सोमवार, २६ जून, २०२३

माझा आवडता ऋतु- पावसाळा

          माझा आवडता ऋतु- पावसाळा



                 हळुवार दाटले मेघ 

                 हळुवार पसरतो गारवा 

                 सर्वांग फुलवे आगमनाने 

            भरून वाहतो मणी स्पर्श नवा हर्ष नवा 

     सृष्टी तापली होती.आणि अचानक पावसाची रिपरिप चालू झाली. सगळीकडे मातीचा रम्य सुगंध सुटला. जणू काही गंधवती पृथ्वी या वाचनाची आठवण झाली. आणि पहिल्या पावसात भिजन्याची मजा काही वेगळीच आहे. अगदी लहान मुलांपासून मोठया माणसांपर्यंत या पावसाची मजा लुटतात. पावसामुळे सगळीकडचे वातावरण आनंदमयी होते. पावसाळा ऋतुच्या आगमानंतर थोड्या दिवसात संपूर्ण पृथ्वीला जणू हिरवीगार शाल पांघरली असे वाटते. वातावरणात सगळीकडे गारवा पसरलेला असतो.पावसामुळे शेतकऱ्यांना खूप आनंद होतो.कारण शेती पूर्णत पावसावर अवलंबून असते. जसे आपण पावसाचा आनंद घेतो. तसेच प्राणी ,पक्षी पावसाचा आनंद घेतात.कोकिळा ,मोर हे पक्षी पावसाचा आनंद घेताना त्याच्या आवाजाने सर्व वातावरण मंत्रमुग्ध करतात.



     शाळकरी मुलांना सुद्धा पावसात जायला फार आवडते. शाळेची नवीन सुरवात यावेळी होते. आई -बाबा रेनकोट,छत्री,गमबुट घेऊन देतात. शाळेतून येताना मुद्दाम पावसात भिजणे,कागदाच्या होड्या बणवून पाण्यात सोडणे यातील मजा काही वेगळीच असते. रिमझिम पाऊस येऊन गेल्यावर इंद्रधनुष मनाला मोहवितो.

कधी कधी पवसासोबत गारा ही पडतात.आम्ही लहान असताना गारा गोळा करून खायचो खूप मजा यायची. पावसाळ्यात गरमा गरम भजी आणि चहा हा बेत ठरलेला असतो. अगदी लहाना पासून मोठया पर्यंत सर्व एकत्र बसून याचा आनंद घेतात.पावसाळा हा ऋतु सर्वणसाठी खूप महत्वाचा स्त्रोत आहे. पावसाळा हा एक सुखदायी असला तरी त्याचे बरेच चांगले वाईट परिणाम आहेत.वाईट परिणाम म्हणजे अतिशय मुसळधार पावसाने महापूर येतो,सोबत जीवित हानी होते आणि आर्थिक हानी होते. कधी दुष्काळ पडतो त्यामुळे पाऊस आपले रुद्र रूप धारण करून आपले खूप नुकसान देखील करू शकतो.

     मला वाटते या सगळयासाठी आपण जबाबदार आहे.कारण वायु प्रदूषण,झाडाची कमी होणारी संख्या यामुळे वातावरण उष्णता वाढत आहे. या सर्व गोष्टीकडे आपण जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा