मराठी भाषेचा उगम आणि विकास
रुजवू मराठी भाषाखुलवू मराठी भाषा
जगवू मराठी
भाषा
येणाऱ्या प्रत्येक पिढीस
अभिमान वाटेल
अशी सदैव राहो माझी मराठी भाषा
मराठी ही भाषा
भारताच्या २२ अधिकृत भाषेपैकी एक आहे.मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत आणि गोवा
राज्याची सहअधिकृत भाषा आहे.मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी
ही भाषा जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे.
माझ्या मह्राटाची बोल कौतुके | परी अमृताते
ही पैजा जिंके |
ऐसी अक्षरे रसिके मेळविण |जिये कोवळी कचेनी
पाडे |
असे ज्ञानेश्वर म्हणतात . मराठी भाषेत अनेक ओव्या त्यांनी रचल्या आहेत.भाषा हा शब्द भाष -भाष शब्द (बोलणे या अर्थी ) ह्या धातू पासून आला आहे. भाषा म्हणजे ध्वनीचा उपयोग मानवी व्यवहार सुकर करण्याकडे करतात,म्हणूनच भाषा हे व्यवहाराचे मुख्य साधन ठरते. मनुष्याच्या ज्या काही जातिक वृत्ती आहेत. त्यामध्ये ध्वनि उत्पन्न करणे ही एक वृत्ती आहे. मनुष्य हा बोलणारा प्राणी आहे. अशी एक व्याख्या आहे. ती याच दृष्टीने केली आहे.ईश्वरांने आपली प्रत्यक्ष प्रतिमा म्हणून जरी मनुष्यप्राणी निर्माण केला असला तरी व त्याला वर विहित केलेली शकतीची देणगी दिली असली तरी त्यायोगे भाषा ही ईश्वरी देणगी ठरत नाही. भाषेमध्ये ईश्वऱ्कृत केवळ तर ध्वनिनंतर भाषेची सर्व उभारणी मानवकृत आहे.
‘‘ मन:सृष्टी विकृते चोद्यामनं सिसक्षया |
आकाश जायते तसमत्या
शब्दं गुण विदू :|
विराटपुरुष मन उत्पन्न करतो आणि ते मन नानाविध अशी सृष्टी उत्पन्न करते. आरण्यक ग्रंथात वाणीच्या उत्पत्तीचे वर्णन बरेच विस्तृत आढळते.वाड्मयाला विशेष महत्व प्राप्त झाल्यामुळे किंवा ऋग्वेद म्हणजेच तेवढे चांगले वाड्मय अशी समजूत असल्यामुळे ऋग्वेद म्हणजे वाणी अशी समजूत होऊन बसली. मन ,प्राण आणि वाक्ही तीन तत्वे आत्म्याने आपल्याला अन्न म्हणून निर्माण केली.
आदिमानव जो ईश्वराचा पुत्र असून ईश्वराने सर्वांग परिपूर्ण अंशी भाषा त्याच्या उपयोगाची त्याच्या स्वाधीन केली. पृथ्वीवर असलेल्या धुळीच्या कणांपासून त्याचे शरीर तयार करून त्यात जीवीतसार ओतले. त्याच्या उपयोगासाठी व सुखासाठी त्याने प्रकाश असुदे असे म्हंटले आणि जिकडे तिकडे प्रकाश झाला. भाषा असुदे असे म्हंटले आणि भाषा तयार झाली. ईश्वराने सर्व शब्दाचा कोश तयार केला होता,की जो त्याने आपल्या आवडत्या लेकरास दिला !लहान मूल असे आपली भाषा आपल्या अनुभवाने हळूहळू वाढवते तसेच मानवाच्या आद्य समाजाने त्यामध्ये बदल केला.
फार तर ती आपल्या भक्ताना आपल्या अंगावर
नानातरेची भूषणे घालून आपल्या नेत्राचे पारणे फेडण्यास मुभा देईल ती,कोणाची
राजाची, धर्मगुरूची अथवा विशीष्ट समाजसमूहाची इतकेच नव्हे,तर प्रत्यक्ष ईश्वराची
ही सत्ता कबूल करीत नाही. भाषेच्या घटनेस
लागणारे ध्वनि उत्पन्न करण्याची शक्ति मनुष्यास
ईश्वराने दिली.
भाषेच्या उत्पत्तीचे आद्यकारण जे अनुकरण म्हणून वर दिले आहे. त्याची
चेष्टा करण्याच्या हेतूने त्याला `भो भो ` असे निंदाव्यंजक नाव मक्समुल्लरने दिले. त्याला हा सिद्धांत
मान्य नसल्यामुळे त्याने भाषेच्या उत्पत्तीच्या व वाढीच्या कारणाबद्दल एंक निराळा
सिद्धांत मांडला. शब्दांचा नाद आणि त्याचा अर्थ ह्या दोहोंमध्ये एकत्रीचा समन्वय
संबध असतो. दोन्ही एकमेकांचे पूरक असतात. ह्या सिद्धांतास ठणठण सिद्धांत असे नाव
देतो.
भाषेची
उत्पत्ती प्रेममूल आहे. हा सिद्धांत
जेठरमन ह्या शस्त्रन्याने मांडला. मनुष्य
प्राणी प्रेमाचा वेडा आहे. दुसऱ्यावर प्रेम करणे आणि दुसाऱ्याकडून प्रेम करून घेणे
हे सर्व प्राणी मात्राला आवडते. आशा प्रेमाच्या मोहक प्रसंगात असताना आपल्या
प्रेमाची पूर्तता करण्यासाठी त्याला भाषेसारख्या साधनाची जरूरी लागली असावी व त्या
साधनाचा उपयोग त्याने केला असावा. भाषा प्रथम उद्भवली असावी. व तेच भाषेचे आदयरूप
असावे.
लहान मूल प्रथम भाषा कशी शिकते हे
पाहणे उपयोगी ठरेल. लहान मुलाची शारीरिक व मानसिक वाढ ही त्याच्या अंतिक वृतीवर
अवलंबून आहे. किनाऱ्यालागत राहणाऱ्या लोकांच्या उच्चारात नासिका उचारांचे
नासिका ऊचारांचे प्रमाण जास्त असते. कोकणातील उच्चार निराळे तर घाटावरील उच्चार
निराळे तर उष्ण प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे उच्चार निराळे ,समशीतोष्ण
प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या उच्चरात
नारम पंणा व गोंडसपणा असतो. काही
सुधारलेल्या बायका नाकात दागिने घालण्याची जी चाल आहे. त्यामुळे काही थोडासा
उच्चारात फरक पडल्याखेरीज राहत नाही. ज्ञानेश्वरी
किवा महानुभाव हयात सापडणारे मराठीचे शुद्ध रूप पारशीने हळूहळू बंद होऊ
लागले.यानंतर मराठी भाषेचा खूप बदल झाला.भाषा म्हणजे
विचार,भावना ,कल्पना व्यक्त करण्याचे साधन
होय. भाषेचे दोन प्रकार आहेत. २)
सांकेतिक किंवा कृत्रिम भाषा
जी भाषा प्राचीन असते तसेच त्या भाषेला स्वतचे स्वयभूपण असते.आणि ज्या भाषेतील साहित्य श्रेष्ठ असते.तिला अभिजात भाषा म्हणतात.भाषा ज्या खुणांच्या सहयाने लिहली जाते त्याला लिपी असे म्हणतात.मराठी भाषेचा उगम संस्कृत आणि प्राकृत भाषेतून झाला.मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे. देवनागरी भाषेला बाळबोध भाषा असेही म्हणतात. संस्कृत भाषाही मराठी भाषेची जननी आहे. मराठी भाषेतील आद्य ग्रंथ (पहिला)विवेक सिंधु हा आहे.मराठी साहित्यातील आद्य कवी मुकुंदराज आहेत. आद्य कवी मुकुंदराज यांना मराठी साहित्यातील पहाटेचा शुक्रतारा म्हणतात.गद्य स्वरूपात लिहलेला मराठी भाषेतील पहिला ग्रंथ लिळाचारित्र आहे. लिळाचारित्र हा ग्रंथ म्हईमभट्ट यांनी लिहला. लिळाचारित्र हा ग्रंथ महानुभाव पंथाशी संबंधित आहे.
२) शब्दसंग्रह
३)वाक्यरचना
४)शब्दोच्चारण
१) आकलन-
आकलन म्हणजे दुसऱ्याचे बोलणे समजून
घेणे.आकलन हा भाषा विकासाचा पहिला आणि महत्वाचा टप्पा आहे.या टप्प्यामध्ये
समोरच्याला काय म्हणायचे आहे हे समजते. समोरच्याच्या मनातील रागीटपणा,कोमलता या
सारखे भाव आपल्याला समजतात.
२)
शब्दसंग्रह- शब्दसंग्रह वाढवणे म्हणजे नवनवीन शब्दांचा साठा करणे.
शब्दसंग्रह
दोन प्रकारचे असतात. १)सामान्य शब्दसंग्रह २)विशेष शब्दसंग्रह. सामान्य
शब्दसंग्रहा मध्ये नाम,सर्वनाम,विशेषण,क्रियापद यांचा समावेश होतो.आणि विशेष
शब्दसंग्रहामध्ये व्यक्ती दैनंदिन जीवनामध्ये अनुभवातून जे नवीन शब्द शिकत असतो.
३)वाक्यरचना – म्हणजे वेगवेगळे शब्द
व्याकरणद्द्ष्टया एकत्र करून एखादे व्याक्य तयार करणे.त्यामध्ये
लहान,मोठी,उद्गारवाचक वाक्य,प्रश्नती वाक्य यांचा समावेश होतो.
४)शब्दोच्चारण- म्हणजे शब्दांचे उच्चारण.कानानी ऐकलेले आकलन केलेले शब्द बोलण्यासाठी त्यांचे शब्दात आणि वाक्यात रूपांतर करून वाणीच्या माध्यमातून उच्चार करणे महत्वाचे असते. शब्दोच्चारणातून व्यक्तीचा भाषा विकास होतो. या सर्वानमुळे मराठी भाषेचा विकास होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा