सोमवार, १९ जून, २०२३

माझा आवडता पक्षी-मोर

 

              माझा आवडता पक्षी-मोर

               नाच रे मोरा  आंब्याच्या वनात

                       नाच रे मोरा नाच 

            काळा काळा कापूस पिंजला रे

                  ढगांशी वारा झुंजला रे

           आता तुझी पाळी मीच देतो टाळी 

                  फूलव पिसारा नाच

           हे गाणे आपण लहान असताना खूप वेळा बोललो आहे.  मोर हा खूप सुंदर पक्षी आहे. मोराला हिरव्या,निळ्या रंगाचा रंगीबेरंगी पिसारा असतो. त्याच्या डोकयावर आकर्षक तुरा असतो मोऱ्याची मान गडद निळसर रंगाची असून ती लांब असते. मोराचे वजन जास्त असल्याने तो खूप उंच उडू शकत नाही. मोराला समूहामद्धे राहायला आवडते.

         मोराला मयूर असेही म्हणतात. मोर पावसाळ्यामध्ये आकाशात काळे ढग दिसल्यावर मनमोहक नृत्य करतो. मोराच्या  मादिला लांडोर असे म्हणतात. लांडोर मोराइतकी सुंदर नसते. मोराच्या आवाजाला केकारव म्हणतात. मोर शेतातील साप,किडे ,उंदीर ,फळे ,धान्य इत्यादी खातो.

      मोर भारताचा राष्टीय पक्षी आहे. तो विदयेची देवता  सरस्वतीचे वाहन आहे. भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यावर मोरपिस खोचलेले आहे. मोरपीसचा उपयोग सजावटीसाठी केला जातो सध्या मोराची संख्या कमी होत आहे यामुळे भारत सरकारने मोराच्या शिकारीवर बंदी घातली आहे. आपण सर्वानी मोराचे संरक्षण केले पाहिजे.

       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा