💫💫 💫💫 स्वामी
विवेकानंद
‘‘मानव हीच ईश्वर सेवा’’
हा संदेश जगाला देणारे स्वामी विवेकानंद यांचा निबंध आज आपण पाहणार आहोत,तर मग चला तर
आपल्या निबंधला सुरवात करूया,
💫💫जन्म आणि शिक्षण : १२ जानेवारी १८८३रोजी कलकत्ता येथे त्यांचा जन्म झाला.
त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी आणि वडिलांचे नाव विरेश्वर असे होते. त्यांचे
पाळण्यातील नाव नरेंद्र होते. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती. बालवयात ते
कोणतीही गोष्ट पारखून घेत. भगवान श्री कृष्ण आणि हनुमंत यांच्यावर त्यांची
निःसीम भक्ती होती. त्यांचे महाविद्यालीन शिक्षण कलकत्ता येथे झाले. शाळेत असताना
आभ्यासाबरोबर साहित्य,तत्वज्ञान इ. चा
अभ्यास त्यांच्याकडून करून घेत. जनरल असेम्ब्ली या कॉलेज मधून तत्वज्ञान विषय घेऊन
ते बी.ए झाले. त्याचे प्राचार्य एकदा त्यांना शिकवत असताना Extasy ह्या शब्दाचा
उचार त्यांच्याकडून झाला. तेव्हापासून समाधी,ईश्वराचा शोध इ. विषय चिंतन सुरु
केले. आणि ते रामकृष्ण परमहंसांकडे गेले.
💫💫 अध्यात्मिक आणि राष्ट्रीय कार्य:
रामकृष्ण परमहंसांकडे आल्यावर त्यांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. आपण
ईश्वर पहिला आहे का?
असा प्रश्न विचारता त्यांनी होय म्हंटले. मलाही ईश्वर पाहायचा आहे. हि तळमळ
नरेंद्रना लागली आणि त्यांनी चित्रं,मनन ,ध्यान-धारणा करू लागले. त्यांची योग्य वेळ येताच
रामकृर्णानी त्यांना कानमंत्र दिला. मानव सेवा हीच ईश्वर सेवा होय. आणि मनुष्यसेवा
करण्यासाठी ते भारतभर फिरू लागले. लोकांचे दुःख,रोगराई,उपासमार, अज्ञान पाहून
त्यांना फार दुःख झाले. लोकांची प्रगती करण्याच्या दृष्टीने त्यांनी संन्यासी
व्हायचे असे ठरवले. उठा,जागे व्हा चांगले कार्य करा थांबू नका हा अमृत बोध
त्यांना मिळाला. अमेरिकेत माझ्या बंधू आणि भगिनींनो हे शब्द ऊचरले. टाळ्यांच्या
कडकडाट झाला. अवघ्या पाच मिनिटाच्या भाषणात
त्यांनी सर्व सभा जिकली. लोकांची हृदये जिकून घेतली.
पुढे इंग्लंडला
गेल्यावर मार्गारेट नोबेल त्यांच्या शिष्य झाल्या तिचे नाव भगिनी निवेदिता असे
ठेवले. परदेशातून परतल्यावर त्यांनी १८९८ मध्ये रामकृष्ण मठ उभा केला. नंतर
रामकृष्ण मिशनची स्थापना केली. भविष्यकाळाला नवे वळण दिले पाहिजे म्हणजे
पूर्व-पश्चिम हा भेद राहणार नाही. विज्ञानाच्या साहाय्याने सर्व गोष्टी तपासून
पहिल्या पाहिजेत. धर्म हा भारताचा केंद्रबिंदू आहे. पण धर्मामुळे मानवाच्या
चित्ताचे शुद्दीकरण झाले पाहिजे. व धर्माने संकुचित दृष्टिकोनातून बाहेर काढून
उदार व व्यापक दृष्टीकोन बनविण्यास मानवाला मदत केली पाहिजेअसे ते म्हणत. शेवटी असे कार्य
करीत असताना आपला अंतकाळ जवळ आल्याचे त्यांना जाणवले आणि ४ जुलै १९०२ रोजी ते
पंचत्वात विलीन झाले. आपल्या तेजस्वी विचारांनी आणि कार्याने ते अमर झाले. माझा हा
निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला कंमेन्ट करून नक्की कळवा .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा