मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

रक्षाबंधन

                                        रक्षाबंधन 

                  


 आपल्या भारत देशात अनेक जातीधर्माचेलोक एकत्र राहतात.आपल्या भारतात अनेक सण साजरेकेलेजातात .दिवाळी,दसरा,ईद,ओणम,नवरात्र असे अनेक सण सज्रे करतात. त्यामधील एक सण म्हणजे रक्षाबंधन हा होय. रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या नात्यांमधला प्रेम साठवण करणारा सण आहे. 

          रक्षाबंधन दिवशी बहीण भावाला राखी बांधते. हिंदू धर्मात एक पवित्र सण म्हणून हा सण ओळखला जातो. हा सण श्रावण महिन्यात साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण व आयुष्यभाराची सोबत देण्याचे वचन देतो. रक्षाबंधन दिवशी विविध गोड पदार्थ मिठाई बनवली जाते. व एकमेकांना खाऊ घातली जाते.रक्षाबंधन हा सण भारतात नव्हे नेपाळ, मॉरिशिस व अन्य अनेक देशामध्ये साजरा केला जातो. 

          आजच्या धावपळीच्या युगात लांब राहणाऱ्या बहिणी भावाला कुरियर द्वारे राखी पाठवतात.भाऊही आपल्या बहिणीसाठी भेटवस्तू पाठवतात. या दिवशी पंतप्रधान,राष्ट्पत्ती  याशिवाय अनेक प्रसिद्य व्यक्तीच्या हातावर राखी बांधली जाते.या दिवशी घरामध्ये खूप सुंदर  वातावरण असते बहीण नवीन ड्रेस घालून तयार होऊन पूजेचे ताट सजवते.

   ताटात कुंकू,राखी,अक्षदा,दिवा,मिठाई  इ. वस्तू ठेवल्या जातात. त्यानंतर घरच्या पूर्व बाजूला भावाला बसवून त्याची आरती केली जाते,डोक्याला कुंकू व अक्षदा लावून बहीण राखी बांधते. आणि बहीण भावाला मिठाई भरवते. भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. आणि बहिणीचे रक्षण करेन अशे वचन बहिणीला देतो. 

          स्वतःला मॉर्डन समजणाऱ्या या  लोकांनी आपली संस्कृती विसरत चालले आहेत.आजचे भाऊ -बहीण काही कारणास्तव लांब राहतात पण जेव्हा जवळ येतात तेव्हा सुद्धा ते लांब असल्यासारखे राहतात. या मॉर्डन संस्कृती बहिणीकडून राखी बांधून घेतात पण  बहिणीचे रक्षण करण्याची वेळ येते  तेव्हा आपले कर्तव्य विसरतात. आजच्या पिढीने या सणाचे महत्व जाणून घेतले पाहिजे आणि त्याचा आपल्या जीवनात चांगल्या गोष्टीसाठी उपयोग केला पाहिजे. 

   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा