बुधवार, १९ जुलै, २०२३

निसर्ग माझा सोबती

                       

                           निसर्ग माझा सोबती

              

हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणच्या मखमलीचे, 

त्या सुंदर मखमली वरती, फुलराणी ही खेळत होती.

          या बालकवीच्या  कवितेमधून आपल्याला निसर्गाचे वर्णन पहायला मिळते. हा निसर्ग आपल्याला खूप उपयोगी आहे. आपल्या देशाने खूप प्रगती केली,पण निसर्गाचा आधार घेऊनच आपल्याला निसर्गामधून अन्न वस्त्र,निवारा या मुख्य गरजा पूर्ण होतात. आपल्याला हवे असणारे अन्न आपल्याला निसर्गामधून मिळते. गहू,ज्वारी,तांदुळ  ही धान्य आपल्याला निसर्गामधून मिळतात.त्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो. आपण जी कपडे वापरतो या कपड्याना  लागणारा कापूस आपल्याला झाडापासून मिळतो. आपले घर बांधण्यासाठी आपल्याला माती,वीटा, लाकूड लागते ते सुद्धा आपल्याला निसर्गामधून मिळते.

      या निसर्गाचे आपण खूप देणे लागतो. आपण नेहमी या निसर्गाकडून घेत असतो आपण या निसर्गाला काही देत नाही. 

आपल्याला कधी उदास वाटले तर आपण निसर्गाच्या मोकळ्या मैदानात उभे राहिलो तरी आपला उदासपणा निघून जातो. हिरवा निसर्ग आपल्याला जगण्याची नवी दिशा देतो. कोणत्याही परिस्थितीत हा निसर्ग आपले काम तठस्थपणे करतो. कधीही आपल्या कामात आळस करीत नाही. सूर्य कधीही म्हणत नाही की मी आज प्रकाश देणार नाही. 

 निसर्गतला प्रत्येकघटकतेम्हणजे सूर्य,चंद्र,झाडे,भूमी,डोंगर,नद्या,समुद्र,तलाव,ओढेसगळेजन आपआपले काम करीत असतात. मनुष्य प्राण्याला जे जे हवे ते नेहमी देत राहतात.         

  आपण नेहमी निसर्गाला त्रास देतो.त्याचे नुकसान करतो. झाडे तोडतो,जमीनीचे प्रदूषण करतो,हवेचे प्रदूषण करतो,जलप्रदूषण करतो.निसर्गाला दूषित करण्याचे काम आपण करतो.आपण निसर्गाची हानी बंद केली पाहिजे,नाहीतर निसर्ग आपले रैाद्र रूप आपल्याला दाखवतो. आणि त्याच्या आपल्याला खूप त्रास होतो.निसर्गावर प्रेम केले तर आपल्याला निसर्ग खूप काही देईल आणि आपल्यावर नेहमी खुश राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा