💥💥 लोकमान्य टिळक
💥परिचय
: संपूर्ण भारतात शिवाजीमहाराजनंतर लोकमान्य टिळकाएवढा युगप्रवर्तक महापुरुष दुसरा
झालाच नाही. लोकमान्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव
येथे झाला. पार्वतीबाई व गंगाधरपंत हि त्यांच्या माता व पित्याची नावे, अत्यंत तीव्र बुद्धिमत्ता,कणखरपणा ,निर्भयता या गुणामुळे ते
सर्वच भारतीयांच्या गळ्यातील कंठमणी बनले. त्यांचे पूर्ण नाव बळवंत गंगाधर टिळक.
बालपणापासून टिळकांचा गणित व संस्कृत या विषयाचा अभ्यास चांगला होता.
त्यावेळचे सुप्रसिद्य गणिततज्ञ् केरूनाना छत्रे ह्यांचे टिळक हे आवडते विद्याथी होते. टिळकांनी १८७३ साली पुण्याच्या डेक्कन कॉलेजात परीक्षेत त्यांना अपयश आले. म्हणून एक वर्ष त्यांनी शरीरस्वाथ चांगले राहण्यासाठी घालविले. पौष्टिक आहार आणि खूप व्यायाम करून शरीर सुदृढ केले. शिक्षण संपल्यावर देशसेवा करायचे ठरवले. वयाच्या १५ व्या वर्षी म्हणजे १८७१ साली त्यांचा विवाह सत्यभामाबाईशी झाला. पुढे ते गणित विषय घेऊन बी.ए . झाले. नंतर त्यांनी १८७९ साली एल .एल. बी. ची पदवी घेतली. त्यांनी कायद्याचा अभ्यास केला, त्यांचा उपयोग त्यांना केसरीतील लेख,राजकीय भाषणे करण्यात आला. त्यांना तीन मुले आणि तीन मुली झाल्या. बहुविध क्षेत्रातील कार्य: शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करतांना, तरुणांमध्ये देशाचे प्रेम निर्माण घेतला. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूल हि शाळा सुरु केली. आणि २ जानेवारी १८८५ रोजी फर्ग्युसन कॉलेज काढले. ह्यसाठी त्यांना विष्णूशाश्त्री चिपळूणकर,आगरकर,यांनी साहाय्य केले. त्यानंतर टिळक-आगरकरांनी
💥लोकशिक्षण आणि जागृतीसाठी वृत्तपत्र बहुविध क्षेत्रातील कार्य: शिक्षणाच्या
क्षेत्रात कार्य करतांना, तरुणांमध्ये देशाचे प्रेम
निर्माण घेतला. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूल हि शाळा सुरु केली. आणि २
जानेवारी १८८५ रोजी फर्ग्युसन कॉलेज काढले. ह्यसाठी त्यांना विष्णूशाश्त्री
चिपळूणकर,आगरकर,यांनी साहाय्य
केले. त्यानंतर टिळक-आगरकरांनी लोकशिक्षण आणि जागृतीसाठी वृत्तपत्र सुरु करण्याचा बेत निश्चित केला. २ जानेवारी
१८८१ रोजी मराठा आणि ४ जानेवारी १८८१ रोजी केसरी चा अंक प्रसिध्य करण्यात आला.
केसरीतून आपले विचार निर्भयपणे व निःपक्षपातीपणे मांडीत. त्याकाळात इंग्रज देशाची
लूटमार करीत होते. राजकीय स्वातंत्र आपल्याला नाही,याची जाणीव
बहुजनसमाजास झाली नव्हती. सामाजिकदृष्ट्या देश मागासलेला होता. संबंध समाज
निरनिराळे लोकभ्रम व विचित्र रूढींनी ग्रस्त झाला होता. अस्पृश्यता कठोरपणे पाळली
जात होती. स्त्री गुलामगिरी वावरत होती. अशा परिस्थितीत टिळक व आगरकरांनी केसरी व
मराठा या वर्तमानपत्रद्व्यारे लोकांमध्ये जनजागृती केली.जनतेच्या अन्यायाला वाचा
फोडली पण त्यावेळी राजकीय सुधारणा आधी कि, सामाजिक सुधारणा
आधी याबद्दल टिळक आणि आगरकर यांच्या मध्ये मतभेद निर्माण झाले. ते विकोपाला गेले..
टिळकांनी डेक्कन एजुकेशिअन सोसायटीचा राजीनामा दिला.
त्यानंतर रॅर्डच्या खुनानंतर केसरीतील त्यांनी
दोन जहाल लेख लिहले त्यांना १८ महिन्याची शिक्षा झाली. त्यांच्या
राष्ट्रजाग्रणाच्या कार्याला पायबंद बसावा म्हणून,केसरीतील अग्रलेखाचे
निमित्त करून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला ब्रिटिश सरकारने भरला व तो चांगला
गाजला. त्यांना ६ वर्ष साध्या कैदेची शिक्षा दिली गेली. मंडालेच्या तुरुंगात
असताना,त्यांच्या
पत्नीचे निधन झाले. अत्यंत प्रतिकूल वातावरणात त्यांनी जगप्रसिद्ध असा गीतारहस्य
हा ग्रंथ लिहला.
होमरूल लीगच्या प्रसारासाठी टिळकांनी देशभर द्रौरा काढला.हजारो व्याख्याने दिली. लेख लिहले या चळवळीच्या सबंधी केलेल्या एका भाषणाबद्दल सरकारने टिळकांकडून चाळीस हजार रुपयाचा जामीन मागितला.पण त्यावेळी स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो मी मिळवणार असे तेजस्वी उद्धार त्यांनी काढले.
समाजात जागृती व्हावी आणि परदास्याची जाणीव लोकांना व्हावी म्हणून
गणेशउत्सव आणि शिवजयंती उत्सव टिळकांनी सुरु केले. हे दोन्ही उत्सव अल्पावधीत
लोकप्रिय झाले ते आजपर्यंत चालू आहेत.
अतिशय कणखर व्यक्तिमत्व,स्थितप्रद्न्य स्वभाव, देशभक्तीने प्रेरित होऊन
कार्य करण्याची निष्ठा हे गुण असणाऱ्या क्रांतिवीरांच्या या महामेरूंची प्राणज्योत
१ ऑगस्ट १९२० ला मावळली. माझा हा निबंध
तुम्हा सर्वाना कसा वाटला हे कंमेन्ट करून नक्की कळवा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा