माझी अविस्मरणीय सहल
शालेय,कॉलेजाच्या जीवनात आपण सहलीला जातो. खूप खूप ठिकाण. पण फिरतो. सगळीच ठिकाण आपल्या लक्षात राहत नाहीत. पण एखादे ठिकाण आपल्या चांगलेच लक्षात राहते ते कधीही विसरत नाही. इतरांना सहलीचे अनुभव सांगताना आपण तोच तोच अनुभव सांगत असतो. असाच माझ्या आठवणीतला एक अनुभव मी आज तुम्हाला सांगणार आहे.

मी D.Ed.कोर्सला होते तेव्हा ५ जून २००८ रोजी आमच्या कॉलेजाची सहल चक्रेश्वरवाडी येथे गेली होती. माझ्या जीवनातला एक सुंदर सहलीचा अनुभव होता. चक्रेश्वरवाडी कोल्हापूर पासून ४१ किलोमिटर आहे. राधानगरी मार्गे किंवा गारगोटी मार्गे आसे दोन मार्गे जातात. कसाबा तारळे गुडाळवाडी मार्गे आम्ही जात होतो.वाटेत एक छोटासा घाट लागला तिथून राधानगरीचे सोंदर्य अप्रतिम दिसत होते. हे मंदिर छोट्या दरीच्या काठावर उभे होते. एका छोटयाशा कडावर हे मंदिर उभे होते. मंदिराच्या समोर भव्य दीपमाळ होती. थोडे पायऱ्या उतरून खाली गेले की मंदिरात प्रवेश मिळत होता. मंदिरात प्रवेश केला की डाव्या बाजूला देवी देवताच्या मूर्ती ठेवल्या आहेत. तिथूनच पुढे मंदिरात प्रवेश केला की गणपतीचे दर्शन होते. गणपतीची सुंदर ,रेखीव मूर्ती नंदीच्या पाठमोरी उभी आहे. येथे संपूर्ण सभामंडपात नंदीच्या सलग तीन मूर्ती आहेत. त्यानंतर मुख्य गाभारात श्री शंभू महादेवाचे शिवलिंग आहे. मंदिराच्या बाहेर पिण्याच्या पाण्याचे कुंड आहे. पुढे गेल्यानंतर एक मोठी विहीर आहे.आम्ही सर्वजनांनी आणलेले भोजन केले. सगळा परिसर रम्य आहे. तेथील दगडांवर वर्तुळाकार चक्र आहेत.
सूर्य डोक्यावर आला आणि परतीची वेळ झाली त्यामुळे आम्ही सर्वजण तेथून निघालो.खूप सुंदर अनुभव आम्ही घेतला. ही सहल आमच्या कायम आठवणीत राहणार आहे. खूप सुंदर अनुभव आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा