आपण शिकलो म्हणजे सर्वकाही झाले
असे नाही. शिक्षणाचे महत्त्व आहे,त्यात काही
शंका नाही,मात्र शिक्षणाबरोबरच
माणसाने शीलही सुधारले पाहिजे..
शिलाशिवाय शिक्षणाची
किंमत केवळ शून्य आहे.
असे, म्हणणारे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशतील महू या गावी झाला.
पण ते रत्नगिरी मध्ये अंबवडे या गावी राहत असे,त्यांचा मराठी कुटुबंशी संपर्क होता.
घरातील सर्वात छोटे सदस्य असल्यामुळे सगळ्याचे
लाडके होते.
|
नाव |
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर |
|
जन्म |
१४ एप्रिल १८९१ |
|
जन्मठिकाण |
मद्यप्रदेश,महू |
|
वडील |
रामजी मालोजी सपकाळ |
|
आई |
भिमाबाई सपकाळ |
|
पत्नी |
पहिली पत्नी -रमाबाई आंबेडकर दुसरी पत्नी -सविता आंबेडकर |
|
शिक्षण |
एलफिन्सटन हायस्कूल
मुंबई एमए अर्थशास्त्र कोलंबिया विश्वविद्यालयातून PHD मास्टर ऑफ सायन्स |
|
मृत्यू |
६ डिसेंबर १९५६ |
महार जातीतील असल्यामुळे त्यांच्या सोबत सामाजिक आणि आर्थिक स्वरूपात भेदभाव केला जात असे. इतकेच नाही तर उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला.
एकदा लहान असताना
त्यांना बागेमध्ये वाचन करत असताना केळूस्कर गुरूजींनी पाहिले आणि त्यांनी त्यांची
आपुलकीने
चैाकशी केली. त्यांना
वाचनाची पद्धत समजावून सांगितली,आणि त्यांना रोज चांगल्या लेखकांची पुस्तके आणून दिली.
केळूस्कर गुरूजींनी भीमरावांची तल्लख बुद्धिमत्ता ओळखून महविद्यालयीन आणि पुढे उच्च
शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड याच्याकडे शिफारस केली. त्यामुळे
त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण झाले. मिळलेल्या संधीचे सोने करून जगातील एक विद्वान म्हणून
नावलोकिक प्राप्त करणारे उच्च विद्यावीभूषीत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर झाले! यांनी स्वतंत्र
भारताची राज्यघटना लिहली.
उच्च शिक्षण घेऊन
जेव्हा ते भारतात परतले तेव्हा जातीपातीच्या भेदभाव विरुद्ध लढण्याचा निर्णय त्यांनी
घेतला.१९५० रोजी बोध्दीक परिषदेत श्रीलंकेला गेले होते.तेथे त्यांनी बोध्द धर्माची
दीक्षा घेतली. दलीतांनच्या उध्दासाठी आपले जीवन समर्पित केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा