*शेतकरी*

हा शेतकरी स्वत:मात्र खूप हलाखीत राहतो. शेतकरी दिवसरात्र शेतात दिवसभर शेतात कष्ट करतो. पण त्याच्या मार्गात अनेक अडचणी येतात. कधी पाऊस दगा देतो. तो पडतच नाही. शेती होऊ शकत नाही. कधी अतिव्रृष्टी होते. त्यामुळे शेत वाहून जाते. या संकटांना तोंड देत तो अन्नधान्ंय निर्माण करतो. पण त्याच्या पिकाला बाजारात पुरेशी किंमत येत नाही. हाती आलेला पैसा सावकार बाळकवतो. त्याला स्वत :च्या संसारासाठी काही शिल्लक राहत नाही. भविष्यचा भयाण चिंतेत शेतकरी बुडून जातो. काही शेतकरी तर निराशेने आत्महत्या करतात. आशा स्थीतीत आपण शेतकऱ्याला वाचवले नाही, तर देशच रसातळाला जाईल. म्हणून शेतकरी वाचवला पाहिजे.
आपला पोशिंदा शेतकरी आहे. आपला अन्नदाता आहे. सध्याच्या
सरकारने शेतकऱ्यानसाठी गरीब किसान
कल्याण योजना आणि पंतप्रधान किसान योजना
यासारखे विविध उपक्रम सुरू केले आहेत. ज्यामुळे गरीब शेतकऱ्यांच्या जीवनात बदल
झाला आहे.
शेतकरी हा मेहनती,शिस्तप्रीय,वचनबद्ध आणि सरळ व्यक्ति आहे.शेतकऱ्याच्या आयुष्याताला प्रत्येक क्षण महत्वाचा असतो.त्यामुळे तो शेतीची कामे वेळेवर करू शकतो.त्याच्या रोजच्या जीवनात वक्तशीर पणा नसेल तर शेतकरी शेतात पीक घेऊ शकला नसता.शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आहे. म्हणूनच लालबहादूर शास्त्री यांनी जी जवान जी किसान हा नारा दिला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा