बुधवार, १२ जुलै, २०२३

गुढीपाडवा

                                                                  गुढीपाडवा 

                             गुढी विचारांची,गुढी विचारवंतची

गुढी ध्यासाची,गुढी शैार्याची

 गुढी परंपरेची,गुढी मराठी अस्मितेची

 गुढी राष्ट्राची, गुढी महाराष्ट्राची

गुढी सीमेवर असलेल्या प्रत्येक  विश्वासू सैनिकांची

गुढी वारकरी संप्रदायाची

गुढी आईच्या वात्सल्याची

                हिंदू धर्मात अनेक सण साजरे केले जातात.दिवाळी,दसरा,होळी,

गणेशउसत्व आणि प्रत्येक सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक सणाचे पैाराणिक महत्त्व आहे. चैत्र महिन्यात साजरा केला जाणाऱ्या हिंदू धर्माच्या नववर्षाचे महत्त्व आपण पाहूया.

 हिंदू धर्मीयांच्या नवीन वर्षाची सुरवात गुढीपाडवा या सणाने होत असते. चैत्र महिन्यात सर्वत्र प्रसन्नतेचे वातावरण असते. वृक्षांना नवीन पालवी फुटते. लहान बाळाप्रमाणे झाडे सुंदर दिसतात. या महिन्यात सर्वत्र रंगाची उधळण सुरू असते.सगळीकडे आनंदी आनंद असतो. महाराष्ट्र या राज्यासोबत आंध्रप्रदेश आणि गोव्यासह दक्षिण भारतीय लोकही गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करतात.

           या सणदिवाशी बांबूपासून तयार केलेली गुढी उभी केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी वस्त्र ,कडुलींब,फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर तांबा बसविला जातो. पाटाभोंवती रांगोळी काढली जाते. आणि नैवदय दाखवला जातो.

    या सणाचे महत्त्व म्हणजे सर्व युगातील सतयुगाची सुरवात याच तिथीपासून झाली असे मानले जाते. हा सण साडेतीन मुहुतापैकी  एक मनाला जातो. असे मानले जाते की रामायण काळात गुढीपाडव्याच्या दिवशी श्री रामांनी वनराज बळीच्या अत्याचारातून लोकांना मुक्त केले तेव्हा लोकांनी घराघरात विजयाचा झेंडा फडकवला. या दिवशी घरी पुरणपोळी,श्रीखंड,पुरी असा बेत असतो.

     कडुलिंबाचे महत्त्व म्हणजे गुढीला कडुलिंबाची पाने बांधली जातात.कडुलिंब आरोग्यास फायदेशीर असतो. तसेच या महिन्यात भरपूर उकाडा असाल्यमुळे कडुलिंब सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. हा दिवस सर्वजन मोठ्या उत्साहाने साजरा करत मिरवणुका काढतात. महिला,लहान मुले,पारंपरिक पोषाखात मिरवणुकीत सहभागी 

होतात. येणारे वर्ष आंनदाचे भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 

करतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा