आपल्या आजूबाजूला अनेक फुले आपण पाहतो. हि फुले वेगवेगळ्या रंगाची असतात आणि वेगवेगळ्या आकाराची असतात. फुलांची सुदंरता मनाला मोहवून टाकते. आणि सुगंध मनाला उल्हासित करतो. या फुलांपैकी फुलांचा राजा गुलाब हे फुल खरंच मनाला मोहवून टाकते.सर्वांनाच गुलाब हे फुल फार आवडते. गुलाबाच्या पाकळ्या खूप मुलायम असतात. गुलाबाचे फुल जेव्हा फुलते तेव्हा त्याच्या आजूबाजूला भुंगे आणि फुलपाखरे उडू लागतात.
गुलाबाचा उपयोग भरपूर कार्यसाठी करतात. गुलाब पूजेसाठी,सजवटीसाठी ,केसाची सुंदरता वाढवण्यासाठी करतात. त्याचबरोबर गुलाब जल,अत्त्तर,सरबत,तेल,गुलकंद बनवण्यासाठी केला जातो.या शिवाय आयुर्वेदिक ओषधे बनवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा उपयॊग केला जातो. या पाकळ्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते.दररोज गुलाब खाल्यामुळे टीबी चा त्रास कमी होतो. गुलाबपासून पर्फुम्स बनवली जातात. गुलाबाच्या १०० प्रजाती आहेत. गुलाबाच्या रंगानुसार त्याचे अनेक प्रकार पडतात.
२२ सप्टेंबर ला भारतात ७ फेब्रुवारीला रोज डे म्हणजेच गुलाब दिवस साजरा केला जातो. आपल्या देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले आणि गुलाबाचे फुल आवडत असत. भारतात गुलाबाच्या फुलाला फुलांचा राजा म्हंटले जाते. गुलाबाचे फुल सुंदर असण्यासोबत सुगंधित आहे यामुळे मला गुलाबाचे फुल खूप आवडते.
माझा निबंध तुम्हाला कसा वाटला हे कमेन्ट करून नक्की सांगा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा