गुरुवार, १३ जुलै, २०२३

अनाथांची आई -सिंधुताई सपकाळ

 

                   💐 अनाथांची आई -सिंधुताई सपकाळ💐

                     


                                जीवनात कधी संकटे आली तर

                               त्यावर पाय देऊन उभे रहा,

                                त्यामुळे संकटाची उंची कमी होईल.

        असे म्हणणाऱ्या सिंधुताई  सपकाळ अनाथांसाठी समाजकार्य करणाऱ्या एक मराठी समाजसेविका म्हणून ओळखल्या जात होत्या.यांचा जन्म वर्धा येथे झाला होता. सिंधुताई महाराष्ट्रातील मेंढपाळ कुटूंबातील होत्या.त्यांना लहानपणी खूप कष्ट करावे लागले. वयाच्या १० व्या वर्षी एका मोठ्या माणसाशी त्यांचे लग्न झाले. लग्नाअगोदार त्यांचे शिक्षण चोंथी पर्यन्त झाले. त्यांना शिकण्याची खूप इच्छा होती. पण त्यांच्या सासरच्या लोकांनी त्यांना शिकून दिले नाही.लग्नानंतर त्यांना शिकू दिले नाही.

             सिंधुताईना समाजसुधारक म्हणले जाते,कारण त्यांनी अनेक

अनाथ मुलांचे संगोपन केले. सिंधुताईना २०१६ मध्ये डॉ. डी. वाय पाटील इंनस्टीटुड अँड रिसर्च सेंटरने त्यांना साहित्यात डायरेक्टर पुरस्कार प्रदान केला.

                           माणस मोठी तीच होतात जी

                          माणसाला माणूस बनून माणसासाठी

                         जगायला शिकवतात.

      सिंधुताईना स्वत:च्या आयुष्य खूप हलाकीचे गेले. अनेक वाईट गोष्टीचा सामना त्यांना करावा लागला. सिंधुताईचे लग्न फार काळ टिकले नाही. त्यांना नवऱ्याने हाकलले आणि आईने सुद्धा त्यांचाकडे पाठ फिरवली . आपल्या लहान मुलीला रेल्वे स्टेशनवर घेऊन त्या राहत आणि भीक मागून त्या आपले पोट भरत असत.त्यानंतर त्यांनी स्मशानभूमी मध्ये राहायला सुरवात केली. आपल्या मुलीला त्यांनी सेवा सदन मध्ये दाखल केले. आणि स्वत: त्यांनी अनाथ मुलांची सेवा करायला सुरवात केली.         

            सिंधुताईनी चिखलधरा येथे पाहिले आश्रम सुरू केले.त्यांना सर्वजण माई म्हणून संबोधतात.त्यांनी आश्रय देलेले लोक आताडॉक्टर,वकील,इंजिनियर म्हणून काम करतात.त्यांना त्यांच्या कार्यासाठी सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

       सिंधुताईनी कठीण परस्थीतीवर मात करून गरीब अनाथ मुलांची सेवा केली आणि आपल्या सर्वानसमोर एक आदर्श उभा केला.महिलांवर होणारे अत्याचार  लक्षात घेऊन त्यांनी समजसेवेचे कार्य हाती घेतले.अनाथांनच्या माई होत्या. महाराष्ट्र शासनाने त्यांना आहील्याबाई होळकर पुरस्कार दिला.सर्व आयुष्य लोकांच्या सेवेमध्ये त्यांनी वाहून घेतले.

                              रात्रीच्या अंधाराला घाबरू नका

                             उद्याच्या दिवासाची वाट पहा

                              एक दिवस तुझ्या ही उजडेल.

असे सर्वाना सांगणाऱ्या आणि लोकांना जगण्याचे बळ देणाऱ्या  सिंधुताईं ४ जानेवारी २०२२  रोजी हृदयविकराच्या झटक्याने निधन झाले आणि अनेक मुलांना सिंधुताईं पोरके करून गेल्या.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा