सोमवार, ३ जुलै, २०२३

माझा आवडता सण

 

               माझा आवडता सण

            भारतात अनेक सण साजरे केले जातात. या प्रत्येक  सणाचे महत्त्व आगळेवेगळे आहे. प्रत्येक  सण आपल्याला एक चांगला संदेश घेऊन येतो. हा संदेश आपल्याला एक चांगला संदेश घेऊन येतो. हा संदेशआपल्या जीवनात आपल्याला कसे वागावे हे शिकवतो. त्याचानक्कीच आपल्या जीवनात आपण वापर केला पाहिजे
.
माझा आवडता सण दिवाळी हा आहे.हा सण असल्यावर सगळीकडे आनंदमय वातावरण असते. अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्व लोक खुश असतात. या सणाची तयारी अगदी एक महिन्यापासुन होते. या सणासाठी बाजारपेठ अगदी सज्ज असते.आपली आई फराळाची तयारी करते. फराळ करन्याआधी फराळाच्या  भाजणीचा सुगंध सगळ्या घरभर दरवळत असतो. हा सुगंध मनाला मोहणारा असतो.

आपले आई बाबा आपल्यासाठी खूप सुंदर कपडे विकत घेतात. बाजारात लहान मुलांनपासून मोठया माणसापर्यंत सगळ्याचे सुंदर कपडे विकायला येतात. बाजार नुसता रंगीबेरंगी दिसतो. या वेळी खूप खरेदी केली जाते.या सणाला सगळ्याच्या दारोदारी रांगोळी काढली जाते. बाजारात रांगोळीचे सुंदर सुंदर रंग आपल्याला दिसतात. सगळीकडे सुंदर मातीचे,मेणाचे,रंगीबेरंगी दिवे दिसतात.लोक आपले घर सजवन्यासाठी खूप तोरण,दिवे,रंगोळी खरेदी करतात.

        दिवाळी हा सण दरवर्षी आश्विन आणि कार्तिक महिन्याच्या संधिकाळात येतो. दिवाळी हा सण धनोत्रयोदशी ते भाऊबीज या पाच दिवसाचा असतो. दिवाळीच्या दिवाशी प्रभू श्रीराम चोंदा वर्षाच्या वनवासानंतर आयोध्यास परतले होते. त्यावेळी तेथील लोकानी सर्वत्र दिवे लाऊन त्यांचे स्वागत केले होते. तेव्हा पासून दिवाळी हा सण सर्वत्र मोठ्या आंनदात साजरा केला जातो. दिवाळी हा सण दिव्यांचा असतो. म्हणून या सणाप्रसंगी सर्वत्र दिव्याची रोषणाई केली जाते.घरात,अंगणात

दिवे,पणत्या,आकाशकंदील लावला जातो.आई आपल्याला उटणे लाऊन आंघोळ घालते. सगळीकडे उटणे आणि मोती साबणाचा सुगंध पसरतो.

     अभ्यंगस्थान झाल्यावर घरातील सगळेजन मिळून फराळ करतात. फरा ळामध्ये  लाडू,चकली,करंज्या,शंकरपाळ्या बनवले जातात. 

          

       काही लोक हा फराळ घरोघरी वाटतात. दिवाळीला फटक्याची आतिषबाजी सर्वांचे मन वेधून घेते. दिवाळीला शाळेला सुट्टी असते,त्यामुळे मुलांना  खूप मजा येते.मुले घरासमोर मातीचे किल्ले बांधतात. त्यावर छत्रपती शिवाजीमहाराजांची मूर्ती आणि सैनिक ठेवतात. आणि या किल्याच्या स्पर्धा पण होतात. आपले पाहुणे,मित्र मैत्रिणी घरी येतात.आपणही त्याच्या घरी जातो. या सणाला खूप आंनदाचे  वातावरण असते.



      दिवाळी हा सण सर्वांच्या खूप आवडीचा सण आहे. दिवाळी हा सणअधांराचा नाश करणारा व न्यानाचा प्रकाश देणारा सण आहे.

 

     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा