बालकवी
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात
येते सरसर शिवरे क्षणात फिरुनी ऊन पडे
वरती बघता इंद्र्धनुष्याचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे
झालासा
सूर्यास्त वाटतो सांज अहाहा! तो उघडे तरु शिखरावर ,
उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे.
या कवितेमधून आपल्याला बालकवींची आठवण होते.आजच्या या लेखामध्ये आपण बालकवींच्या विषयी माहिती पाहणार आहोत.
💥बालकवींचे बालपण आणि शिक्षण
बालकवींचे
संपूर्ण नाव त्र्यबंक बापूजी ठोंबरे आहे. यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९०मध्ये झाला.
यांचे वडील पोलीस खात्यामध्ये नोकरीसाठी होते. त्यामुळे त्यांचे बालपण आणि शिक्षण
वेगवेगळ्या ठिकाणी झाले. इयत्ता चैथी मध्ये असताना काव्य लेखनाची आवड होती.
त्यांनी लहान असताना श्रीधर माहितीपंथ यांच्या कविता वाचल्या. यांच्या आनंद आणि
निराशा यांच्या कवितेतून व्यक्त होतो. त्यांची ओठावर येणारी कविता म्हणजे आंनदी
आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे अशा अनेक कविता त्यांनी लिहल्या. त्यांची बहीण जीजी यांनी त्यांना संस्कृत
शिकवले आणि त्यांनी त्यांना कवितेकडे
वळवले. पुढे त्यांनी संस्कृत वर प्रभुत्व मिळ्वण्यासाठी स्वतःहून अभ्यास केला.
यायच्या अकराव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहली पण त्यांनी त्यांना नाव दिले
नाही पुढे प्राध्यापक पाटणकर यांनी त्याला वनमुकुंद असा शीर्षक दिला.
बालकवी यांनी १० ते १२
वर्षाच्या काळात १६३ कविता लिहल्या. त्यामधील काही प्रसिद्ध झालेल्या कविता म्हणजे
-१) आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे २) फुलराणी ३) औदुबर ४) श्रावण मासी हर्ष
मानसी हिरवळ दाटे चोहीकडे या आशा अनेक कविता प्रसिद्य आहेत. त्यांच्या कवितांमधून
लोकांना एक नवीन प्रेरणा मिळत होती. या मुले लोक त्यांच्या कविता आवर्जून वाचत
असत.
💥बालकवींचा मृत्यू -
बालकवी एकदा बहिनिच्या मुलीच्या लग्नासाठी खानदेशी गेले
होते. तेव्हा त्यांचे मित्र सोनाळकर यांचे पत्र आले. त्यांनी त्यांना
भेटण्यासाठी बोलावले. त्यांना भेटण्यासाठी ते घाईघाईने रेल्वेस्टेशन
कडे चालू लागले. आणि त्यांचा पाय रुळाखाली अडकल्याने त्यांचा
रेल्वे खाली मृत्यू झाला. तो दिवस ५ मे १९१८हा होता. त्यांचे
आठाविसाव्या वर्षी निधन झाले. त्यांनी त्यांच्या या अल्पश्या
आयुष्यामध्ये १६३ कविता लिहल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा