प्लास्टिक मुक्त
भारत मराठी निबंध | plastic Mukt Bharat
आज भारतच नव्हे तर संपूर्ण जगात प्लास्टिक चर्चेचा विषय बनला आहे. वाढत्या प्रदूषणात
प्लास्टिकचे मोठे योगदान आहे. म्हणून जर आजच प्लास्टिक च्या उपयोगाला आळा घातला गेला
नाही तर भविष्यात मानवी जीवन मोठ्या संकटात येईल.आपल्या देशाला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी
अनेक गोष्टी करता येतील. जसे शक्य होईल तेवढा प्लास्टिक बॅग चा उपयोग कमी करा, भाजीपाला
किंवा कोणताही किराणा आणण्यासाठी कागदी अथवा कपड्याची बॅग वापरा. आज-काल लग्नसमारंभात
जेवणासाठी प्लास्टिकच्या युज अँड थ्रो प्लेट वापरल्या जातात. परंतु या एवजी आपण पारंपरिक
मातीचे भांडे किंवा केळीचे पान वापरू शकतात. शक्य होईल तेवढा प्लास्टिकचा उपयोग कमी
करा. असे केल्याने प्लास्टिक ची समस्या आपोआप कमी होईल.
भारत शासनाने प्लास्टिक मुक्त भारत या अभियानाची सुरुवात 2 ऑक्टोंबर 2019 ला देशातील
मोठमोठ्या शहरांमध्ये केली. सुरवातीला आग्रा, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, लखनऊ या शहरांमध्ये
प्लास्टिक बंदी आणि प्लास्टिक ऐवजी कापडी किंवा कागदी वस्तूंचा उपयोग सुरू झाला. नंतरच्या
काळात हे अभियान संपूर्ण देशात पसरले. परंतु तरीपण आजही अनेक लोक प्लास्टिक च्या पिशव्यांचा
मोठ्याप्रमाणात वापर करीत आहेत. एका सर्वेनुसार लक्षात आले आहे की भारतात प्रतिदिन
16000 टन प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती केली जाते. हा प्लास्टिक कचरा नद्या व परिसराला
प्रदूषित करीत आहे. प्लास्टिक स्वच्छ पाण्याला दूषित करते ज्यामुळे बऱ्याचदा पाण्यात
असणारे जीव व मस्यांचा मृत्यू होतो. दूषित पानी प्यायल्याने समाजात रोगराई पसरण्याची
शक्यता असते.
प्लास्टिकच्या वाढत्या समस्येपासून वाचण्यासाठी स्वच्छ भारत आणि प्लास्टिक मुक्त
भारत यासारखे अभियान यशस्वी करणे आवश्यक आहे. भारत शासनाने प्लास्टिकच्या विरोधात कठोर
कायदे बनवायला हवेत. प्लास्टिकचा उपयोग जेवढा टाळता येईल तेवढा टाळायला हवा व अधिकाधिक
लोकांना प्लास्टिक चे दुष्परिणाम सांगून जागृत करायला हवे.
प्लास्टिक प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. संशोधनातून लक्षात आले आहे की देशात मागील दोन दशकांमध्ये प्लास्टिकचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्लास्टिक हे वापरात सोपे आणि स्वस्त असते यामुळेच लोकांमध्ये प्लास्टिक पासून बनवलेल्या वस्तूंची लोकप्रियता आहे.लोकांची वाढती मागणी पाहून प्लास्टिक बनविणार्या कंपन्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या कंपन्यांनी आपले उत्पादन देखील वाढवले आहे. प्लास्टिक मुळे कचरा वाढतो व प्लास्टिक प्रदूषणासारखी भीषण समस्या उभी राहते. या समस्या जनजीवनावर संकट वाढवण्यासोबतच अनेक रोगांना आमंत्रण देतात.
प्लास्टिक उत्पादन:
प्लास्टिक ची योग्य विल्हेवाट लावण्याप्रमाणेच त्याचे उत्पादन देखील तेवढीच गंभीर
समस्या आहे. प्लास्टिकच्या उत्पादनात वेगवेगळ्या प्रकारचे जीवाश्म इंधन जसे तेल आणि
पेट्रोल वापरले जातात. या जीवाश्म इंधनांचा पुनर्वापर शक्य नसतो आणि पेट्रोल व खनिज
तेलासारखी ही इंधने भक्त करणे पण कठीण असते म्हणून जर आपण अशाच पद्धतीने प्लास्टिकचा
वापर करत राहू तर तो दिवस दूर नाही जेव्हा हे सर्व संसाधन समाप्त होऊन जातील.
समुद्री जीवनावर
प्लास्टिकचा प्रभाव
प्लास्टिक बॅग, अन्य प्लास्टिक कण तसेच पाण्याच्या बाटल्या हवा तथा पाणी द्वारे
समुद्र आणि महासागरात पोहोचतात. पाण्यामध्ये हे कण मिसळल्याने समुद्रामधील पाणी दूषित
होते आणि जर हे प्लास्टिक चे कण मासे, कासव आणि अन्य समृद्धी जीवांचा पोटात गेले तर
त्यांच्या मृत्यू होतो. दरवर्षी कितीतरी समुद्री जीव प्लास्टिकमुळे मारले जातात.
मनुष्य व प्राण्यांवर
प्लास्टिकचा प्रभाव
समुद्रातील प्राण्यांप्रमाणेच प्लास्टिक प्रदूषण मनुष्य व धरतीवर राहणाऱ्या प्राण्यांनाही
हानीकारक आहे. प्लास्टिक मध्ये असलेले कचरा अन्न समजून खाल्ल्याने दरवर्षी हजारो पशूंची
मृत्यू होते. हे प्लास्टिक त्यांच्या आतड्यांमध्ये अडकून जाते. वेळेनुसार प्लास्टिक
कचरा अधिक खराब होत जातो. त्यामुळे त्यात डास, माश्या आणि दुसऱ्या प्रकारचे किडे तयार
व्हायला लागतात. या मुळे माणसामध्ये रोगराई पसरते.
प्लास्टिक प्रदूषण
संपविण्यासाठी सामूहिक प्रयत्न
प्लास्टिक पदार्थांची पूर्णपणे विल्हेवाट लावणे कठीण कार्य आहे. जेव्हा प्लास्टिकचा
कचरा पाण्याच्या स्त्रोतांजवळ पोहोचतो तेव्हा ही समस्या अधिक बिकट होऊन जाते. कागद
व लाकडा प्रमाणे प्लास्टिकला जाळून समाप्त करता येत नाही. प्लास्टिक जाळल्याने वेगवेगळ्या
प्रकारचे हानीकारक गॅस निर्माण होतात. हे गॅस पृथ्वीच्या वातावरणाला हानिकारक असतात.
यामुळे प्लास्टिक पृथ्वी, पाणी व हवा तिन्ही प्रकारचे प्रदूषण वाढवतो.
आपण कितीही प्रयत्न केला तरी प्लास्टिक उत्पादनांना पूर्णपणे बंद करणे कठीण आहे.
परंतु आपण प्लास्टिक चे उत्पादन नक्कीच कमी करू शकतो. प्लास्टिक पासून बनलेल्या वस्तू
जसे प्लास्टिक बॅग, डब्बे, ग्लास, बाटली इत्यादी गोष्टींचा वापर कमी करावा. या ऐवजी
पर्यावरणासाठी अनुकूल असणारे उत्पादन जसे कपडे, पेपर बॅग, स्टील, तांबे व माती पासून
बनलेली भांडी वापरावीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा