गुरुवार, २२ जून, २०२३

छत्रपती शाहू महाराज

                 छत्रपती शाहू महाराज

                इतिहासा तू वळूनी .. .

                              पहा पाठीमागे जरा

                             झुकवून मस्तक करशील

                             राजर्षी शाहूंना मानाचा मुजरा

        महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणून छत्रपती शाहू महाराजाचे नाव घेतले जाते. छत्रपती शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे  घराण्यात झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील आणि जन्मदाती आई राधाबाई आहे.शाहू महाराजांचे मुळचे नाव यशवंतराव  होते.


     कोल्हापूरच्या गादीला वारस म्हणून यशवंतरावांची निवड केली.शाहू महाराज माराठयांच्या  भोसले वंशाचे राजा  आणि कोल्हापूरचे महाराज होते या दोन्ही भूमिका त्यांना पार पडायच्या होत्या.तसेच महाराष्ट्राच्या इतिहासातील अमूल रत्न होते.वयाच्या दहाव्या वर्षा पर्यन्त त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्या वडिलांनी पूर्ण केली. त्यानंतर चवथे शिवाजी शिवाजी यांचा निधन झाल्यावर त्यांची विधवा पत्नी आनंदाबाई यांनी यशवंतराव यांना १७ मार्च १८८४ रोजी दत्तक घेतले आणि त्यांचे नाव शाहू ठेवले.

       शाहू महाराजांनी राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये ओपाचारिक  शिक्षण  पूर्ण केले.आणि भारतीय सिविल सर्विस चे प्रतिनिधि सर स्टुअऱ् फर्जर याच्याकडून प्राशसकीय बाबीचे शिक्षण घेतले.१८९१ मध्ये शाहू महाराजांनी बडोदयाच्या लक्ष्मीबाई याच्या सोबत विवाह केला.या वेळी त्यांचे वय १७ वर्षाचे होते.आणि लक्ष्मीबाई यांचे वय १२ वर्षाहून कमी होते.२ एप्रिल १८९५ रोजी राजरोहण समारंभ झाला.राज्याभिषेक इ .स.१९२२ पर्यत म्हणजेच  २८ वर्षाचे असताना कोल्हापूर  संस्थानाचे ते राजे झाले.

                      

               ओम बोलल्याने मनाला शक्ति मिळते,

                      साई बोलल्याने मनाला शक्ति मिळते,

                     राम बोलल्याने पापातून मुक्ती मिळते,

                     जय शाहू बोलल्याने शंभर वागाची ताकत मिळते.

       राजे झाल्यानंतर बहुजन समाज सुशिक्षित झाल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही. त्यांनी खूप शिक्षणाचा प्रसार केला. शाहू महाराजां णी सक्तीचे व मोफत शिक्षण केले.सर्व जातीतील मुलांना शिक्षण घेत यावे म्हणून वसतिगृहाची सोय केली.प्रत्येक जातीनुसार वासतिगृहे बांधली.अस्पश्य लोकांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या.

त्यांच्या साठी शिष्यव्रत्या जाहीर केल्या.

शाहू महाराज नेहमी म्हणायचे,

माझा खजिना रिता झाला तरी मला त्याची पर्वा नाही !

पण माणसाला माणुसकी पासून वंचित

करणारी रूढी मला मोडीची आहे.

समाजकार्य -

·   शाहू महाराजांनी मागास विद्यार्थनसाठी नोकरीमध्ये पन्नास ट्टके आरक्षण दिले.

·   सहकारी तत्वावर एका कापड गिरणीची त्यांनी स्थaपना केली

·   कोल्हापूरच्या पश्चिमेला असलेल्या दाजीपूर भोगावती नदीला बंधारा घालून जमिनीला पाणीपुरवठा करण्याची योजना त्यांनी आखली.

·   शाहू महाराजच्या आदेशानुसार चावडी,मंदिरे,धर्मशाळा येथे शाळा सुरू करण्यात आल्या.

·   शाहू महाराजांनी पुनर्विवाहचा कायदा करून विधवा विवाहाला  मान्यता दिली. तसेच आंतरजातीय विवाहला मान्यता दिली. त्यांनी स्वत: आंतरजातीय विवाह करून दिले.

·   शाळा ,दवाखाने,पाणवठे,सार्वजनिक विहरी या सर्व ठिकाणी समानतेने  वागवावे अशी सक्त ताकीद दिली.

       सर्वाना समानतेने वागवणारे शाहू महाराज,शिक्षणासाठी झटणारे सर्वाचे लाडके राजे शाहू महाराज यांनी १० मे १९२२ रोजी मुंबईत साऱ्या जगाचा निरोप घेतला. शाहू महाराज आज जरी आपल्यात नसले तरी त्यांनी केलेले कार्य आपल्या नेहमी स्मरणात राहील.

           शेवटी असे म्हणवेसे वाटते,

          आरक्षण देणारा पहिला राजा ,

          जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत ,

          त्यांना १ रुपया दंड ठोकावणारा राजा,

         कला,शिक्षण,संस्कृति,क्रीडा यांना राजाश्रय देणारा राजा,

        अंधश्रद्धा,कर्मकांड,यावर प्रहार करणारा राजा,

        डॉ. आंबेडकर याच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा,

         सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा !

          या छत्रपती शाहू महाराजना माझा मनाचा मुजरा !!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा