मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

माझे आवडते शिक्षक

                                                                माझे आवडते शिक्षक

 
आपले जीवन  आनंदमय करण्यासाठी आपल्या जीवनात अनेक लोकांचा सहभाग असतो. आपली आई आपला पहिला गुरु असते. जेव्हा आपण शाळेत जातो  तेव्हा आपले शिक्षक आपले दूसरे गुरु बनतात. आपले तिसरे गुरु हा प्रश्न  आपल्या सर्वाना पडला असेलच ना मग आपला तिसरा गुरु आपला आजूबाजूचा समाज होय. 

      आपले शिक्षक आपल्या जीवन घडणीत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आपल्या जीवनातील प्रत्येक वाटेवर आपली मदत करत असतात. अगदी अक्षरे शिकण्यापासून ते नवनवीन गोष्टी शिकण्यापर्यंत ते आपल्याला मदत करतात. माझ्या शालेय जीवनात सुद्धा मासाळ सर यांनी मला अभ्यासाची योग्य पद्धत शिकवली. मासाळ सर आम्हाला इतिहास विषय शिकवत होते. ते शिकवताना नेहमी मुद्द्याचा वापर करून शिकवायचे. त्यांचे शिकवणे. खूप सुंदर असायचे. इतिहास हा विषय कधीही कंटाळवाणा नाही वाटला. त्याचबरोबर आपण समाजात वावरत असताना कोणती मूल्ये पाळावी या गोष्टी नेहमी ते समजावत. त्यांचा आवाज नेहमी मोठा आणि स्पष्ट असायचा. इतिहास या विषयाबरोबर वेळेचे नियोजन कसे करावे हे त्यांनी आम्हाला समजावत. त्याचा वापर अजूनही मी माझ्या जीवनात करते.


         शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सरांबदद्ल खूप आदर होता आणि आदरयुक्त भिती सुद्धा होती. सरांचा आवाज ऐकला तर सर्वजण शांत होत. सरांना आम्ही  शिक्षकदिना दिवशी आम्ही सर्व मित्र - मैत्रीणी मिळून सुंदर भेटवस्तू देत असू.आशा आदर्श शिक्षकाना आम्ही कधी विसरणार नाही. आमचे हया सारांनी खूप कमी वयात या जगाचा निरोप घेतला पण त्यांचा जो सहवास आम्हाला लाभला तो खूप मोलाचा होता.या जीवनमूल्याचा वापर  आज मी माझ्या जीवनात  करते. आम्ही सर्वजण मिळून त्याच्या पुण्यतिथी दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करतो. आजही आम्ही सारांना आठवणीत ठेवले आहे. त्यांची चांगली शिकवण आजही आमच्या सोबत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा