💥💥💥 रवींद्रनाथ टागोर
💥रवींद्रनाथ टागोर
परिचय : प्रतिभाशाली रवींद्रनाथांना जागतिक पातळीवर नोबेल पारितोषिक ज्यांना मिळाले,त्या रवींद्रनाथ
टागोरांचे नाव भारतातल्या प्रत्येक
घराघरात माहित आहे. त्यांचा गीतांजली हा
काव्यसंग्रह प्रशिध्द आहे. भारतात जे थोर महापुरुष होऊन गेले,त्यात जागतिक
कीर्तीचे महाकवी,तत्वन्य,साहित्यिक आणि
नवीन शिक्षणपद्धतीचे प्रवर्तक म्हणून रवींद्रनाथ टागोर यांचे नाव घेतले जाते.
रवींद्रनाथ यांचे सर्व
वाड्मय हे ४० खंडामध्ये प्रसिद्ध झालेले आहे.
रवींद्रनाथ हे मानवतेचे पुरस्कर्ते होते.
💥जन्म,बालपण आणि शिक्षण : रवींद्रनाथांचा जन्म ७ मे १८६१ रोजी अत्यंत
समृद्ध घराण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव शारदादेवी आणि वडिलांचे नाव देवेंद्रनाथ
होते. त्यांना आठ भाऊ आणि सहा बहिणी होत्या. त्याकाळात घरी मुलांना शिकवावे हि
पद्धत फार रूढ होती. शाळा संपल्यावर ते घरी आले. कि,व्यायाम शिकवणारे
शिक्षक येत,नंतर चित्रकलेसाठी त्यांच्या वडिलांनी शिक्षक
नेमले होते. मग इंग्लिश शिकवण्यासाठी शिक्षक येत. ते सात -आठ वर्षाचे असताना कविता
करत. कवितेबरोबर संगीतही शिकले. त्यांना बॅरिस्टर पदवी प्राप्त व्हावी म्हणून
इंग्लडला पाठविले पण कायद्याचे शिक्षण त्यांना आवडत नव्हते. शेवटी ते परत आले.
त्या लोकगीतांच्या चाली त्यांनी आत्मसात केल्या. या चालीवर त्यांनी वाल्मिकी
प्रतिमा आपल्या संगीतिकेमध्ये गीते लिहली १८८३ साली त्यांचा विवाह झाला. त्यांच्या
पत्नीचे नाव मृणालिनी हे होते. त्यांना तीन कन्या व दोन मुले झाली.
💥शैक्षणिक,साहित्य देशासाठी केलेले कार्य: रवींद्रनाथानी कलकत्त्यापासून जवळच असणाऱ्या
शांतिनिकेतन येथे अरण्यशाळा काढली. श्रीनिकेतन हि संस्था काढली. यावर रवींद्रनाथ यांनी वृक्षाच्या सावलीत,तपोवनाच्या
कल्पनेच्या आधारित त्यांनी शिक्षणाची नवी पद्धत सुरु केली. आश्रमात त्यांनी
चित्रकला,त्याचबरोबर शेती-शिक्षण आणि ग्रामसुधारणा
यांचेही शिक्षण सुरु केले. या शांतिनिकेतन विद्यालयातून पुढे विशवभारती विद्यापीठ
उभे राहिले. तेथे जगभरातून आलेले हजारो विद्याथी शिक्षण घेत. रवींद्रनाथ यांनी जण गण मण हे राष्ट्रगीत
त्यांनी लिहले.
💥रवींद्रनाथ टागोर यांचा मृत्यू:
टागोरांनी आपल्या आयुष्याचे शेवटचे ४ वर्ष दीर्घ आजार व दुःखात घालवले. १९३७ सालाच्या शेवटी त्यांची अवस्था आणखीनच बिघडली.
परंतु ते वाचावले. याच्या जवळपास तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा अशीच अवस्था निर्माण
झाली. या नंतर ते जेव्हाही चांगले होत असत तेव्हा कविता लिहित असत. या काळात
त्यांनी एकाहून एक सुंदर कविता लिहिल्या. दीर्घ आजारानंतर ७ ऑगस्ट १९४१ ला कोलकात्यातच त्यांनी जगाचा निरोप घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा