोणत आहे ते ओळखू शकता.

·       वाक्यातील कर्ता शोधणे – वाक्यातील क्रियापद शोधून त्याला ‘णारी, णारा, णारे’ हे प्रत्यय लावून प्रश्न विचारा.

·       वाक्यातील कर्म शोधणे – कर्त्याला ‘काय, कोणाला, कोणाचं’ हे प्रश्न विचारा.

·       चला तर मग काही उदाहरणे पाहुयात आणि दिलेल्या ट्रिक्स वापरुन वाक्याचे प्रकार शोधूयात.

·       आणि म्हणूनच हे अकर्मक क्रियापद आहे.

·       जर वाक्याच्या शेवटी 'आवडते, आवडतो, आवडतात, आहे, असतो, पाहिजे, वाटते' ही क्रियापदे वाक्यात मुख्य क्रियापदासारखे काम करत असतील तर ते वाक्य अकर्मक असते.

·       त्यामुळे कृतीपत्रिकेत दिलेले वाक्य सकर्मक आहे की अकर्मक हे ओळखण्यासाठी तुम्हाला नियमित सरावाची गरज आहे.

·       क्रियापदाचे अन्य प्रकार

क्रियापदाचे काही अन्य प्रकार सुद्धा आहेत. चला तर मग त्यांचाही अभ्यास करून घेऊ.

·       1. द्विकर्मक क्रियापद

·       द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय? – ज्या क्रियापदास दोन कर्म लागतात त्यास द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात.

·       उदा. 1) आजीने नातीला गोष्ट सांगितली. 2) गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात.

·       2. उभयविध क्रियापद

·       जेव्हा एकच क्रियापद हे दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही प्रकारे वापरता येते, त्यास उभयविध क्रियापद असे म्हणतात.

·       उदा. त्याने गाडीचे दार उघडले. त्याच्या गाडीचे दार उघडले.

·       3. सहाय्यक क्रियापद

·       जेव्हा धातुसाधित व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा धतुसाधिताला सहाय्य करणार्‍या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद म्हणतात.

·       उदा. 1) राम सकाळी खेळत असतो. 2) पक्षी गाणे गाऊ लागले.

·       4. संयुक्त क्रियापद

·       धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांनी मिळून बनलेल्या क्रियापदास संयुक्त क्रियापद असे म्हणतात.

·       संयुक्त क्रियापद उदाहरण – घरासमोर मुले खेळू लागली.

·       या वाक्यामध्ये ‘खेळू’ हे धातुसाधित तर ‘खेळू’ हे सहाय्यक क्रियापद आहे.

·       5. प्रयोजक क्रियापद

·       जेव्हा कर्ता ती क्रिया स्वत: करीत नसून दुसर्‍या कोणालातरी करावयास लावीत आहे असा अर्थ व्यक्त होतो, त्या क्रियापदास प्रयोजक क्रियापद असे म्हणतात.

·       उदा.,

·       त्याने त्याच्या मित्राला बंद खोलीतून सोडविले.

·       मातोश्री जिजाबाईंनी छत्रपती शिवरायांना घडविले.

·       6. शक्य क्रियापद

·       वाक्यामधील ज्या क्रियापदाद्वारे कर्त्याच्या ठिकाणी क्रिया करण्याची शक्यता व्यक्त होते, त्या क्रियापदाला शक्य क्रियापद असे म्हणतात.

·       उदा. 1) त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते. 2) आता राणी अक्षर गिरवते.

·       7. साधित क्रियापद

·       विविध जातींच्या शब्दांपासून तयार होणार्‍या धातूंना साधित धातू असे म्हणतात व अशा साधित धातूंना प्रत्यय लागून तयार होणार्‍या क्रियापदास साधित क्रियापद असे म्हणतात.

·       उदा.,

·       माझ्या घरातील वस्तू तो नेहमी हाताळतो.

·       रस्त्यात भीक मागणार्‍या लहान मुलाला पाहून माझे डोळे पाणावले.

·       8. सिद्ध क्रियापद

·       या, जे, कर, उठ, बस असे जे मूळचे धातू आहेत त्यांना सिद्ध धातू असे म्हणतात. व या धातूना प्रत्यय लागून तयार होणार्‍या क्रियापदाला सिद्ध क्रियापद असे म्हणतात.

·       उदा. 1) आम्ही सकाळी लवकर उठतो. 2) बाळ शांत निजला.

·       9. अनियमित क्रियापद

·       मराठीत काही धातू असे आहेत ज्यांना काळाचे व अर्थाचे सर्व प्रत्यय न लागता ते थोड्या वेगळ्याच अर्थाने चालतात, त्यांना अनियमित क्रियापद असे म्हणतात.

·       उदा. 1) स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे. 2) असे वागणे बरे न्हवे.

·       10. भावकर्तुक क्रियापद

·       जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा मूळ अर्थ किंवा भाव हाच त्यांचा कर्ता मानावा लागतो अशा क्रियापदांना भावकर्तुक क्रियापद असे म्हणतात.

·       उदा.,

·       मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले.

·       मुंबईला जाताना पोहोचण्यापूर्वीच उजाडले.

·       11. होकारार्थी क्रियापद / करणरूप क्रियापद

·       वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान होकारार्थी असेल तर त्याला होकारार्थी क्रियापद म्हणतात.

·       उदा. 1) मी सकाळी नियमित व्यायाम करते. 2) सर्वांनी वृक्षारोपण करावे.

·       12. नकारार्थी क्रियापद / अकरणरूप क्रियापद

·       वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान नकारार्थी असेल तर त्याला नकारार्थी क्रियापद असे म्हणतात.

·       उदाहरणार्थ –

·       परवानगी शिवाय आत येऊ नये.

·       घराजवळ कचरा करु नये.