माझा गाव
आपण कितीही मोठे झालो तरी आणि आपण कोणत्याही मोठ्या शहरात राहायला गेलो तरी आपले गाव आपल्या नेहमी आठवणीत असते. आपल्या गावची आपल्याला ओढ असते. यामुळे मी आजच्या या पोस्टमध्ये माझे गाव या विषयावर निबंध लिहीत आहे. हा निबंध तुम्हा सर्वांना आवडेल अशी अशा व्यक्त करते.
माझ्या या गावात म्हणजेच शहरात पंचगंगा नदी आहे . या नदीला नेहमी पाणी असते. राधानगरी धरण हे शाहू महाराजनी बांधले आहे. शाहू महाराज, ताराराणी, संभाजी राजे या थोर राजांचा वारसा लाभलेले हे शहर आहे.सगळीकडे हिरवीगार झाडी आणि हिरवीगार शेते आहेत. कोल्हापूरमध्ये आम्ही जेव्हा रंकाळाला फिरायला जातो तेव्हा आम्हाला खूप मजा येते. आम्ही कोल्हापूरची प्रसिद्ध भेळ खातो.नावेमधे बसतो आणि खूप फिरतो.
कोल्हापुरमध्ये पन्हाळा पहिल्याबरोबर आम्ही झुणका भाकर खातो. न्यू पॅलेस पाहताना शाहू महाराजांच्या आठवणी जाग्या होतात,जणू काही ते आपल्या बरोबर आहे. अजूनही शाहू महाराजांची आजची पिढी तेथे राहते.
कोल्हापूरच्या कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी मिसळ आणि कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा खूप प्रसिद्ध आहे.कोल्हापूरच्या महालक्ष्मी चे दर्शन घेतले कि आपण पावन होऊन जातो. आपल्या मनाला एक प्रकारची वेगळीच शांती मिळते खरच या देवीचे दर्शन नक्की आपण घेतले पाहिजे. अशे आमचे कोल्हापूर सुंदर आणि मनाला मोहवणारे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा