मराठी उखाणे
१) खडी साखरेची गोडी अन फुलांचा सुंगध .................... रावाच्या संसारात,स्वर्गाचा आनंद २) समुद्राचे पाणी लागते खूप खारे ,---------- तुझ्यासाठी तोडून आणेन मी चंद्र तारे३) चंदनाच्या खोलीला अंतरचा गिलावा ------------- सारखा पती जन्मोजन्मी मिळवा
५) भाजीत भाजी मेथीची ---------- माझ्या प्रीतीची .
६) सुशिक्षित घरात जन्मले ,कुलवंत घराण्यात आले ------------ रावांचे नाव घेऊन मी सौभाग्यवती झाले.७) तू दिसतेस खूप सुंदर साडीवर, ----------- तुला बायको बनवून फिरवेन गाडीवर .
८)काही शब्द येतात ओठातून ---------------च नाव येते मात्र हृदयातून.
९)मंगळसूत्र हाच ,सौभाग्याचा दागिना खरा ------------ रावांचे नाव घेऊन ,जपते मराठी परंपरा .
१०) रातराणीचा सुगंध,त्यात मंद वारा ---------- रावांचे नावांचा,भरला हिरवा चुडा .








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा