गुरुवार, १३ जुलै, २०२३

मला पंख असते तर ..

 

                  मला पंख असते तर ..  

        मी माझ्या आई बरोबर बागेमध्ये गेलो होतो. बागेमध्ये खूप खेळलो बागेमध्ये खूप पक्षी होते. त्यांना पाहून माझ्या मनात विचार आला की मी पक्षी झालो तर .. म्हणूनच आजच्या निंबधचा विषय आहे, मला जर पंख असते तर..

          मलाही हे सुंदर आकाश पाहता येईल ,आकाशाची भव्यता आणि सैांदर्य मलाही मोहून टाकेल. आकाशाचा निळा रंग मला जवळून पाहता येईल.  सगळ्या आकाशाची  मी भटकंती केली असती. लगेच एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाता आले असते. कोणत्याही वाहनाची आवश्यक्यता नाही. आपण आपल्या नातेवाईकांना फोन करतो पण मला जर पंख असते तर मी त्यांच्याकडे  उडत उडत गेलो असतो. आकाशाची सैर करण्यासाठी आता मला विमानाचा पासपोर्ट काढण्याची गरज नाही.

    मनाला वाटेल तेव्हा मी एकडून तिकडे जाईंन. वेगवेगळ्या झाडांची थंड हवा अनुभवल्या असत्या आणि गोड फळे ही खाली असती. या फळा साठी मला पैसे ही दयावे लागले नसते. खूप खूप मजा मी केली असती.

        थोड्या वेळाने मी माझ्या सुखद कल्पनेतून बाहेर आलो. मनुष्याला पंख नसले तरी त्याला बुद्धी मिळाली आहे. ज्या बुद्धी च्या बळाव आपण  काहीही करू शकतो. माझ्याकडे शारीरिक पंख नसले तरी आता देणरूपी पंख आहे आणि हे पंख वापरुन मी समाज कुटूंब व देशाचे कल्याण करणार आहे. यासाठी मी पुस्तके वाचून माझे द्यानरूपी पंख मोठे करून आकाशात उंच विहार करणार आहे आणि सर्वांचे कल्याण करणार आहे.

               

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा