💥 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले 💥
Ø जन्म
सावित्रीबाईचा जन्म ३ जानेवारी
१८३१ साली झाला. त्यांचे जन्मगाव सातारा जिल्हयातील
खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावात गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
त्याकाळच्या रिवाजनुसार त्या ९ वर्षाच्या असताना त्यांचे लग्न ज्योतिबा फुले
यांच्याशी लाऊन देण्यात आले. मुळातच हुशार आणि कष्टाळू असणाऱ्या सावित्रीबाईंना
मानणारा पतीदेव मिळाल्यामुळे त्यांच्या कर्तुत्वाला संधी मिळाली.
Ø लग्न आणि संसार –
नेसवे-पाटील यांची कन्या सावित्री लग्न होऊन फुलेच्या घरी आली. ती आईसारखी
गोरीपान,सुंदर आणि वडिलांप्रमाणे प्रकर्तीने निरोगी होती. तिला लहानपानापासून खोटे बोलणे,दुसऱ्याची टिंगल करणे आवडत नसे.
शेतीकाम करणे,गुरे संभाळणे,दूध काढणे,सडा सारवण करणे,ही कामे ती मनापासून करत असत.
जोतिबाचीआई लहानपणी वारली असल्यामुळे त्यांना सगुणाबाई सांभाळत असत. लग्नानंतर
ज्योतीबाचे शिक्षण चालू होते.सगुणाबाई त्यांना सांगत ,‘तू ते शाळेत शिकवतो ते
सवित्रीलाही शिकवीत जा. आम्ही आडणी राहिलो,पण सवित्री शिकली तर पुढे संसार चांगला
करेल!’आणि त्यामुळे त्याची पहिली शाळा घरातून सुरू झाली.
Ø
शिक्षणाचे व्रत –
ज्योतीबांनी सावित्रीबाईंना घरी
शिकवले आणि तिच्याप्रमाणे सर्व स्त्रीयांनाही शिक्षण मिळावे म्हणून सावित्रीबाईंना
शिक्षिका करण्याचे ठरवले. ज्या काळात
स्त्रीया पुरुषाच्या समोर घरातही येत नसे.त्या काळात एका माळ्याच्या
बायकोने रोज घराबाहेर पडायचे आणि तेही संसार -घरकाम यांच्या रंगाडयातून बाहेर पडून
अनेक तास स्वत:शिकत राहायचे ही गोष्ट फार भयंकर मनाली गेली. कारण मुली अक्षर काढू
लागल्या की त्या अक्षरांच्या आळ्या होतात. आणि त्या जेवणाच्या ताटात पडतात असे
गैरसमज होते. समाजातील लोकाना त्यांनी खूप समजावले.लोकानी त्यांना दगड मारले खूप
त्रास दिला पण ते मागे हटले नाही.
Ø
भिडे वाड्यात
पहिली शाळा सुरू –
१ जानेवारी १८४८ साली फुले दांपत्याने मुलीची पहिली शाळा सुरू केली. मुलींना शिकवणे पाप आहे असे मानणाऱ्या समाजात शाळेला जागा देणार?या आधी १८४४ साली स्काटलंड मिशनने मुलीसाठी शाळा काढली. पण एका वर्षात ती बंद पडली होती.अशीच शाळा शनिवार वाड्यात होती. तेथे ४ ते ६ वयाच्या काही मुलीना गुप्तपणे शिकवले जाई. सावित्रीबाई यांनी भिडे वाड्यात आपली शाळा सुरू केली. सावित्रीबाई शिकवण्यासाठी पवित्र कार्य करते आहे. तेव्हा लोक त्याच्या अंगावर शेण,दगड फेकत सावित्रीबाई त्यांना थांबून त्यांना शांतपणे सांगत,‘मी शिकवण्याचे पवित्र कार्य करते आहे. तेव्हा तुमचे शेण,दगड मला फुलासारखे वाटतात. यानंतर चार वर्षात त्यांनी २० शाळा काढल्या.
Ø
शिक्षणात मानसशास्त्राचा
उपयोग –
सावित्रीबाईच्या असे लक्षात आले
की ब्राम्हण मुली आणि मागास मुलींची तुलना केली तर ब्राम्हण मुली लवकर शिकतात. त्यावरून
त्यांनी असे अनुमान काढले की शिक्षणातील प्रगतीमध्ये परंपरा आणि परिस्थिति कारणीभूत
असते. यासाठी त्यांनी प्रोढ शिक्षण वर्ग आणि रात्रीच्या शाळा सुरू केल्या. वर्गात येणाऱ्या
सर्व मुलांची वय आणि कुवत वेगळी असते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कुवतीनुसार वेगळा
वेगळा वर्ग सुरू केले. व्यसन,अंधश्रद्धा आणि अविद्या म्हणजे शिक्षणाचा
अभाव या तीन गोष्टी संपवल्या पाहिजेत म्हणून गीते,भाषणे,लेखन द्वारा प्रचार केला. शालेय
शिक्षणाबरोबर लोकशिक्षण गरजेचे आहे. हे जाणून त्यांनी समजकार्याचा वसा उचलला.
Ø
समाजकार्य –
सावित्रीबाईचे शेक्षणिक कार्य हे सामाजिक कार्य होते. कारण कोणताही पगार न घेता,उलट स्वत:चे पैसे खर्च करून त्या गोरगरीब मुलींना शिकवीत असत. घर-संसारासाठी कमी वेळ देऊन त्या जास्तीत जास्त वेळ समाजासाठी देत असत.त्याकाळी जातिभेद मनाला जाई. प्रत्येक जातीचे पानवठे वेगळे असत. विहरीचे पाणी बावन्नकशी सुबोध रत्नाकर ही ५२ कवड्याची रचना केली. तसेच संस्कृत शिवमहिंम्न स्त्रोत्र त्यांनी मराठीत ओवीबद्ध केले.
Ø
सत्यशोधक समाजाची
स्थापना –
१८७३
साली फुले दांपत्याने सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यामधून त्यांनी शाळा काढणे,रात्रशाळा
काढणे ही मुख्य कार्य असली तरी अडचण होती ती
अडाणी आई-बाप मुलांना शाळेत पाठवत नसत. मुलांना
रोज शाळेत रोज आणण्यासाठी एका पट्टेवाल्याची
नेमणूक करण्यात आली. त्याला पाच हजार रुपये पगार ठेवण्यात आला.शाळा,बाळसंगोपन केंद्र,बालहत्या
हळदी-कुंकू समारंभ,विधवा विवाह महिला संघ, शेतकरी संघटना ,दुष्काळ निवारण सभा,प्लेग
निवारण,महिला समिती असे उपक्रम त्यांनी पार पडले.
Ø
प्लेगची साथ –
१८९७
साली पुण्यात प्लेगची साथ आली. माणसे पटापटा
मरु लागली. स्मशानभूमी कमी पडू लागली.कारण त्यांच्या संसर्गाने आपल्याला प्लेग होईल
याची भीती लोकांना वाटत होती. या काळात सावित्रीबाईनी
फार मोठे कार्य केले. सतत काम करत असलेला हा देह प्लेगचा प्रतिकार करू शकला नाही व
त्यातच १० मार्च १८९७ साली त्यांचा मृत्यू झाला.
Ø
युग प्रवर्तक सावित्रीबाई-
सावित्रीबाईनी
बालहत्या प्रतिबंध गृह बांधले,केशवपन बंद करण्यासा ठी प्रथमच न्हाव्यांचा असहकार संप
घडऊण आणला. आंतरजातीय विवाहासाठी पुढाकार घेतला.
त्यांच्या काळातील स्त्रीयांची स्थिति पाहता सावित्रीबाईचे कार्य हे संघर्षाचे,युगप्रवर्तनाचे
होते. म्हणून त्यांना युगप्रवर्तक,समजसुधारणेच्या अग्रणी असे म्हंटले जाते. म्हणूनच
आठ मार्च या महिला दिनाप्रमाणे १० मार्च हा दिवस साजरा केला जातो. आणि दोन्ही दिवशी
सावित्रीबाईचे ऋण व्यक्त केल्याशिवाय महिलांचे
कर्तुत्व वर्णन करता येत नाही.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा