बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३

खेळाचे महत्व

             🏀🎾🏂🏈 खेळाचे महत्व    🏀🎾🏂🏈



        मनुष्याला रोगांपासून दूर राहण्यासाठी निरोगी शरीर असणे आवश्यक आहे. एका निरोगी शरीरातूनच निरोगी मन व बुद्धीचा विकास होतो. शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी खेळांचे भरपूर महत्त्व आहे. खेळांमुळे शरीर व मन दोघेही निरोगी राहतात. खेळ खेळल्याने मनुष्यात धैर्य, सहनशीलता आणि मानवी गुणांचा विकास होतो.खेळ आजच्या व्यस्त जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. खास करून विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळांचे महत्त्व भरपूर आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला दिवसातून थोडा वेळ काढून खेळायला हवे. खेळ खेळल्याने तंदुरुस्ती सोबत मनोरंजनही होते. 

       मित्रांनो आजच्या या लेखात आपण खेळांचे महत्व पाहणार आहोत. जगात कोणताही व्यक्ति असो त्याने कधी न कधी कोणता न कोणता खेळ खेळलेलाच असतो. खेळाचे अनेक फायदे आहेत आणि या लेखाद्वारे मी तुम्हाला तेच फायदे सांगणार आहे. 

     तर चला आजच्या या लेखाला सुरू करूया.  कोणताही खेळ खेळल्याने व्यक्तीचा शारीरिक विकासासोबत मानसिक विकासही होतों. खेळताना डोळे, मेंदू व शरीराच्या प्रत्येक अवयवाचा वापर करावा लागतो. खेळांमुळे शरीराचे संतुलनही वाढते. नियमित कोणतातरी खेळ खेळल्याने चित्त प्रसन्न राहते. शारीरिक अवयवांचा व्यवस्थित विकास होतो. मनात उल्हास आणि उत्साह वाढून आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. 

खेळांचे देखील वेगवेगळे प्रकार असतात काही खेळ शारीरिक तर काही मानसिक असतात. शारीरिक खेळ खेळण्यासाठी शरीराला श्रम करावे लागते, तर मानसिक खेळांमध्ये मेंदूचे कार्य असते. फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, क्रिके, टेनिस, कबड्डी इत्यादी शारीरिक खेळ आहेत. या खेळांना खेळण्यासाठी शारीरिक ताकत लागते. दुसरीकडे बुद्धिबळ, पत्ते, चौपट इत्यादी मानसिक खेळ आहेत, ज्यांना खेळण्यासाठी मानसिक शक्तीचा वापर करावा लागतो. 

    कोणताही खेळ खेळल्याने व्यक्तीचा शारीरिक विकासासोबत मानसिक विकासही होतों. खेळताना डोळे, मेंदू व शरीराच्या प्रत्येक अवयवाचा वापर करावा लागतो. खेळांमुळे शरीराचे संतुलनही वाढते. नियमित कोणतातरी खेळ खेळल्याने चित्त प्रसन्न राहते. शारीरिक अवयवांचा व्यवस्थित विकास होतो. मनात उल्हास आणि उत्साह वाढून आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा