छत्रपती शिवाजींच्या चरणस्पर्शाने
पावन झालेल्या आपल्या
या भूमीला मनापासून वंदन!
दादोजी कोंडदेव यांनी त्यांना शस्त्र विद्या अवगत करून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची वयाच्या १६व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या मावळ्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. हिंदवी स्वराज्य स्थापन करू इच्छिणाऱ्या छत्रपती शिवरायांनी शूर तरुणांचा एक गट तयार केला ज्याला त्यांनी मावळा असे नाव दिले. या मूठभर मावळ्यांना त्यांनी स्वराज्याची संकल्पना समजावून सांगितली. आपल्या स्वराज्याची जडणघडण त्यांनी केली.
पहिल्यांदा तोरणा किल्ला त्यांनी जिंकला. त्यांनी सईबाई सोबत विवाह केला. राज्याचा विस्तार, अफजलखानचा वध,पन्हाळा वेढा, सुरतची लुट, पुरंदरचा तह,आग्रालाभेट, मुघल-मराठा संघर्ष अशा अनेक कामगिऱ्या त्यांनी पार पाडल्या.छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराजांचे राजे होते यात शंका नाही. परंतु त्यांचे स्थान सम्राटासारखे नव्हते. त्यामुळे रायगडावर ६ जून १६७४ रोजी रायगड मध्ये महाराजांचा राज्याभिषेक झाला.महाराजांसारखे महान कार्य आजपर्यंत कोणालाही जमले नाही. धर्मनिरपक्षता,साहसी वृति,निष्ठा,माहिलांचा आदर,गटनिर्माण करणे,एकसंघपणे काम करणे हे गुण आपल्याला महाराजांकडून शिकायला मिळतात.
पापणीला पापणी भिडते
त्याला निमित्त म्हणतात,
वाघ दोन पावले मागे सरकतो त्याला
अवलोकन म्हणतात आणि
हिंदवी स्वराजाची स्थापना
करणाऱ्या वाघाला
छत्रपती शिवराय म्हणतात
आशा या महान महाराजची प्राणज्योत ३ एप्रिल १६८० ला मावळली. पण अजूनही आपल्या सर्वांच्या मानमनात महाराज आहेत अजूनही महाराजांचा जयजयकार होतो.
शिवाजी महाराज कि जय !
शिवाजी महाराज कि जय !




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा