माझे आवडते पुस्तक
मला लहानपणापासून वाचनाची आवड आहे. वाचन म्हणजे आपल्या ज्ञानात भर घालणारी गोष्ट आहे. वाचनामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन समृद्ध होतो. आणि तो सकारात्मक होतो. वाचनाची आवड असेल तर नवीन गोष्टीचे ज्ञान मिळते,आपणही खूप छान बोलू शकतो आणि लिहू शकतो हा आत्मविश्वास मिळतो.
मी वाचलेले खूप छान गोष्टीचे पुस्तक ते म्हणजे श्यामची आई हे आहे. हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहले आहे.श्यामची आई या पुस्तकामधून साने गुरुजी यांनी आपली जीवनगाथा कथन केली आहे. माय लेकरामधील प्रेम आणि संस्काराच्या हृदयस्पर्शी आठवणी या पुस्तकात आहेत. साने गुरुजी यांनी १९३३ च्या साली नाशिकच्या तुरुंगात अवघ्या पाच दिवसात हे पुस्तक लिहले आहे.आपल्या आई सोबत घडलेल्या प्रत्येक लहान मोठया गोष्टीची आठवण साने गुरुजींनी या पुस्तकात केली आहे. गुरुजींच्या आईने लहानपाणापासून देशभक्तीची आणि ईश्वरभक्तीची भावना त्यांच्यात आणि त्यांच्या भावंडात निर्माण केली आहे.
अध्यापन कार्य, समाजसेवा,स्वातंत्र युद्ध अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी हे आहेत. या पुस्तकात एक सुदर गोष्ट आहे ती म्हणजे एकदा गुरुजी अंघोळीला गेले असताना अंघोळ झाल्यावर ते पायाला घाण लागते म्हणून जमिनीवर पाय ठेवत नव्हते म्हणून त्यांच्या आईने आपला पदर पसरला आणि श्यामला घरात घेतले त्यानंतर त्यांना आईने शांतपणे समजावले, तू तुझ्या पायाला घाण लागू नये म्हणून जशी काळजी घेतो तशी मनाला घाण लागणार नाही याची काळजी घे. आशा सुंदर सुंदर गोष्टी आपल्याला या पुस्तकात पाहायला मिळतात आणि यामधून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकॊन अगदी सकारात्मक होतो. साने गुरुजी आणि त्यांना निर्माण करणारी श्यामची आई खरच थोर आहेत. त्यांना घडवणारी ही माता खरोखर खूप अमर आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा