मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

नागपंचमी

                                                             

                       💥     नागपंचमी 💥


         
भारत देश विविध संस्कृतीने आणि परंपरेने नटलेला आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक अगदी गुण्यागोविंदाने राहतात. भारतामध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात. नागपंचमी हा सण एक लोकप्रिय सण आहे. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील हा पहिला सण आहे. या दिवशी नागदेवतेची आणि सापाची पूजा केली जाते. त्यांना दुधाने अंघोळ घातली जाते. 

                        सर श्रावणाची सांगे,गोड गुपित कानांत।

                         झुला फांदीवर ग ,श्रावणाचे गातो गीत ।

    या ओळी ऐकल्या कि ,लगेच आपल्या डोळ्यासमोर श्रावण पंचमीसाठी झाडावर बांधलेले झोके आठवतात. नागपंचमीची गाणी आठवतात. ``चल ग सखे वारुळाला -नागोबाला पुजायला "--या ओळी ओठावर येतात.  सर्व स्त्रीया ,मुली,ह्यांना अगदी हा हवासा वाटणारा सण सर्वच मोठया उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी स्त्रीया  लवकर उठून ,घर साफ करून ,अंघोळ करून नागदेवतेची पूजा करतात. या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही. स्त्रीया भाजी चिरत नाहीत. 

      नागपंचमीचा सण नागदेवतेबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. नागाची पूजा करून दूध, लाह्या याचा नैवद्य दाखवला जातो. आणि हे नागदेवता आमचे संरक्षण कर ,कृपा कर अशी प्रार्थना केली जाते.

     आपल्या आजी कडून आपल्याला नागपंचमीच्या गोष्ट ऐकायला मिळते. एक सुशीला नावाची एक मुलगी होती.ती स्वभावाने खूप चांगली होती. एकदा ती शेतात नांगरणी करत असताना शेतातील  नागाच्या वारुळाला नांगर लागला आणि त्या नागाच्या वारुळातील नागाची पिल्ली मेली आणि त्यामधील नाग क्रोधीत झाला आणि नाग सुशीलाच्या घरी गेला तेव्हा नागपंचमीचा दिवस होता. सुशीला नागपंचमीची पूजा करत होती. पूजा करून ती प्रार्थना करत होती. ती म्हणत होती कि नागदेवता आम्ही तुमची मनोभावे सेवा करतो पण जर कधी आमच्या हातून काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर. अशी प्रार्थना नागदेवताने ऐकली आणि त्यानंतर नागदेवतेची जोडी तेथून निघून गेली. म्हणजेच प्रेमाने कोणालाही जिकंता येते. नाग हा रक्षणकर्ता मानला जातो.  नागामुळे उंदीर शेताचे नुकसान करू शकत नाही.स्त्रीया,मुली या नागराजाला आपला भाऊ मानतात आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास करतात.हा सण महाराष्ट्रात खूप मोठया प्रमाणात साजरा केला जातो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा