शुक्रवार, १४ जुलै, २०२३

नागपूर-महाराष्ट्राची उपराजधानी

 

                      नागपूर-महाराष्ट्राची उपराजधानी

  

     नागपूर हे महाराष्ट्र राज्याचे उपराजधानी व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे.भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून आणि दुसरे हरित शहर म्हणून ओळखले  जाते. महाराष्ट्रील विधिमंडळाचे  हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत असल्याने महाराष्ट्राच्या विदर्भातील व्यावसाईक आणि राजकीय  हालचालीचे प्रमुख केंद्र आहे.विशेषतहा नागपूर जिल्हयात संत्रीचे उत्पन्न जास्त येते म्हणून याचा व्यापार चांगला होतो. संपूर्ण देशात नागपूरची संत्री प्रसिध्द  आहेत.

v  भैागोलिक स्थिती व हवामान –

      नागपूर शहराचे २२० चैा . कि.मी.असून समुद्रसपाटीपासून उंची ३१० मी आहे. येथे हवामान शुष्क व थोडे उष्ण असते.जून ते सप्टेंबरदरम्यान पाऊस पडतो.


 
v  नागपूर शहराचे महत्त्वपूर्ण योगदान –

         भारतीय स्वतंत्रयूध्दात नागपूर शहराने  महत्त्वपूर्ण योगदान दिले. असहकार आंदोलंन नागपूरच्या १९२० च्या अधिवेशनपासून सुरू झाले.

       आजही नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते.१९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये आपल्या लाखों अनुयायबरोबर बैाध्द

धर्माची दीक्षा घेतली. नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे  व्यवसाईक केंद्र आहे.बूटबोरी ही आशियातील सर्वात मोठी ओद्योगिक वसाहत नागपूरमध्ये आहे.

v  लोकजीवन व संस्र्कूती –

            येथे मराठी ही भाषा सर्वात जास्त बोलली जाते. मराठीची वऱ्हाडी बोलीभाषा विशेष करून बोलली जाते. शहरात वर्षभरात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. त्यात रामनवमी हा मुख्य उत्सव असून त्या वेळी भव्य शोभयात्रेचे आयोजन केले जाते.सार्वजनिक उत्साहात मानवी वाघ हा येथे प्रसिध्द आहे. महाराष्ट्र शासन आयोजित कालिदास महोत्सव येथे साजरा होतो.

v     पर्यटन स्थळे

दीक्षाभूमी- हा जगातील सर्वात मोठा पोकळ स्तूप आहे. येथे डॉ. आंबेडकर यांनी बैाध्द धर्माची दीक्षा घेतली.

सितबर्डी किल्ला-

      येथे इ. स .१८१७ मध्ये ब्रिटश व राघूजीराजे भोसले यांच्यात युद्ध झाले. रामनगर येथील अध्यात्म मंदिर व रेल्वे स्थानकाजावळील पोद्दारेश्वर मंदिर ही राम मंदिर प्रसिध्द आहेत.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा