माझे आवडते फळ आंबा
आपल्या परमेश्वराने आपलयाला निसर्गाच्या रूपाने मनुष्याला खूप मोठा खजिना दिला आहे. उंच पर्वत,नद्या,सूर्य,चंद्र,तारे,झाडे,फुले,फळे आशा अनेक गोष्टी दिल्या आहेत. यामुळे आपल्याला निसर्गातील गोष्टींचा उपभोग घेता येतो. फुले ही निसर्गाने दिलेली सुंदर देणगी आहे. याचा वापर आपण देवाला वाहण्यासाठी आणि सजावटीसाठी करतो. तसेच फळांचा वापर आपण आपण खाण्यासाठी आणि वेगळे पदार्थ बनवण्यासाठी करतो. त्यामधील सुंदर फळ म्हणजे आंबा आहे. हे फळ सर्वांच्या आवडीचे असते. आंब्याला फळाचा राजा म्हणले जाते.
जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आढळतात.आंबा हा फळांचा राजा असण्यासोबत भारताचे राष्ट्रीय फळ आहे.भारतात आंब्याच्या १०० हुन अधिक जाती आहेत. आंबा खूप स्वादिष्ट फळ आहे. भारतीय लोक उन्हांळ्यात आंब्याची खूप आतुरतेने वाट पाहतात. आंब्याचा रस भारतातील सर्वात प्रसिद्द रस आहे. आंबा व्हिटॅमिन ए ,सी आणि डी ने परिपूर्ण आहे. आंबा खाल्याने व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होणारे रोग कमी होतात.
आंब्यापासून लोणचे,मुरब्बा व जाम बनवले जाते. लहान मुलांना आंबा खायला खूप आवडते. कैरी पासून पनहे बनवतात ते खूप छान लागते. इतर देशामध्ये आंब्याची निर्यात केल्याने भारताला मोठया प्रमाणात विदेशी मुद्रा प्राप्त होत आहे. आंब्याचे नियमित सेवन केल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. आंबा हा नेहमी गरम असतो यामुळे याला नेहमी थंड पाण्यात ठेऊन खावे .उन्हाळ्यात आम्ही मोठया प्रमाणात आंबे खातो. आंबा हा आमचा सर्वात आवडतीचा फळ आहे.


.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा