सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३

शिक्षक दिन

                                                                    शिक्षक दिन


                             
 गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा 

                               गुरुसाक्षात परब्रम्ह तस्मेसी गुरुवे नमः 

   असे आपण नेहमी म्हणत असतो. आपला पहिला गुरु म्हणजे आपली आई . आई आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवीत असते. चांगले संस्कार,समाजात वावरणे,चालणे, बोलणे अनेक चांगल्या- वाईट गोष्टी आपल्याला ती शिकवते.  त्यानंतर आपण जसे मोठे होऊ लागतो तसे आपल्याला शाळेत घातले जाते. आणि आपल्या जीवनाला सुंदर वळण देणाऱ्या आपल्या शिक्षकांशी आपली ओळख होते.५ सप्टेंबर हा दिवस सगळीकडे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णम यांचा जन्मदिवस  शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णम हे चांगले शिक्षक सुद्धा होते आणि भारताचे दुसरे राष्टपती सुद्धा होते. आपण त्यांचा स्मृतिदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. शिक्षक हा कुंभारा प्रमाणे काम करतो तो जसे मातीला आकार देऊन मडके बनवतो त्याप्रकारे शिक्षक हा विद्याथ्यांना घडवण्याचे काम करत असतो.  

      या दिवशी अनेक शाळा आणि महाविद्यालामध्ये विविध कार्यक्रम जसे,उत्सव, भाषणे ,सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक विद्यार्थी पुष्पगुच्छ,भेटवस्तू,ग्रीटिंग देऊन आपल्या शिक्षकांचे आभार मानतात. आपण अभ्यास कसा करावा आणि का करावा या सगळ्याचा आपल्या पुढच्या भविष्यासाठी याचा काय उपयोग काय आहे हे समजावून सांगतात. आपला अभ्यास नाही तर आपल्या भावी जीवनाचे ते आपले हिरो असतात. आपल्याला कधी कोणत्या ठिकाणी काही अडचण आली तर काय करावे हे समजून सांगतात.       अभ्यासाबरोबर इतर  क्षेत्रात आपण कसे चांगले काम करू शकतो हे ते स्वतः करतात आणि आपल्याला त्याचे फायदे हि समजावून सांगतात. आपल्याला जेथे जेथे मदत लागेल तेथे ते आपल्या पाठीशी ठामपणे उभे असतात. आपल्या देशातले डॉकटर, इंजिनिअर ,वकील,लेखक, शात्रज्ञ अनेक क्षेत्रामध्ये प्रगती करतात हे कोणामुळे तर आपल्या शिक्षकांमुळे हे सामर्थ्य त्याच्यामध्ये निर्माण झाले आहे. 

    आज शिक्षणाचा बाजार झाला असून ज्ञानाची बोली लावली जाते. वर्तमान गुरु-शिष्य परंपरा कलंकित होत आहे.विद्याथी शिक्षक या नात्यामध्ये अंतर पडत आहे. आणि याची कारणे जर शिक्षक विद्याथी यांनी समजून घेतली तर हा दुरावा नक्की दूर होऊन हे नाते परत सुंदर होईल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा