मराठी निबंध-नाताळ
जिंगल बेल जिंगल बेल
जिंगल बेल जिंगल बेल
हे गाणे ऐकले कि आपल्याला नाताळ या सणाची आठवण होते. नाताळ हा सण भारतात नाही तर भारताच्या बाहेरील देशात अत्यंत उत्सहाने आणि खूप मजेमध्ये साजरा केला जातो. २५ डिसेंबर हा दिवस येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस नाताळ हा सण साजरा केला जातो. या दिवशी ख्रिश्चन लोक प्रार्थना करतात तसेच उत्सवाच्या कारणाने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.या उत्सव साजरा करण्यापाठीमागे असे मानले जाते की देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या दिवशी लोकांचे दुःख दूर करण्यासाठी पृथ्वीवर आला होता.काही लोकांसाठी ख्रिसमसची तयारी लवकर सुरु होते.
यामध्ये सजावट,खाद्यपदार्थ आणि कुटूंबातील सदस्य आणि मित्रांसाठी भेटवस्तू खरेदी केली जाते. या दिवशी लोक घरावर आकाशदिवे लावतात.नाताळ या सणाचे महत्व असे कि या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू देतात .आपल्या घरात रोषणाई करतात. घराला सजावट करतात. ख्रिसमस ट्री -नाताळासाठी सजवलेले सूचिपर्णी झाड आहे. या सणावर चॉकलेट केक बनवला जातो. ख्रिस्त जन्माची आठवण म्हणून गोशाळा किंवा गायीचा गोठा बनवला जातो. हा सण सर्वांना एकत्रित आणण्याचा सण आहे. चर्च मध्ये जाऊन लोक प्रार्थना करतात आणि या दिवशी रात्री गाण्याचे कार्यक्रम होतात.सगळे मित्र मंडळी गाण्याचा कार्यक्रम ऐकत जेवण करतात आणि या सणाची पूर्तता केक शिवाय होत नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा