गुरुवार, २० जुलै, २०२३

माझा वाढदिवस

                                                            माझा वाढदिवस



           माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे माझा वाढदिवस.या दिवसाची अगदी आतुरतेने मी वाट पाहते.या दिवशी मी नेहमी काहीतरी आठवणीत राहील असे काही तरी करते. या दिवशी माझी शाळा असते. त्यामुळे मी त्या दिवशी नेहमी मी शाळेला नवीन ड्रेस घालून जाते. या दिवशी सकाळी मी लवकर उठून आंघोळ करून नवीन ड्रेस घालून मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेते. आणि नंतर घरी येऊन मी आई बाबाना नमस्कार करते. नंतर नास्ता करून मी शाळेला जाते. 

           शाळेमध्ये सगळे जण मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. त्यानंतर जेव्हा मी घरी जाते,तेव्हा माझ्या आई बाबाच्या बरोबर अनाथ आश्रमात जाऊन गरीब मुलांना भेटवस्तू देते. आणि माझ्या वाढदिवसाचा केक मी त्याच्या सोबत कापते. माझा वेळ खूप छान जातो.या नंतर मी आमच्या बागेमध्ये जाऊन दरवर्षी एक झाड लावतो.आज मी जवळजवळ २० झाडे लावली आहेत. आणि मी ती झाडे जपली आहेत. ती झाडे खूप मोठी झाली आहेत.आणि त्या झाडांना मला पाहताना खूप आनंद होतो. 

           माझे आई बाबा म्हणतात की,नेहमी असे काम करावे कि त्याचा     आपल्याबरोबर आपल्या समाजातील लोकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे.आशाप्रकारे  माझा वाढदिवसाचा दिवस नेहमी खूप चांगला जातो.मी जेव्हा अनाथ आश्रमामधील मुलांना काहीतरी भेटवस्तू देतो तेव्हा मला खूप आनंद होतो.मला ते खूप छान आशीर्वाद देतात. यामुळे माझे वर्ष खूप छान जाते.माझी आजी नेहमी मला सांगायची श्रीमंत लोकांना काही तरी देण्या पेक्षा गरीब लोकांना काहीतरी देत जा. त्यामांधून मिळणारे समाधान खूप मोठे असते. आणि ते मिळवायला खूप मोठे भाग्य लागते. आणि आश्रमातील मुलांना मी दरवर्षी भेटवस्तू देते,आणि हे मी दरवर्षी नेहमी करणार आहे.आशाप्रकारे माझा वाढदिवस मी खूप छान प्रकारे साजरा करते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा