सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३

महात्मा गांधी

                                                                      महात्मा गांधी 

रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीता राम

ईश्वर अल्लाह तेरो नाम , सबको सन्मति दे भगवान 

   हे भजन कानावर आले कि आपल्याला महात्मा  गांधीजींची आठवण होते. आजच्या या पोस्ट मध्ये आपण महात्मा गांधी यांच्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 

   महात्मा गांधीजींचे संपूर्ण नाव २ ऑक्टोबर १८६९रोजी गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी झाला. त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे आहे. त्यांचे वडील राजकोट येथे दिवाण होते. आई धार्मिक स्त्री होती. आपल्या भारताच्या स्वतंत्र लढ्यात त्यांनी महत्वाची भूमिका घेऊन देशाला स्वतंत्र मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. यामुळे त्यांना राष्ट्रपिता म्हणतात. 

     हे नाव त्यांना सर्वप्रथम नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांनी दिले. महात्मा गांधी मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर इंग्लंड गेले होते जिथे त्यांनी न्यायशासनाचा अभ्यास केला. नंतर त्यांनी अ‍ॅडव्होकेट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नंतर बॅरिस्टर म्हणून भारतात परतले आणि मग मुंबईत वकील म्हणून काम करू लागले.हे नाव त्यांना सर्वप्रथम नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांनी दिले. महात्मा गांधी मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर इंग्लंड गेले होते जिथे त्यांनी न्यायशासनाचा अभ्यास केला. 

    नंतर त्यांनी अ‍ॅडव्होकेट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नंतर बॅरिस्टर म्हणून भारतात परतले आणि मग मुंबईत वकील म्हणून काम करू लागले.एकदा गांधीजींना स्वतः एका ब्रिटिश गोऱ्या वर्णाच्या माणसाने ट्रेनमधून बाहेर काढले होते कारण गांधीजी त्या ट्रेनमध्ये प्रथम श्रेणीतून प्रवास करत होते. त्या काळात फक्त गोरे माणसंच फर्स्ट क्लास मधून प्रवास करणं आपला हक्क समजायचे. 

   गांधीजींनी या घडलेल्या गोष्टीवरून प्रतिज्ञा घेतली की ते काळे आणि भारतीय लोकांसाठी लढतील. त्यांनी तिथे राहणाऱ्या भारतीयांच्या जीवनासाठी सुधार केले त्यासाठी काही चळवळी केल्या. दक्षिण आफ्रिकेमध्ये चळवळीच्या दरम्यान त्यांना सत्य आणि अहिंसा याचे महत्त्व समजले.

  भारतात परत आल्यावर त्यांना तशीच परिस्थिती दिसली जशी त्यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये दिसली होती. १९२० मध्ये त्यांनी नागरी अवज्ञा चळवळ सुरू केली आणि ब्रिटिशांना आव्हान दिले.  १९३० मध्ये असहकार चळवळ ची स्थापना केली आणि  १९४२मध्ये त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडून जाण्यास सांगितले.

         स्वातंत्र्याच्या चळवळीत ते अनेक वेळा तुरुंगात देखील गेले. अखेर  त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि १९४७मध्ये भारत स्वतंत्र झाले.  

                                            परंतु दुर्दैवाने नाथूराम गोडसे नावाच्या व्यक्तीने ३० जानेवारी १९४८ रोजी ते संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी जात असताना महात्मा गांधी ह्यांची गोळ्या घालून हत्या केली. 

       माझा हा निबंध तुम्हा सगळ्यांना कसा वाटला याच्या  प्रतिक्रया माझ्यापर्यंत नक्की पोहचवा. धन्यवाद !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा