सूर्य उगवला नाही तर ------------
सूर्य उगवला नाही तर सगळीकडे काळोख, अंधार पसरलेला असेल. कोणीही कोणाला दिसणार नाही. सकाळ,दुपारआणि संध्याकाळ असे दिवसाचे तीन प्रहर दिसणार नाहीत. शाळेत जाता येणार नाही,बाहेर खेळायला कोणी दिसणार नाही.
सकाळची सोनेरी सुंदर किरणे दिसणार नाहीत. दुपारी ऊन तापणार नाही आणि सायंकाळी सूर्यास्ताची शोभा दिसणार नाही. सूर्यकिरणांमुळे फुले उमलतात. वृक्षांना अन्न तयार करण्यासाठी मदत होते. सूर्यकिरणांमुळे जमीन तापते आणि त्यामुळे पावसाचे ढग तयार होतात. फळे पिकतात, झाडे वाढतात. ह्या सर्व गोष्टी सूर्य उगवल्यानंतर होतात. सूर्य उगवला नाही तर वरीलपैकी काहीही साध्य होणार नाही. म्हणून सूर्य उगवतो तो या सर्वांकरिता !सूर्य उगवतो सर्वांकरिता!सूर्य उगवतो सर्वांकरिता! अशे मी झोपेत म्हणत होतो.तेवढ्यात आईने अंगावर पाणी मारले आणि उठवले आई बोलली अरे किती वेळ हाका मारते तू उठत नाही म्हणून पाणी मारले आता तरी उठ आणि अंघोळ कर शाळेला उशीर होतो आहे. आईने अशे म्हणताच मी उठून आवरू लागलो.
माझा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे कंमेन्ट करून नक्की कळवा आणि सूर्य उगवला नाही तर --- या विषयीचे तुमचे विचार माझ्यापर्यंत नक्की पोहचवा.धन्यवाद !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा