गुरुवार, १८ मे, २०२३

कोल्हापूरची महालक्ष्मी

                                             कोल्हापूरची महालक्ष्मी 

         

                  || सर्वमंगल  मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके || 

           || शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||

                                

    हा मंत्र ऐकायला आला की श्री महालक्ष्मीची आठवण होते. कोल्हापुरमध्ये वसलेले श्री महालक्ष्मीचे मंदिर म्हणजेच कोल्हापूरकरांचे  श्रद्धा स्थान आहे.खूप लांब लांब आंतरावरून लोक येथे दर्शन घ्यालला येतात. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन पिठपैकी एक मंदिर आहे. हे मंदिर इ.स.६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे. मंदिराचे बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले. पुराणे,अनेक जैन ग्रंथ,ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यावरून अंबाबाई मंदिराचे पुरानतवसिद्ध होते. आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या आर्थने आखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते. 

        कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरचा महाद्वार पशिचमेकडे आहे.महालक्ष्मी हे जागृत देवस्थान आहे. त्यामुळे सर्वकाळ जनतेचा ओढा कोल्हापूरला असतो. शुक्रवार व मंगळवार हे  दिवस  देवीचे मानले जातात. दर शुक्रवारी व आश्विन,कार्तिक,मार्गाशीष व माघ या चार ही पूर्णिमेस व चैत्र वद्य प्रतीपदेस देवीच्या पितळी मूर्तीची प्रदक्षिणा घातली जाते. नवरात्रीत नऊ दिवस देवीची वाहनपूजा करतात. मंदिराच्या उत्तरेकडे पूर्व काशी आणि मंकर्णिका या नावाची दोन कुंडे आहेत. 

                            

        महालक्ष्मीचे मंदिराचे नक्षीकाम रेखीव आणि सुंदर आहे. काळ्या दगडावर सुंदर नक्षीकाम पाहिले की मन भरून जाते. नवरात्रीत सुंदर दिव्याची सुंदर सजावट केली जाते. सूर्यकिरणच्या वेळी सुर्यकीरण महालक्ष्मीचे चरण स्पर्श करतात.हा देखावा पाहण्यासाठी लोक खूप गर्दी करतात.महालक्ष्मी नवसाला पावते म्हणून लोक खूप गर्दी करतात.                 नवरात्रीत सोन्याच्या पालखीतून महालक्ष्मीची मिरवणूक काढली.महालक्ष्मी मंदिरामध्ये वरच्या बाजूस महादेवाचे मंदिर आहे ,ते वर्षातून एकदा महाशिवरात्रीला उघडले जाते.उजव्या बाजूला कालीमातेचे व डाव्या बाजूला सरस्वतीचे मंदिर आहे,समोर गणपतीचे मंदिर आहे.

  महालक्ष्मीचा लाकडी नवीन रथ बनवला आहे. तो रथ चैत्र पूर्णिमेस रथउत्सव दिवशी या  रथातून महालक्ष्मीची नगर प्रदक्षिणा काढतात. त्यासाठी लाखों भाविक जमतात. आणि या पालखीचे दर्शन घेतात. सर्व नगरात रांगोळीचे सडे काढतात. हा उत्सव खूप जलोशात साजरा करतात.महालक्ष्मीमुळे कोल्हापूनगरी पावण झाली आहे. 















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा