परीक्षा रद्द झाल्या तर------------
या परीक्षांचा विचार मी करू दिवसभर करू लागले.माझे विचारचक्र चालूच होते. त्याबरोबर माझ्या मनात एक विचार आला कि जर परीक्षा रद्द झाल्यातर पहिल्यांदा पालक कधी बोलणार नाहीत की अभ्यास कर आणि परत अभ्यास कर हा आवाज येणार नाही. कोणत्याही विद्यार्थ्याला कमी मार्क पडले म्हणून बोलणी खावी लागणार नाहीत.कोणालाही कमी पणा वाटणार नाही. काही विद्यार्थ्यांना परीक्षा जवळ आली कि भीती वाटायची आणि या भीतीच्या पोटी काही मुले वाईट पाऊले उचलायची हे सगळे बंद होईल. शिक्षकांना पेपर बनवणे,पेपर तपासणे यासगळ्यातुन सुटका होईल. विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळवण्याच्या मागे ना धावता आपल्या आवडीच्या विषयामध्ये अभ्यास करता येईल.
पण
या उलट परीक्षा रद्द झाल्या तर, विद्याथ्याचे मूलमापन होणार नाही. नोकरीच्या ठिकाणी
हुशार आणि कमी हुशार विद्यार्थ्यांची गर्दी होईल. आणि योग्य मूल्यमापन न होता
कोणालाही नोकरी दिली जाईल. अयोग्य व्यक्ती योग्य जागेवर जाऊन बसेल आणि या ठिकाणचे
नुकसान होईल. आणि तोटा होईल.
परीक्षा घेण्यामागचा सर्वात महत्वाचा हेतू आपल्याला विसरता येणार नाही.
बैद्धिक पात्रता जाणून घेऊन त्याची त्या
विषयातील आवड आणि ज्ञान याची ओळख होते. आणि पुढे जाऊन तो विद्याथी त्या विषयातील
सर्व ज्ञान सपांदन करतो. परीक्षा रद्द झाल्या तर
विद्यार्थ्यांची अभ्यासातून सुटका नक्की होईल पण जी व्यवस्था आज परीक्षा
असल्यामुळे टिकून आहे. ती संपुष्टात येईलआणि विस्कळीत होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा