माझा आवडता प्राणी - मांजर
मांजर हा प्राणी जरी पाळीव असला तरी त्याला कुत्र्यासारखा पट्टा बांधता येत नाही कारण हा प्राणी आपल्या घरात राहूनही स्वतंत्र बाण्याचा असतो. मांजर काळे,पांढरे ,तपकिरी अशी वेगवेगळ्या रंगाची असतात. त्याचे डोळे घरे असतात. मांजराला दूध खूप आवडते.त्यामुळे ते स्वयंपाक घरात पातेल्यात तोंड घालणार नाही ना ह्याची काळजी घ्यावी लागते. तसे दिसण्यात च ते उंदीरही शिकार करून खाते त्यामुळे ज्या घरात उंदरांचा त्रास होत असतो असे लोक मांजर पाळतात.
मांजराला मासे खूप आवडतात. त्यामुळे कोळणीच्या आसपास खूप मांजरे दिसतात. मांजराला वाघाची मावशी असे म्हणतात. कारण दोघेही एकाच पशु वर्गातले आहेत.त्यांच्या दिसण्यात आणि सवयीत साम्य आहे. फक्त मांजर वाघापेक्षा खूप लहान असते. मांजरी आपल्या पिलांना मानेला पकडून उचलते पण तिची नखे तिच्या पिलांना लागत नाही. मांजराला रात्रीच्या वेळेस दिसते. त्याचे डोळे अंधारात चमकतात. लहान मुलांना मांजराची पिले खूप आवडतात. माझा आवडता प्राणी मांजरे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा